एक्स्प्लोर

राजपाल यादवनंतर अमिषा पटेलच्या अडचणी वाढल्या; कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट, नेमकं प्रकरण काय?

Ameesha Patel in Legal Trouble: अमिषा पटेलविरोधात मुरादाबाद न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले.

Ameesha Patel non-bailable warrant in 11 lakh cheque bounce case: मनोरंजनसृष्टीत सध्या राजपाल यादवच्या चेक बाउन्स प्रकरणामुळे खळबळ उडाली. अशातच बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अमिषा पटेल हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. आर्थिक फसवणूकप्रकरणी अमिषा कायद्याच्या कचाट्यात सापडलीये.  मुरादाबादच्या न्यायालयानं एका जुन्या फसवणूक प्रकरणात अभिनेत्रीविरोधात  अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. वारंवार समन्स बजावूनही अमिषा पटेल न्यायालयात गैरहजर होती. याच कारणास्तव न्यायालयानं कडक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. यावर अमिषा पटेल काय प्रतिक्रिया देते?  तिच्यावर काय कारवाई केली जाईल? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

नेमकं प्रकरण काय?

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9)

2017 साली मुरादाबाद येथील ड्रीम व्हिजन या इव्हेंट कंपनीचे मालक पवन कुमार यांनी अमिषा पटेलविरोधात तक्रार दाखल केली. एका लग्नसमारंभात तिच्या डान्स परफॉर्मन्सचे आयोजन करण्यात आले होते. तिनं या डान्स परफॉर्मन्ससाठी 11 लाख रुपये आगाऊ रक्कम घेतली होती. रक्कम घेऊनही अमिषा पटेल कार्यक्रमात उपस्थित राहिली नाही, असा थेट आरोप इव्हेंट कंपनीच्या मालकाने केला.  यानंतर तक्रारदाराने अमिषाकडे दिलेल्या रक्कमेची मागणी केली. 

सुरुवातीला अभिनेत्रीनं टाळाटाळ केली. जेव्हा तक्रारदाराकडून सारखी विचारणा केली जात होती, तेव्हा तिनं काही रक्कम परत केली.  तर, उर्वरित रक्कम देण्यासाठी तिनं चेक दिला. चेक बँकेत जमा केल्यानंतर बाऊन्स झाला. यानंतर तक्रारदाराने थेट न्यायालयात धाव घेतली. तसेच अमिषा पटेलविरोधात तक्रार दाखल केली.  

गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी मुरादाबाद न्यायालयात सुरु आहे.  न्यायालयाने अनेकदा अमिषाला हजर राहण्याचे आदेश दिले होते.  मात्र, अमिषा किंवा तिच्या बाजूने लढणारे वकील कुणीही न्यायालयात हजर राहिले नाहीत. वारंवार समन्स बजावूनही अमिषा पटेल न्यायालयात गैरहजर राहिल्यामुळे तिच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं.   या प्रकरणाची पुढील सुनावणी 27 मार्च 2026 रोजी मुरादाबाद न्यायालयात होणार आहे.  आता या प्रकरणात अमिषा पटेल न्यायालयात हजर होणार का?  तिला अटकेला सामोरे जावे लागणार का?  हे लवकरच उघड होईल.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

भर कार्यक्रमात तब्येत बिघडली, रुग्णालयात नेताच सुप्रसिद्ध गायिकेचं निधन; ब्रेन स्ट्रोकमुळे घेतला अखेरचा श्वास

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

OTT Crime Thriller:नेटफ्लिक्सवर या जबरदस्त क्राइम थ्रिलरचा धुमाकूळ! टॉप 10 मध्ये थेट दुसऱ्या क्रमांकावर, 1 तास 56 मिनिटांचा हा सिनेमा पाहिलात का?
नेटफ्लिक्सवर या जबरदस्त क्राइम थ्रिलरचा धुमाकूळ! टॉप 10 मध्ये थेट दुसऱ्या क्रमांकावर, 1 तास 56 मिनिटांचा हा सिनेमा पाहिलात का?
Nana Patekar Kon Honaar Crorepati: माधुरी दीक्षितसोबत KBC मध्ये दिसणार होते नाना, अचानक निधनाने सगळंच फिस्कटलं; मेकर्सने बोलवला 'नवा गेस्ट'
माधुरी दीक्षितसोबत KBC मध्ये दिसणार होते नाना, अचानक निधनाने सगळंच फिस्कटलं; मेकर्सने बोलवला 'नवा गेस्ट'
Columbus Marathi Movie: 'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराला लागली 'कोलंबस'ची लॉटरी! सिनेमा कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?
'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराला लागली 'कोलंबस'ची लॉटरी! सिनेमा कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?
Satish Rajwade Natak: रहस्य अन् तपासाचा थरार! सतीश राजवाडे पुन्हा इन्स्पेक्टर घारगेच्या भूमिकेत, 'या' नाटकाची प्रचंड चर्चा
रहस्य अन् तपासाचा थरार! सतीश राजवाडे पुन्हा इन्स्पेक्टर घारगेच्या भूमिकेत, 'या' नाटकाची प्रचंड चर्चा

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
PM Modi: 'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Election : 'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
सांगली DCC बँक निवडणुकीत हायकोर्टाने अर्ज बाद ठरवला; गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया, सांगितलं पुढे काय?
सांगली DCC बँक निवडणुकीत हायकोर्टाने अर्ज बाद ठरवला; गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया, सांगितलं पुढे काय?
Shetkari Microfinance vs Bank Loan : सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
Embed widget