एक्स्प्लोर

Alia Bhatt in Tumbad 2: 'पुन्हा हस्तरचा थरार...; 'तुंबाड 2'मध्ये आलिया भट्टची एन्ट्री, कोणती भूमिका साकारणार? रिलीज डेटही जाहीर

Alia Bhatt Joins Tumbbad 2: आलिया भट्टची 'तुंबाड 2'मध्ये एंट्री; सोहम शाह आणि नवाझुद्दीन सिद्दीकीसोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार.

Tumbbad 2 Alia Bhatt Confirms Role: नवाझुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui)बहुचर्चित एन्ट्रीनंतर आता 'तुंबाड 2'ने आणखी एका मोठ्या कलाकाराच्या नावाची घोषणा केलीये. आलिया भट्ट (Alia Bhatt) अधिकृतपणे या बहुप्रतीक्षित सिक्वेलमध्ये एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून, तिनं पोस्ट शेअर करुन याची अधिकृत माहिती आपल्या चाहत्यांसह शेअर केली आहे. 

'तुंबाड 2'मध्ये आलिया भट्टची एन्ट्री (Alia Bhatt Confirms Role in Tumbbad 2)

'तुंबाड 2' हे विश्व आता आणखी भव्य स्वरूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. नवाझुद्दीन सिद्दीकीच्या सहभागानंतर आता आलिया भट्टचीही  या सिनेमात एन्ट्री झाली आहे. भारतीय सिनेमातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेल्या आलियाची या वैशिष्ट्यपूर्ण आणि बहुप्रतीक्षित सिनेमॅटिक विश्वात झालेली एन्ट्री प्रेक्षकांसाठी मोठे आकर्षण ठरणार आहे. आलिया भट्टने आतापर्यंत अनेक जॉनरच्या चित्रपटात काम करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण आता ती हॉरर - थ्रिलर सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेता-निर्माते सोहम शाह आणि नवाझुद्दीन सिद्दीकी यांच्यासोबतची तिची ही पहिलीच जुगलबंदी असणार आहे. 

या तिन्ही कलाकारांच्या एकत्र येण्याने 'तुंबाड'च्या विश्वात तीन वेगवेगळ्या दृष्टिकोनांची भर पडणार आहे. सोहम शाह यांनी उभारलेले हे विश्व, नवाझुद्दीन सिद्दीकी यांची प्रभावी अभिनयशैली आणि आलिया भट्टची महत्त्वपूर्ण नवी भूमिका यामुळे 'तुंबाड 2'मध्ये एक वेगळीच रंगत निर्माण होणार, यात शंका नाही. दरम्यान, नवाझुद्दीन सिद्दीकी नेमकी कोणती भूमिका साकारणार? आलिया भट्ट या सिनेमात कोणत्या भूमिकेत झळकणार, याची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे.

'तुंबाड 2' बाबत आलिया भट्ट म्हणाली, 'जेव्हा पहिल्यांदा मी 'तुंबाड' हा सिनेमा पाहिला, तेव्हापासून हा सिनेमा माझ्या मनात कायम कोरला गेला आहे.  इतकं वेगळं, प्रेक्षकांना पूर्णपणे त्या विश्वात घेऊन जाणारं जग फारच कमी चित्रपट निर्माण करू शकतात', असं सिनेमाचं कौतुक करत आलिया भट्ट म्हणाली. 'सोहम आणि नवाझुद्दीन सिद्दीकी या दोन्ही कलाकारांसोबत काम करण्याची इच्छा फार पूर्वीपासून होती. या सिनेमात मी त्यांच्यासोबत काम करतेय, याचा मला खूप आनंद आहे. आम्ही एकत्र काय निर्माण करत आहोत, ते प्रेक्षकांनी अनुभवावं यासाठी मी आतुर आहे', असं म्हणत आलियाने या सिनेमात काम करण्याची उत्सुकता दर्शवली. दरम्यान, 'तुंबाड 2' हा सिनेमा 3 डिसेंबर 2027 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

साऊथ सिनेमा अन् वेब सिरीजचा बोलबाला; 'या' 7 क्राइम, कॉमेडी अन् Action सिनेमांनी डोकं चक्रावून सोडलं

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'मी तरुण हृतिक रोशनसारखा दिसतो...'; कंगनाची 'बेकार, बेरोजगार' म्हणत टीका, आता सौरव दास यांचा पलटवार, नेमकं काय म्हणाले?
'मी तरुण हृतिक रोशनसारखा दिसतो...'; कंगनाची 'बेकार, बेरोजगार' म्हणत टीका, आता सौरव दास यांचा पलटवार, नेमकं काय म्हणाले?
Ramayana Part 1 Trailer Review: प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, इंद्राचा ऐरावत, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, इंद्राचा ऐरावत, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
थलपती विजयच्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर ब्रेक, धमाल 4 अन् द ओडीसीचा धुमाकूळ; आत्तापर्यंत कुणी किती कमावले?
थलपती विजयच्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर ब्रेक, धमाल 4 अन् द ओडीसीचा धुमाकूळ; आत्तापर्यंत कुणी किती कमावले?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Munde FDA News: तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
Shivsena Symbol Hearing: शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Embed widget