एक्स्प्लोर

अमेझॉन प्राईमकडून यूजर्सना नववर्षानिमित्त 5 शॉर्ट फिल्म्सची मेजवानी

प्राइम व्हिडिओवर 'अनपॉज्ड: नया सफर' या हृदयस्पर्शी, आशा आणि विजयाची कहाणी सांगणाऱ्या अँथॉलॉजीचे प्रीमियर होणार 21 जानेवारीपासून.

Amazone video : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अमेझॉन प्राईम ( Amazone Prime)यूजर्ससाठी खास लघुपटांची मेजवानी घेऊन आला आहे. अमेझॉन प्राईम 'अनपॉज्ड- नया सफरच्या' (UNPAUSED - NAYA SAFAR) माध्यमातून अनोख्या गोष्टी दाखवल्या जाणार असून यामध्ये कोविड- 19 महामारीमुळे आपलं जीवन कशाप्रकारे बदललं आहे याची झलक पाहायला मिळणार आहे. यामध्ये प्रेम, आठवण, भीती, मैत्री अशा वेगवेगळ्या भावनांचा यामध्ये समावेश आहे. शिखा मकान, रूचिर अरूण, नुपूर अस्थाना, अयप्पा केएम आणि नागराज मंजुळे यांसारख्या दिग्दर्शकांनी अतिशय संवेदनशीलपणे या कथेवर काम केले आहे. प्राइम यूजर्सना 'अनपॉज्ड – नया सफर' हा लघुपट  21 जानेवारी रोजी भारतासह २४० देशांत पाहायला मिळणार आहे.  

प्राइम व्हिडिओने आज 'अनपॉज्ड- नया सफर' हा पोस्टर सोशल मिडीयावर शेअर करत प्राईम यूजर्सना आनंदाची पर्वणीच दिली आहे. विशेष म्हणजे या पाच लघुपटांत सैराट फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'वैकुंठ' या लघुपटाचाही समावेश आहे.  2020 मध्ये आलेल्या अनपॉज्डच्या पहिल्या सीझनला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर अमेझॉन ओरिजनल अँथॉलॉजीच्या सिक्वेलमध्ये पाच हिंदी शॉर्ट फिल्म्सचा समावेश करण्यात आला आहे. या फिल्म्समधून कोरोनाच्या महामारीमुळे आपल्या सगळ्यांसमोर उभी राहिलेली आव्हाने, आपल्याशा वाटणाऱ्या समस्या दाखवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर नव्या वर्षाचे स्वागत करत असताना सकारात्मक वृत्तीचा स्वीकार करायला हवा हेही सांगण्यात आलं आहे. 

'अनपॉज्ड- नया सफर' लघुपटांची यादी :
दिग्गज कलाकारांचा समावेश असलेला अनपॉज्ड- नया सफर' (UNPAUSED - NAYA SAFAR)या प्राईम व्हिडिओच्या अँथॉलॉजीमध्ये पुढील पाच शॉर्ट फिल्म्सचा समावेश आहे.  

•तीन तिगाडा – रूचित अरूण दिग्दर्शित – सकीब सालेम, आशिष वर्मा आणि सॅम मोहन अभिनित

•द कपल – नुपूर अस्थाना दिग्दर्शित – श्रेया धन्वंतरी आणि प्रियांशी पेन्युली अभिनित

•गोंद के लड्डू – शिखा मकान दिग्दर्शित – दर्शना राजेंद्रन, अक्षवीर सिंग सरन आणि नीना कुलकर्णी अभिनित 

•वॉर रूम – दिग्दर्शित अयप्पा केएम – गीतांजली कुलकर्णी, रसिका अगाशे, पुरानंद वांधेकर आणि शर्वरी देशपांडे अभिनित 

•वैकुंठ – नागराज मंजुळे दिग्दर्शित - अर्जुन करचे, हनुमंत भंडारी अभिनित

या संदर्भात अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या इंडिया ओरिजनल्स विभागाच्या प्रमुख अर्पणा पुरोहित म्हणाल्या, ‘सध्याच्या आव्हानात्मक काळात आशा, सकारात्मकता आणि प्रेरणा देणाऱ्या गोष्टींचा हृदयस्पर्शी संग्रह असलेल्या अनपॉज्ड- नया सफरसह या वर्षातल्या ओरिजनल्सची सुरुवात करणं खूप खास आहे. ही सीरीज देशातील स्वतंत्र आणि खिळवून ठेवणाऱ्या सिनेमाविषयक गुणवत्तेला व्यासपीठ मिळवून देण्याची आमची बांधिलकी परत अधोरेखित करणारी आहे.’त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला अमेझॉन प्राईम यूजर्ससाठी या पाच लगुपटांची मेजवानीच प्रेक्षकांना मिळणार आहे.

हे ही वाचा - 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Lata Mangeshkar Rejected Song: लता मंगेशकरांचं 'ते' रिजेक्टेड गाणं, दिग्दर्शकाला चित्रपटातही नको होतं, नंतर स्वतःलाच मूर्ख म्हणत उचललेला बूट
लता मंगेशकरांचं 'ते' रिजेक्टेड गाणं, दिग्दर्शकाला चित्रपटातही नको होतं, नंतर स्वतःलाच मूर्ख म्हणत उचललेला बूट
Kashmera Shah on Govinda and Sunita: गोविंदाच्या रुमर्ड गर्लफ्रेंडवर सूनबाई भडकली; सुनीता आहुजाला सपोर्ट करत म्हणाली..., पोस्ट Viral
गोविंदाच्या रुमर्ड गर्लफ्रेंडवर सूनबाई भडकली; सुनीता आहुजाला सपोर्ट करत म्हणाली..., पोस्ट Viral
Swarda Thigale Baby Girl: मुलगी झाली हो!प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट; 7 दिवसानंतर दिली गुडन्यूज, कारण...
मुलगी झाली हो!प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट; 7 दिवसानंतर दिली गुडन्यूज, कारण...
Albatya Galbatya: ‘अलबत्या गलबत्या’चा धुमाकूळ! 365 दिवसांत 333 प्रयोग हाऊसफुल्ल, आता नाटकातील गाणी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
‘अलबत्या गलबत्या’चा धुमाकूळ! 365 दिवसांत 333 प्रयोग हाऊसफुल्ल, आता नाटकातील गाणी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

व्हिडीओ

Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Bank protest : बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून सुरु होणारा तीन दिवसांचा संप मागे
Mobile Recharge New Rules : आता 30 दिवस चालणार मोबाईल रिचार्ज
Mumbai Gas Leakage : गॅसगळती जीवावर, सुरक्षा वाऱ्यावर, रडारवर महापालिकेचे अधिकारी | Special Report ABP Majha
Urban Naxal News : शहरी नक्षलवादाची कहाणी, शरणागत नक्षलीची जुबानी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dr Neelam Gorhe : डॉ. नीलम गोऱ्हेंच्या घरात पहाटे धुमाकूळ! हातोडा, पकड, दोरी घेऊन तरुणाची घुसखोरी; पाण्याच्या टाकीचे कनेक्शनही तोडले
डॉ. नीलम गोऱ्हेंच्या घरात पहाटे धुमाकूळ! हातोडा, पकड, दोरी घेऊन तरुणाची घुसखोरी; पाण्याच्या टाकीचे कनेक्शनही तोडले
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
नीलम गोऱ्हेंच्या घरात चोरीच्या उद्देशाने शिरलेला तरुण पुणे विद्यापीठातील विद्यार्थी, MSC शिकत असल्याची माहिती
नीलम गोऱ्हेंच्या घरात चोरीच्या उद्देशाने शिरलेला तरुण पुणे विद्यापीठातील विद्यार्थी, MSC शिकत असल्याची माहिती
SIR हटाओ, देश बचाओ... ज्ञानेश कुमारांची प्रतिकात्मक धिंड; ठाण्यात जितेंद्र आव्हाडांसह राष्ट्रवादीचा संताप
SIR हटाओ, देश बचाओ... ज्ञानेश कुमारांची प्रतिकात्मक धिंड; ठाण्यात जितेंद्र आव्हाडांसह राष्ट्रवादीचा संताप
शरद पवार म्हणाले, आम्ही कुणासोबतही जाणार नाही; सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, दुष्काळावरही बोलले
शरद पवार म्हणाले, आम्ही कुणासोबतही जाणार नाही; सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, दुष्काळावरही बोलले
Nashik Crime News: 'आई गं, मी कशी काय फसले? जाळ्यात अडकली, चुकले, माफ करा...', मित्रानं मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला, अश्लील फोटो अन्..., नाशिकमध्ये विवाहितेने जीवन संपवलं
'आई गं, मी कशी काय फसले? जाळ्यात अडकली, चुकले, माफ करा...', मित्रानं मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला, अश्लील फोटो अन्..., नाशिकमध्ये विवाहितेने जीवन संपवलं
Vinod Kambli Video Viral : विनोद कांबळींना वृद्धाश्रमात का ठेवलं? हॉस्पिटलकडून व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कांबळींच्या पत्नीची नाराजी! कारणही सांगितलं
विनोद कांबळींना वृद्धाश्रमात का ठेवलं? हॉस्पिटलकडून व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कांबळींच्या पत्नीची नाराजी! कारणही सांगितलं
Stock Market Crash : शेअर बाजारात ब्लॅक मंडे, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले, जाणून घ्या कारणं
शेअर बाजारात ब्लॅक मंडे, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले, जाणून घ्या कारणं
Embed widget