Allu Arjun : चाहत्यांसाठी अल्लू अर्जुननं नाकारली कोट्यवधींची ऑफर; 'या' जाहिरातीमध्ये काम करण्यास दिला नकार
चाहत्यांसाठी नुकतीच अल्लू अर्जुननं (Allu Arjun) कोट्यवधींची ऑफर नाकारली.
![Allu Arjun : चाहत्यांसाठी अल्लू अर्जुननं नाकारली कोट्यवधींची ऑफर; 'या' जाहिरातीमध्ये काम करण्यास दिला नकार allu arjun turns down tobacco endorsement offer worth crores for fans Allu Arjun : चाहत्यांसाठी अल्लू अर्जुननं नाकारली कोट्यवधींची ऑफर; 'या' जाहिरातीमध्ये काम करण्यास दिला नकार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/04/2a07ec5c982cbb7101f007fd137b4c42_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Allu Arjun : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण करणारा अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) चा चाहता वर्ग मोठा आहे. 'पुष्पा द राइज' (Pushpa: The Rise) या चित्रपटामधील अल्लू अर्जुनच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अल्लू अर्जुनचे चाहते त्यांचा प्रत्येक सिनेमा आवडीनं पाहतात. याच चाहत्यांसाठी नुकतीच अल्लू अर्जुननं कोट्यवधींची ऑफर नाकारली. एका तंबाखूच्या ब्रँडच्या जाहिरातीमध्ये काम करण्यासाठी अल्लू अर्जुनला त्या कंपनीनं कोट्यवधींची ऑफर दिली होती. पण ही ऑफर अल्लू अर्जुननं नाकारली आहे.
रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुननं या ऑफरबाबत सांगितलं की, तो अशा कोणत्याच जाहिरातीमध्ये काम करू इच्छित नाही ज्यामुळे त्याचे चाहते मिसगाईड होतील. अल्लू अर्जुन स्वत: तंबाखूचं सेवन करत नाही. त्यामुळे या गोष्टी इतरांना करण्यासाठी प्रोत्साहन देणे, ही चुकीची गोष्ट आहे असं अल्लू अर्जुनला वाटतं.
View this post on Instagram
रिपोर्टनुसार, पुष्पा या चित्रपटाच्या यशानंतर आता या पुष्पा द रूल पार्ट 2 हा या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आयकॉन आणि AA21 हे अल्लू अर्जनचे आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
संबंधित बातम्या
- TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Sher Shivraj : अफजलखानाच्या वधाचा थरार प्रेक्षक अनुभवणार....प्रतापगडाची यशोगाथा 'शेर शिवराज' शुक्रवारी होणार प्रदर्शित
- Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' मालिकेत नवा ट्विस्ट; इंद्रा-दीपूच्या नात्याचं सत्य मालती देशपांडे सरांपासून लपवणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)