Maharashtra News : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तारखा कधी जाहीर होणार याकडं अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) जागावाटपाबाबतचा तिढा कायम असतांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या प्रस्तावावर अद्याप निर्णय झालेला नाहीये. आता वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर  (Prakash Ambedkar) यांनी महाराष्ट्रात (Maharashtra News) सभांचा धडाका लावला आहे. मार्चच्या पहिल्याच पंधरवाड्यात प्रकाश आंबेडकरांच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पाच सभा होणार असून या सभांकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 


मार्चच्या पहिल्या पंधरवाड्यात पाच सभा 


आगामी लोकसभा निवडणूकीपूर्वी (Lok Sabha Election 2024) सर्व पक्षांकडून जागावाटपांची तयारी सुरु आहे. महाविकास आघाडीत 33 जागांसंदर्भात वाटप पूर्ण झालं असून 15 जागांचा तिढा मात्र अद्याप कायम आहे. वंचितला महाविकास आघाडीत सामील केले असल्याचे सांगण्यात येत असले तरी, येत्या 5 किंवा 6 मार्चला उद्धव ठाकरे, शरद पवार, प्रकाश आंबेडकर आणि कांग्रेस नेत्यांच्या होणाऱ्या बैठकीत अंतिम फाॅर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. अशातच प्रकाश आंबेडकर यांनी देखील महाराष्ट्रभरात आपले शक्तिप्रदर्शन दाखवण्याचा निर्धार केला आहे. मार्चच्या पहिल्या पंधरवाड्यात प्रकाश आंबेडकरांचा महाराष्ट्रात सभांचा धडाका लावणार असून पहिल्या 15 दिवसांत आंबेडकरांच्या पाच सभा होणार आहेत. यात महाराष्ट्रातील साकोली, नवी मुंबई, मुंबई, हातकणंगले,आणि  सांगली येथे या सभा होणार आहेत. या सभामध्ये सांगलीतील सभा ही निर्णायक ठरणार आहे. सांगलीच्या सभेपर्यंत महाविकास आघाडीसंदर्भात ठोस निर्णय न झाल्यास आंबेडकर आपली भूमिका स्पष्ट करत मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  


सांगलीत वंचितचा उमेदवार 'फायनल'


सांगली येथे 14 किंवा 15 मार्च रोजी प्रकाश आंबेडकरांची सभा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सांगलीचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना वंचितच्या वतीने उमेदवारी देण्याबाबत जवळ जवळ पक्क झाले असल्याची देखील माहिती पुढे आली आहे. कोणत्याही परिस्थितीत सांगलीची जागा वंचितच लढणार असल्याची माहिती देखील वंचितच्या सूत्रांनी दिलीय. महाविकास आघाडीकडे प्रकाश आंबेडकर सांगलीची मागणी करणार आहे.  या अनुषंगाने मागच्या महिन्यात चंद्रहार पाटील  यांनी मुंबईत प्रकाश आंबेडकरांची भेट देखील घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांच्यात उमेदवारीसंदर्भात देखील चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र चंद्रहार पाटलांची उमेदवारीबाबत या आठवड्यात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  


या तारखेला होणारप्रकाश आंबेडकरांच्या सभा 



इतर महत्वाच्या बातम्या