Amruta Fadanvis and Rihanna at Anant-Radhika Pre Wedding : जामनगरमध्ये सुरु असलेल्या अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Marchant) यांच्या प्री वेडिंग फंक्शनसाठी अनेक दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली आहे. अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) या देखील या सोहळ्यासाठी जामनगरमध्ये पोहचले आहेत. तसेच हॉलीवूड सिंगर रिहाना (Rihanna) ही सुद्धा जामनगरमध्ये आहे. यावेळी रिहाना आणि अमृता फडणवीस यांची भेट झाली. या भेटीचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय. 


अमृता फडणवीस यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी #musical #inspiration असं कॅप्शन दिलं आहे. अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंग कार्यक्रमामध्ये रिहानाचा स्पेशल परफॉर्मन्स ठेवला होता. तसेच बॉलीवूडकरांना हा परफॉर्मन्सचा पुरेपुर आनंदही घेतला. यावेळी रिहानाच्या गाण्यांवर अनेकांनी ठेका धरला. 






अमृता फडणवीस जामनगरमध्ये 


गुजरातमधील जामनगमध्ये 1 ते 3 मार्चदरम्यान अनंत आणि राधिका अंबानी यांच्या प्री वेडिंगच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी अनेक बील गेट्स पासून अनेक दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली आहे. तसेच या कार्यक्रमासाठी अमृता फडणवीस देखील पोहचल्या आहेत. 


झिंगाटवर रिहानाने धरला ठेका


संगीत दिग्दर्शक अजय-अतुल (Ajay-Atul) यांच्या झिंगाट (Zingaat) गाण्याची भूरळ महाराष्ट्रासह संपूर्ण होती. आता त्याच गाण्याची भूरळ हॉलीवूडची सिंगर रिहाना (Rihana) देखील पडली आहे. सध्या जामनगरमध्ये अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Marchant) यांच्या प्री वेडिंग फंक्शनसाठी संपूर्ण बॉलीवूडसह अनेक दिग्गजांची मंदियाळी सध्या जामनगरमध्ये आहे. याच सोहळ्यामध्ये रिहाना आणि जान्हवीने झिंगाट गाण्यावर ठेका धरला. 


मुकेश-नीता यांचा डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल (Mukesh Ambani Nita Ambani Dance Video Viral)


मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुकेश अंबानी आणि नीता अंबानी सादरीकरणाची तयारी करताना दिसून येत आहेत. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी 'श्री 420' या सिनेमातील 'प्यार हुआ इकरार हुआ है' या गाण्यावर थिरकताना दिसत आहत. या व्हिडीओमधील दोघांचे एक्सप्रेशन पाहण्यासारखे आहेत. 


ही बातमी वाचा : 


Anant-Radhika Pre Wedding: कुटुंबाची साथ अन् आनंदाचा क्षण, मुकेश अंबांनींचेही डोळे पाणावले, प्री वेडिंगच्या स्टेजवर अनंत अंबांनीचे भावनिक शब्द