Nashik Crime News नाशिक : ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षकानेच (Teacher) आपल्या शाळेतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचा सहलीच्या प्रवासादरम्यान विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


याबाबत सविस्तर माहिती अशी की, जानेवारी महिन्यात कॅनडा कॉर्नर परिसरातील एका शाळेची सहल सिंधुदुर्ग येथे गेली होती. दि. 5 जानेवारी रोजी रात्री दोन ते सकाळी सहा वाजेच्या दरम्यान मालवणहून नाशिकला येत असताना संशयित भाऊसाहेब किसन सानप (Bhausaheb Sanap) (रा. कॅनडा कॉर्नर, नाशिक) या शिक्षकाने पान खाऊन खिडकीतून थुंकण्याच्या बहाण्याने दोन विद्यार्थिनींच्या शेजारी बसून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. 


सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 


सहलीनंतर विद्यार्थिनींनी पालकांना याबाबत सांगितले. पीडित विद्यार्थिनी या इयत्ता सातवीतील असल्याचे समजते. शालेय व्यवस्थापनानेही चौकशी करुन संशयितास निलंबित केल्याची माहिती मिळत आहे. पीडितांनी याबाबत आपल्या पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी सानप यांच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात पोक्सो, विनयभंग व अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ करत आहेत. 


पंचवटीत महिलेचा विनयभंग


महिलेला फोन करून फोनवर तिचा विनयभंग केल्याची घटना पंचवटीतील फुलेनगर (Phulenagar) परिसरात घडली. प्रकाश विजय सावंत याने पीडित महिलेला फोन करून माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे बोलून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून सावंतविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.


नाशिकमधून तीन मुलींचे अपहरण


नाशिकच्या (Nashik) सिडकोतून तीन मुलींचे अज्ञात इसमांनी कशाचे तरी आमिष दाखवून अपहरण केल्याची फिर्याद अंबड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. फिर्यादी यांची मुलगी व तिच्या दोन मैत्रिणी दि. 28 फेब्रुवारी रोजी सिडको (Cidco) परिसरात उभ्या असताना अज्ञात इसमाने त्यांना कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या


Rahul Gandhi : मोठी बातमी! राहुल गांधींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, प्रशासन अलर्ट मोडवर