Alia Ranbir Wedding Live Updates: आलिया आणि रणबीरचा पार पडला विवाह सोहळा; 'वास्तू' मध्ये बांधली लग्नगाठ

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Apr 2022 10:12 PM
Alia Ranbir Wedding : आलिया-रणबीरने कापला केक

आलिया रणबीरचा आज शाही विवाहसोहळा पार पडला आहे. लग्नानंतर आलिया आणि रणबीरचे केक कापतानाचे फोटो समोर आले आहेत. 

Alia Ranbir Wedding : कपूर कुटुंबाने आलिया भट्टचे केले हटके स्वागत

आलिया भट्ट आता कपूर घराण्याची सून झाली आहे. करीना कपूरपासून ते आदर जैनपर्यंत अनेकांनी आलियासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. 

Alia Ranbir Wedding : आलियाने लग्नानंतर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे मानले आभार

आलियाने पोस्ट शेअर करत लिहिले आहे,"कुटुंब आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत आम्ही लग्नबंधनात अडकलो आहोत. आमच्या आयुष्यातील या खास दिवशी तुम्ही केलेल्या प्रेमाच्या वर्षावासाठी आभार". आलियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हे खास कॅप्शन लिहिले आहे.  

Alia-Ranbir Wedding : करीनाने शेअर केले मुलासोबतचे फोटो

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. चाहते आता त्यांच्या फोटोची प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान करीनाने लग्नसोहळ्यातील एक फोटो शेअर केला आहे. करीनाने तिच्या छोट्या मुलासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. 


Alia Ranbir Wedding : लग्नानंतर आलिया-रणबीर जाणार देवाच्या दर्शनाला

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लग्नाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला जाणार आहेत. 

मुलीच्या लग्नासाठी महेश भट यांनी केला खास लूक

अभिनेत्री आलिया भटच्या वडिलांचा म्हणजेच महेश भट यांचा आणि आलियाचा भाऊ राहुल भट याचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये हे दोघे ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत आहेत. 

Alia Ranbir Wedding : आलिया-रणबीरचा शाही विवाहसोहळा पाहा ओटीटीवर

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर  आणि आलिया भट्ट नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांचा लग्नसोहळा पार पडला असला तरी अद्याप लग्नसोहळ्यातील दोघांचा एकही फोटो समोर आलेला नाही. आलिया-रणबीरप्रमाणेच त्यांच्या चाहत्यांसाठीदेखील आजचा दिवस खास आहे. त्यांच्या चाहत्यांना त्यांचा लग्नसोहळा ओटीटीवर पाहता येणार आहे. रिपोर्ट्सनुसार, एका मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मला त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ स्ट्रीम करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. येत्या काही महिन्यांत रणबीर आणि आलियाच्या लग्नाचे फुटेज ओटीटी प्लॅटफॉर्मवर लाइव्ह केले जाणार आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मने हे हक्क तब्बल 90-110 कोटींत विकत घेतले आहेत.


 

Alia Ranbir Wedding : वडिलांची आठवण येत आहे : रणबीर कपूर

नुकतेच आलिया-रणबीर लग्नबंधनात अडकले आहेत. दरम्यान रणबीर कपूरला  वडिलांची अर्थात ऋषि कपूर यांची आठवण येत आहे. 

Alia Ranbir Wedding : आलिया रणबीरला अमूलने दिल्या खास शुभेच्छा

रणबीर कपूर आणि आलिया भट्टला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी शुभेच्छा देत आहे. दरम्यान अमूलनेदेखील एक खास पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. 

Alia Ranbir Wedding : गुलाबी रंगाच्या शेरवानीत करण जोहरने लावली लग्नसोहळ्यात हजेरी

रणबीर आणि आलियाच्या लग्नसोहळ्यात करण जोहरने हजेरी लावली आहे. दरम्यान करण गुलाबी रंगाच्या शेरवानीत स्पॉट झाला आहे. 

Alia Ranbir Wedding : लग्नसोहळ्यात 'या' सेलिब्रिटींची हजेरी

नीतू कपूर, रिद्धिमा कपूर, शशी कपूर यांचा मुलगा कुणाल कपूर, करण कपूर, रिमा जैन, करीना कपूर, करिश्मा कपूर, सैफ अली खान, अर्मान कपूर ही मंडळी रणबीरच्या बाजूने उपस्थित आहेत. तर महेश भट्ट, मुकेश भट्ट, सोनी राजदान, अयान मुखर्जी, करण जोहर, आकांक्षा कपूर आणि अनुष्का कपूर ही मंडळी आलियाच्या बाजूने लग्नसोहळ्यात उपस्थित राहणार आहेत. 

Alia Ranbir Wedding : लग्नसोहळ्यात आलिया करणार स्पेशल एन्ट्री

आलिया-रणबीरच्या लग्नसोहळ्यात आलिया स्पेशल एन्ट्री करणार आहे. शाहीन भट्ट आणि आकांशा कपूर आलियाला लग्नाच्या मंडपात घेऊन येणार आहे. 

रणबीर आलियाच्या लग्नासाठी सैफ- करिनानं केला रॉयल लूक 

रणबीर आलियाच्या लग्नासाठी सैफ- करिनानं केला रॉयल लूक. पाहा फोटो-


आलियाची आई लग्नसोहळ्यासाठी तयार, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

आलियाची आई लग्नसोहळ्यासाठी तयार, सोशल मीडियावर शेअर केला फोटो





रिद्धिमा कपूरनं शेअर केला रणबीर आणि आलियाच्या लग्नासाठी केलेला लूक 

रिद्धिमा कपूरनं शेअर केला रणबीर आणि आलियाच्या लग्नासाठी केलेला लूक 


मेहंदी सोहळ्यात नीतू कपूरचा जलवा

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नामुळे नीतू कपूर खूप खूश आहे. बुधवारी, 13 एप्रिल रोजी दोघांचा मेहंदी सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी नीतू कपूरने मल्टीकलर घागरा सेट परिधान केला होता. हा घागरा प्रसिद्ध डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांनी बनवले आहेत. मुलाच्या मेहंदी सोहळ्यात नीतू कपूर खूपच सुंदर दिसत होत्या. 


 

'ऋषी कपूर यांची इच्छा पूर्ण होत आहे' आलिया आणि रणबीर यांच्या लग्नावर राकेश रौशन यांची प्रतिक्रिया

'ऋषी कपूर यांची इच्छा पूर्ण होत आहे' असं म्हणत आलिया आणि रणबीर यांच्या लग्नावर राकेश रौशन यांनी एका मुलाखतीमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. 

मोजक्याच लोकांना लग्नसोहळ्यात एण्ट्री!

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाला केवळ 15 ते 20 लोकच उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. आपले लग्न साधेपणाने व्हावे, अशी रणबीरची इच्छा आहे. अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त फक्त जवळचे मित्रच या लग्नाचा भाग असतील.

Alia Ranbir Wedding : नितू कपूर यांनी शेअर केला मेहंदीचा फोटो; मेहंदीमध्ये लिहिलं ऋषी कपूर यांचे नाव

Alia Ranbir Wedding :  नितू कपूर यांनी नुकताच सोशल मीडियावर मेहंदीचा फोटो शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये ऋषी असं लिहिलेलं दिसत आहे. 



Alia Ranbir Wedding : शाहीन, सोनी राजदान, नीतू आणि रिद्धिमा आर. के. हाऊसमध्ये दाखल

Alia Ranbir Wedding :  आलिया आणि रणबीरच्या विवाह सोहळ्यासाठी शाहीन, सोनी राजदान, नीतू आणि रिद्धिमा आर. के. हाऊसमध्ये दाखल झाले आहेत. 

Alia Ranbir Wedding : बिग बींनी दिल्या शुभेच्छा

Alia Ranbir Wedding :  अमिताभ बच्चन यांनी रणबीर आणि आलियाला सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत. आलिया आणि रणबीरचा आगामी चित्रपट 'ब्रम्हास्त्र' मधील केसरिया या गाण्याचा टीझर व्हिडीओ शेअर करून बिग बींनी आलिया आणि रणबीरला शुभेच्छा दिल्या.





लग्नाचा मुहूर्त ठरला!

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे लग्न वास्तू अपार्टमेंटमध्ये होणार आहे. आता लग्नाचा मुहूर्त समोर आला आहे.  या लग्नाचा मुहूर्त 2 ते 3 वाजेपर्यंत आहे.

लग्नाची लगबग सुरु!

शाहीन, सोनी राजदान, नीतू आणि रिद्धिमा लग्नासाठी रणबीर कपूरच्या घरी रवाना!




'कृष्णा राज'मधून निघणार रणबीरची वरात

रणबीर कपूरच्या 'कृष्णा राज' या बंगल्यातून त्याच्या लग्नाची वरात निघणार आहे. वरातीसाठी रिद्धिमा कपूर साहनी, करीना कपूर, करिश्मा कपूर यांच्यासह कपूर कुटुंबातील लोक वास्तू अपार्टमेंटमध्ये पोहोचणार आहेत. 



 

 
करिश्मा कपूरने शेअर केला मेहंदीचा फोटो

लग्नाआधी रणबीर कपूरच्या पालीहिल घरात हळद आणि मेहंदीचा भव्य कार्यक्रम पार पडला. ज्यामध्ये या दोन्ही स्टार्सचे फॅमिली आणि बॉलीवूडचे निवडक सेलिब्रिटी पोहोचले होते. या मेहंदी फंक्शनचा फोटो करिश्मा कपूरने सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो व्हायरल होत आहे.


करिश्मा कपूरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या पायाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये करिश्माच्या पायावर एक सुंदर मेहंदी डिझाईन आहे. हा फोटो शेअर करत करिश्माने कॅप्शनमध्ये लिहिले - 'मला मेहंदी आवडते.'



'हे' सेलिब्रिटी लावणार हजेरी

आलिया आणि रणबीरच्या रॉयल वेडिंगला अनेक प्रसिद्ध कलाकार हजेरी लावणार आहेत. नुकतीच त्यांच्या लग्नसोहळ्याची गेस्ट लिस्ट लीक झाली आहे. या लिस्टनुसार, प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर, जोया अख्तर, संजय लीला भंसाली, वरुण धवन, रोहित धवन आणि डिजायनर मसाबा गुप्ता हे आलिया आणि रणबीरच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या लिस्टमध्ये आलिया आणि रणबीरच्या 'ब्रम्हास्त्र' या चित्रपटांचा दिग्दर्शक अयान मुखर्जी याच्या नावाचाही समावेश आहे. 
 
तसेच, आलिया आणि रणबीर यांचे जवळचे मित्र-मैत्रीणी देखील या रॉयल विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. मनीष मल्होत्रा, अनुष्का रंजन, अर्जुन कपूर आणि शाहरुख खान हे आलिया आणि रणबीरच्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. करीना कपूर खान, करिश्मा कपूर, रिद्धिमा कपूर, नीतू कपूर, सैफ अली खान, महेश भट्ट, मुकेश भट्ट, सोनी राजदान हे आलिया आणि रणबीरच्या लग्न सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. 

पार पडला हळद आणि मेहंदी सोहळा!

‘वास्तू’मध्येच आलिया आणि रणबीरचा हळदी आणि मेहंदी समारंभ पूर्ण विधींसह पार पडला आहे, ज्यामध्ये कपूर आणि भट्ट कुटुंबाने हजेरी लावली होती. याशिवाय आलिया आणि रणबीरच्या जवळच्या मित्रांनाही या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. करण जोहर, श्वेता बच्चन यांनी यावेळी हजेरी लावली होती.

रणबीर कपूरच्या आईकडून शिक्कामोर्तब!

आलिया आणि रणबीरच्या प्री वेडिंग फंक्शन्सला सुरुवात झाली असून 14 एप्रिलला दोघे सात फेरे घेणार आहेत. रणबीरची आई नीतू कपूर यांनी आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या तारखेसंदर्भात चाहत्यांना माहिती दिली आहे. आरके हाऊसमध्ये आज आलिया आणि रणबीर लग्नबंधनात अडकणार आहेत. 


आलिया आणि रणबीरचे आज म्हणजेच 14 एप्रिलला लग्न होणार आहे, असे रणबीर कपूरची आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा कपूर यांनी मेहेंदीसोहळ्यानंतर एका मुलाखतीत म्हटले आहे, 

पार्श्वभूमी

Alia Ranbir Wedding Live Updates : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. आलिया आणि रणबीरच्या प्री वेडिंग फंक्शन्सला सुरुवात झाली असून 14 एप्रिलला दोघे सात फेरे घेणार आहेत. रणबीरची आई नीतू कपूर यांनी आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या तारखेसंदर्भात चाहत्यांना माहिती दिली आहे. आरके हाऊसमध्ये आज (14 एप्रिल) आलिया आणि रणबीर लग्नबंधनात अडकणार आहेत. 


रणबीर कपूरची आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा कपूर यांनी मेहेंदीसोहळ्यानंतर एका मुलाखतीत म्हटले आहे, आलिया आणि रणबीरचे उद्या म्हणजेच 14 एप्रिलला लग्न होणार आहे. या लग्नासाठी प्रत्येकजण उत्साही आहे. करिश्मा कपूर, करीना कपूर, करण जोहरसह अनेक सेलिब्रिटींनी रणबीर-आलियाच्या प्री वेडिंग फंक्शन्सला हजेरी लावली होती.


अयान मुखर्जीनं दिल्या शुभेच्छा


अयाननं ब्रम्हास्त्रमधील गाण्याची झलक शेअर केली आहे. अयाननं हा व्हिडीओ शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, ' आलिया आणि रणबीरसाठी खास... हे दोघे लवकर नव्या प्रवासाला सुरूवात करणार आहेत. हे दोघे माझ्या आयुष्यातील जवळचे व्यक्ती आहेत. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. 'रिपोर्टनुसार, आर. के. स्टुडिओमध्ये रणबीर आणि आलियाचा विवाह सोहळा पार पडणार आहे. 


आलिया आणि रणबीरने त्यांच्या आगामी अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले. 'ब्रह्मास्त्र' सिनेमा 9 सप्टेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा पाच भाषेंत प्रदर्शित होणार आहे. आलिया आणि रणबीर लग्नानंतर लगेचच आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. आलिया भट्ट तिच्या लग्नात सब्यसाची मुखर्जीचा पोशाख परिधान करणार आहे. आलिया-रणबीरच्या घराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. कपूर कुटुंबाचे वडिलोपार्जित घर असलेल्या आरके हाऊसमध्ये आलिया आणि रणबीरचा लग्नसोहळा पार पडणार आहे. आलिया-रणबीर पंजाबी रितीरिवाजानुसार लग्नबंधनात अडकणार आहेत. तर हनिमूनला स्वित्झर्लंडला जाणार आहेत. 


फोटो काढण्यास बंदी!


आलिया आणि रणबीर यांच्या लग्न सोहळ्याची चर्चा सध्या सगळीकडे होत आहे. याच दरम्यान एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये घरात येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर स्टिकर लावण्यात येत आहे, असं दिसत आहे.  सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले वाउन्सर हे स्टिकर लावताना दिसत आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.