एक्स्प्लोर

Sher Shivraj : भारतातच नव्हे, तर परदेशातही ‘शेर शिवराज'चा डंका, मराठी चित्रपटाचे शो जगभरात ‘हाऊसफुल’!

Sher Shivraj : 'शेर शिवराज' चित्रपटानं यापूर्वीच्या तीनही चित्रपटांच्या कमाईचा विक्रम मोडीत काढण्याच्या दिशेने जोरदार कूच केल्याचं चित्र राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर पहायला मिळत आहे.

Sher Shivraj : लेखक-दिग्दर्शक-अभिनेते दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टकातील 'शेर शिवराज' (Sher Shivraj) रूपी चौथे सिनेपुष्प रसिक दरबारी सादर केले आणि प्रेक्षकांनीही या चित्रपटाला विक्रमी प्रतिसाद दिल्याने शेकडो चित्रपटगृहांवर हाऊसफुलचे बोर्ड झळकल्याचे पहायला मिळाले. केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही 'शेर शिवराज'चा डंका वाजत असून लेखन-दिग्दर्शनापासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत-संगीत, साहसदृश्ये या सर्वांवर प्रेक्षक अक्षरश: फिदा झाले आहेत. पहिल्या दोन आठवडयांच्या जबरदस्त यशानंतर तिसऱ्या आठवड्यातही 'शेर शिवराज'ची बॅाक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच राहणार आहे.

'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' आणि 'पावनखिंड'नंतर 'शेर शिवराज'च्या रूपात 'शिवराज अष्टक' या संकल्पनेतील अर्धा टप्पा पूर्ण झाला आहे. 'शेर शिवराज' चित्रपटानं यापूर्वीच्या तीनही चित्रपटांच्या कमाईचा विक्रम मोडीत काढण्याच्या दिशेने जोरदार कूच केल्याचं चित्र राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर पहायला मिळत आहे. पहिल्या दोन आठवड्यांमध्ये भारतात या चित्रपटाचे 1000 पेक्षा अधिक शोज हाऊसफुल झाले, तर परदेशात हा आकडा 100 शोजवर पोहोचला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने, 'शेर शिवराज'च्या टिमने घेतलेल्या मेहनतीवर रसिकांनी कौतुकाची थाप मारल्याचं सांगणारे हे आकडे आहेत.

परदेशातही चित्रपटाचा बोलबाला

टिकिटींग पोर्टलवर या चित्रपटाला 97% रेटींग मिळालं आहे. परदेशांमध्ये सध्या 100 हून अधिक चित्रपटगृहांमध्ये 'शेर शिवराज' पाहिला जात आहे. यात युएसएमधील 20, जर्मनीतील 10, दुबईमधील 10, युकेमधील 5, कॅनडातील 5, ऑस्ट्रेलियातील 4 शहरांचा समावेश आहे. याखेरीज फिनलॅन्डमध्ये 3, युएई, बहारीन, ओमानमध्ये 5 शोज सुरू आहेत. हा आकडा आजवरच्या मराठी चित्रपटांच्या इतिहासातील खूप मोठा आहे. परदेशांमध्ये मराठी चित्रपटाला मिळत असलेलं हे यश खूप मोठं आणि मराठी सिनेसृष्टीच्या पुढील वाटचालीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.

तिकिट्सही पडतायत अपुऱ्या

तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करणाऱ्या 'शेर शिवराज' चित्रपटाचे प्रेक्षक मोठ्या जल्लोषात स्वागत करत आहेत. 'शेर शिवराज' प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या वाढत्या मागणीमुळे प्रत्येक सेंटरमध्ये शोजची संख्या वाढवावी लागली. तरीही प्रेक्षकांना तिकिट्स अपुऱ्या पडल्याचे चित्रपट अनेक ठिकाणी पहायला मिळाले. चित्रपटातील गाण्यांना रसिकांचा जोरदार प्रतिसाद लाभत आहे.

'शिवराज अष्टक' मध्यावर पोहोचलं असताना 'शेर शिवराज'नं एक महत्त्वाचा टप्पा पार केला असून, पुढील चित्रपटात दिल्लीचे तख्त राखण्यासाठी त्या दिशेनं कूच करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील चित्रपटाबाबतही प्रेक्षकांच्या मनात कुतूहल आहे.

हेही वाचा : 

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut Slams Hrithik Roshan: 'आगीत तेल ओतू नकोस...'; हृतिक रोशनवर भडकली कंगना, थेट गर्लफ्रेंड सबा आझादचं नाव घेत म्हणाली...
'आगीत तेल ओतू नकोस...'; हृतिक रोशनवर भडकली कंगना, थेट गर्लफ्रेंड सबा आझादचं नाव घेत म्हणाली...
Bollywood Actor Struggle Life: वडिलांच्या मित्रानं बनवलं हिरो, पहिल्याच फिल्मनं छाटले करिअरचे पंख, 'सुपरस्टार' बनण्यापूर्वीच बनला इंडस्ट्रीचा सर्वात मोठा 'फ्लॉपस्टार'
वडिलांच्या मित्रानं बनवलं हिरो, पहिल्याच फिल्मनं छाटले करिअरचे पंख, 'सुपरस्टार' बनण्यापूर्वीच बनला इंडस्ट्रीचा सर्वात मोठा 'फ्लॉपस्टार'
Sachin Deshpande Replace From Serial: 'इन्स्टावरचे फोलोअर्स पाहून बड्या चॅनलच्या मालिकेतून रिप्लेस केलं...'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्यानं सांगितलं इंडस्ट्रीचं भीषण वास्तव
'इन्स्टावरचे फोलोअर्स पाहून बड्या चॅनलच्या मालिकेतून रिप्लेस केलं...'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्यानं सांगितलं इंडस्ट्रीचं भीषण वास्तव
Ekta Kapoor Leases Out Juhu Property In Mumbai: एकता कपूरची स्मार्ट रिअल इस्टेट डिल, अख्खा मजला भाड्यानं दिलाय, दर महिन्याला कमावतेय लाखो रुपयांचा नफा, ऐकून तुम्हीही म्हणाल, क्या बात!
एकता कपूरची स्मार्ट रिअल इस्टेट डिल, अख्खा मजला भाड्यानं दिलाय, दर महिन्याला कमावतेय लाखो रुपयांचा नफा, ऐकून तुम्हीही म्हणाल, क्या बात!

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur By-election Prashant Kishor: देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
Pune Crime News : ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
IND vs SL 1st Test : 43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
Abhishek Sharma : 25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO
25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO
Pankaja Munde and Dhananjay Munde: 'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
WI vs PAK 2nd Test : पहिल्याच दिवशी पाकिस्तानची पळता भुई थोडी, वेस्ट इंडिजने मैदानात रडवून सोडलं, आता बाबरची पोरं शिकार करणार की शरण जाणार?
पहिल्याच दिवशी पाकिस्तानची पळता भुई थोडी, वेस्ट इंडिजने मैदानात रडवून सोडलं, आता बाबरची पोरं शिकार करणार की शरण जाणार?
Maharashtra Rain: महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'
महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'
Chandrakant Patil And Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
Embed widget