एक्स्प्लोर

Anant-Radhika Pre Wedding: कुटुंबाची साथ अन् आनंदाचा क्षण, मुकेश अंबांनींचेही डोळे पाणावले, प्री वेडिंगच्या स्टेजवर अनंत अंबांनीचे भावनिक शब्द

Anant-Radhika Pre Wedding: अंबानी कुटुंबातील अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंगचा कार्यक्रम गुजरातमधील जामनगरमध्ये सुरु आहे.

Anant-Radhika Pre Wedding:   गुजरातमधील जामनगरमध्ये सध्या एकाच गोष्टीची चर्चा आहे, ती म्हणजे अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Marchant) यांच्या प्री वेडिंग सोहळ्याची. या सोहळ्यासाठी बॉलीवूड, हॉलीवूडसह अनेक दिग्गजांची उपस्थिती आहे. या सोहळ्यातील अनेक व्हिडिओज् सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. अनंत अंबानी यांनी या सोहळ्यासाठी त्यांच्या कुटुंबियांचे आभार मानले. त्यावेळी त्यांचे वडिल मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या डोळ्यात आपसुकच पाणी आलं. 

या सोहळ्यासाठी घरातील प्रत्येकाने घेतलेल्या मेहनतीसाठी अनंत अंबानी यांनी त्यांच्या कुटुंबियांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी या सोहळ्यासाठी आलेल्या प्रत्येकाचे देखील स्वागत केले असून त्यांच्या उपस्थितीसाठी त्यांचे आभार मानलेत. या सोहळ्यासाठी मागील चार महिन्यांत घरातील प्रत्येक व्यक्तीने फार मेहनत घेतलीये, असं म्हणत मर्चंट आणि अंबानी अशा दोन्ही कुटुंबियांचा उल्लेख यावेळी अनंतर अंबानी यांनी केला. 

अनंत अंबानी यांनी नेमकं काय म्हटलं?

आजचा हा सोहळा माझ्या आईमुळे होतोय. मागील चार महिन्यात ती दिवसभरातले जवळपास 17 ते 18 तास काम करत होती. हा सोहळा आनंदाने साजरा करण्यासाठी माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीने तितकीच मेहनत घेतलीये. हा आनंद तुम्हा प्रत्येकासोबत साजरा करण्यातच आम्हाला खरा आनंद मिळतोय, असं अनंत अंबानी यांनी म्हटलं. 

मुकेश अंबानींचे डोळे पाणावले

यावेळी बोलताना अनंत अंबानी यांनी म्हटलं की, माझं सुरुवातीपासूनचं आयुष्य हे काही फुलासारखं नव्हतं. माझ्या आरोग्याशी संबंधित अनेक अडचणींचा सामना मी यावेळी केलाय. पण यामध्ये माझे आई वडिल माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे होते. यावेळी मुकेश अंबानी यांच्या डोळ्यातही पाणी आलं. जामनगरमध्ये 1 ते 3 मार्च दरम्यान अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग फंक्शनचा सोहळा आयोजित करण्यात आलाय. 

जामनगरमध्ये सेलिब्रिटींची मांदियाळी

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंगला अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. यात अमिताभ बच्चन, रजनीकांत, शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, अजय देवगन, काजोल, सैफ अली खान, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, अर्जुन कपूर, रणबीर कपूर, आलिया भट्ट, विकी कौशल, कतरिना कैफ, करण जोहर, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर, करिश्मा कपूर, करीना कपूर, सैफ अली खानसह अनेकांचा समावेश आहे. 

ही बातमी वाचा : 

अजय-अतुलच्या झिंगाटची हॉलीवूडच्या रिहानालाही पडली भुरळ, जान्हवीसोबत अंबानींच्या प्री वेडिंगमध्ये धरला ठेका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
Kailas Patil : कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :14 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHAShyam Rajput Nashik : अहिराणी भाषेत राजपूत यांचं मतदारांना आवाहन; सीमा हिरेंसाठी मैदानातAjit Pawar Modi Sabha :  मुंबईत मोदींची सभा, अजित पवारांची पाठ?ABP Majha Headlines :  9 AM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
Kailas Patil : कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Dhananjay Munde: पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
Embed widget