Akshay Kumar : यंदाच्या वर्षात खिलाडी कुमारचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; दमदार चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
. पाहूयात 2022 मध्ये अक्षय कुमारचे (Akshay Kumar) कोणते चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

Akshay Kumar Upcoming Movies : बॉलिवूडचा 'खिलाडी' अशी ओळख असलेला अभिनेता अक्षय कुमार त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. त्याच्या चित्रपटांना त्याच्या चाहत्यांची पसंती मिळते. 2021 हे वर्ष अक्षयसाठी अत्यंत खास होते. ‘बेलबॉटम’ (BellBottom), ‘सूर्यवंशी’ (Sooryavanshi), ‘अतरंगी रे’ (Atrangi Re) या अक्षयच्या गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. रिपोर्टनुसार 2022 मध्ये अक्षय व्यस्त असणार आहे. पाहूयात 2022 मध्ये अक्षयचे कोणते चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
राम सेतू , पृथ्वीराज,बच्चन पांडे, रक्षाबंधन आणि मिशन सिन्ड्रेला या अक्षयच्या आगामी चित्रपटांची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट पाहात आहेत. यापैकी काही चित्रपटांचे शूटिंग देखील पूर्ण झाले आहे. यावर्षी अक्षय त्याच्या बहुचर्चित गोरखा या चित्रपटाच्या शूटिंगला देखील सुरूवात करणार आहे. या चित्रपटाचे कथानक हे फिल्म मेजर जनरल इयान कार्डोजो यांच्या जीवनावर आधारित असणार आहे.
View this post on Instagram
नुकतीच अक्षयच्या सेल्फी या चित्रपटाची घोषणा झाली. रिपोर्टनुसार अक्षयचा सेल्फी हा आागमी चित्रपट ड्रायविंग लायसेंस या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. तसेच अक्षय यावर्षी ओटीटीवर देखील पदार्पण करणार आहे. त्याच्या दी अँड या सीरिजचे शूटिंग मार्च 2022 मध्ये सुरू होणार आहे.
संबंधित बातम्या
Deepika Padukone : ...म्हणून शूटिंग सेटवर दीपिका घेऊन जाते रंगीत पेन्सिल बॉक्स!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीSamantha, पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
