एक्स्प्लोर

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या - 

'पोन्नियिन सेल्वन'चा टीझर आऊट

'पोन्नियिन सेल्वन' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या बहुचर्चित सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून आता प्रेक्षक सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. हा सिनेमा आजवरचा सर्वात महागडा सिनेमा असणार आहे. 

वैदर्भीय बोलीभाषेतून धडे देणारे कराळे गुरुजी येणार 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर

'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रम अनेकांसाठी स्वप्नपूर्तीचा मंच ठरतो आहे. 'कोण होणार करोडपती'च्या आगामी भागात आपल्या अस्सल वैदर्भीय बोलीभाषेतून स्पर्धापरीक्षेचे धडे देणारे नितेश कराळे गुरुजी येणार आहेत. 

दाक्षिणात्य अभिनेता विक्रमची प्रकृती खालावली

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विक्रमची प्रकृती खालावली आहे. त्याला चैन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. विक्रमची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. 

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन रिलेशनशिपमध्ये? करण जोहरच्या शोमधून मोठा गौप्यस्फोट!

छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय शो ‘कॉफी विथ करण’च्या सातव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. या शोमधून अनेक सेलिब्रिटी त्यांच्या आयुष्यातील गुपितं उघड करत असतात. या शोच्या 7व्या पर्वाच्या पहिल्या एपिसोडमध्ये अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे दोघे हजेरी लावणार आहेत. या शोचे प्रोमो देखील प्रचंड चर्चेत आले आहेत. दरम्यान, शोच्या प्रमोशनवेळी करण जोहरने अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांच्या रिलेशशिप स्टेटसचा खुलासा केला आहे.

शिंजो आबेंच्या निधनावर अनुपम खेर यांनी व्यक्त केला शोक

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे शुक्रवारी निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यामुळे आता दिग्गजांकडून शोक व्यक्त केला जात आहे. बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनीदेखील सोशल मीडियाच्या माध्यामातून श्रद्धांजली वाहिली आहे. 

रिलीजच्या पहिल्याच दिवशी 'थोर लव्ह अॅन्ड थंडर'चा धुमाकूळ; भारतात केली रेकॉर्डब्रेक कमाई

हॉलिवूड सुपरस्टार क्रिस हेम्सवर्थचा 'थोर लव्ह अॅन्ड थंडर' हा सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी भारतात रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. जगभरात हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. 

संतोष जुवेकरने उघडली अभिनयाचं प्रशिक्षण देणारी शाळा; विद्यार्थ्यांना देणार अभिनयाचे धडे

मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरचं स्वप्न साकार झालं आहे. संताषने ठाण्यात अभिनयाचं प्रशिक्षण देणारी शाळा उघडली आहे. 'ई दृश्यम फिल्म अॅन्ड एंटरटेनमेंट स्कूल' असे संतोषच्या नव्या शाळेचे नाव आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून संतोषने यासंदर्भात माहिती दिली आहे. 

प्रवीण तरडेंना यंदाच्या शाहीर दादा कोंडके पुरस्काराने सन्मानित

 मराठमोळे अभिनेते, लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. प्रवीण तरडेंचे 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' आणि 'सरसेनापती हंबीरराव' हे दोन्ही सिनेमे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. आता या सिनेमांसाठी प्रवीण तरडेंना यंदाच्या शाहीर दादा कोंडके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

'सुख म्हणजे नक्की काय असतं' टीआरपीच्या शर्यतीत सलग दुसऱ्या आठवड्यात पहिल्या क्रमांकावर

'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका सलग दुसऱ्या आठवड्यात टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या स्थानावर 'रंग माझा वेगळा' ही मालिका आहे. तर 'मन उडू उडू झालं' मालिकेत सतत नवा ट्विस्ट येत असल्याने ही मालिका पुन्हा एकदा टीआरपीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर आली आहे. तर 'आई कुठे काय करते' या मालिकेच्या महा एपिसोडला 4.9 रेटिंग मिळाले आहे.  

इंद्रा करणार दीपूसोबत लग्न; लवकरच होणार शूटिंगला सुरुवात

'मन उडू उडू झालं' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत सध्या नव-नविन ट्विस्ट येत आहेत. इंद्राचं सत्य देशपांडे सरांसमोर आल्यानंतर मालिकेत एक वेगळचं वळण आलं आहे. इंद्राने गुंडागिरी सोडून चांगल काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मालिकेत लवकरच प्रेक्षकांना इंद्रा-दीपूला लग्नसोहळा पाहायला मिळणार आहे.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget