Gangubai Kathiawadi : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भटचा (Alia Bhatt) बहुचर्चित चित्रपट गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) 25 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहात होते. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली. फक्त भारतामधीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची मनं या चित्रपटानं जिंकली. एका पाकिस्तानी अभिनेत्यानं नुकतच त्याच्या पत्नीला एक खास सरप्राइज दिलं आहे. त्यानं गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट पत्नीसोबत पाहण्यासाठी संपूर्ण थिएटरच बुक केलं.
पाकिस्तानी अभिनेता मुनीब बटनं (Muneeb Butt) त्याच्या पत्नीला म्हणजेच अभिनेत्री आयमान खानला (Muneeb Butt) सरप्राइज देण्यासाठी दुबईमधील एक थिएटर बुक केलं. आयमान खान ही आलियाची फॅन आहे. त्यामुळे त्या अभिनेत्यानं गंगूबाई काठियावाडी चित्रपट पत्नीसोबत पाहण्यासाठी संपूर्ण खिएटरच बुक केलं.
गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. चित्रपटात आलिया भट शांतनु, आलिया, अजय देवगणस विजय राज, सीमा पाहवा यांनी या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच समंथा, सोफी चौधरी, अनन्या पांडे, आदित्य सील, अनुराग कश्यप आणि नीतू कपूर या कलाकरांनी कौतुक केलं.
संबंधित बातम्या
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Dasvi Trailer: दसवीचा ट्रेलर पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...
- The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या महिलेकडून रिक्षा चालकाने भाडं घेतलं नाही, विवेक अग्निहोत्रीने मानले आभार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha