Akanksha Chamola in Lockup 2: 'गौरव खन्नाऐवजी माझा कुत्रा आला असता तरी...', 'लॅाक अप 2' मध्ये आकांक्षा काय बोलून गेली? नेटकरी भडकले
'लॉक अप 2' चा प्रीमियर एपिसोडमध्येच आकांक्षा चमोलाने ती आणि गौरव खन्ना घटस्फोट घेणार असल्याचा खुलासा केला होता. दोघे एक वर्षापासून वेगळे राहत आहेत.

Akanksha Chamola On Gaurav Khanna:अभिनेत्री आकांक्षा चमोला 'लॅाक अप 2': 'सच या सजा' या शोमुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. आधी बिगबॉस विजेता आणि अभिनेता गौरव खन्नाशी घटस्फोट घेतल्याचा खुलासा केल्यामुळे चाहत्यांसह सगळ्यांनाच धक्का बसला होता. नंतर बायसेक्शुअल असल्याचं सांगितल्यामुळेही तिची चर्चा होती. या शोमध्ये तिच्या खळबळजन खुलाशांची चर्चा असताना , अलिकडेच झालेल्या एपिसोडमध्ये आकांक्षाने शोमध्ये गौरव खन्नाच्या सरप्राइज एंट्रीवर केलेल्या कमेंटची चर्चा आहे. 'गौरव खन्नापेक्षा माझा कुत्रा भेटायला आला असता तर जास्त आनंद झाला असता ' असं आकांक्षा म्हणालीय. तिच्या या वक्तव्यावरून सोशल मीडियावर तिचं ट्रॉलिंग सुरू झालंय. नेमकं काय म्हणाली? पाहूया..
नेमकं काय म्हणाली आकांक्षा चामोला?
खरंतर लॉकअप 2 च्या अलीकडेच झालेल्या एपिसोडमध्ये धीरज धूपरची पत्नी विन्नी अरोड़ा पाहुणी म्हणून आली होती. यावर आकांक्षा चमोला, शिल्पा शिंदे आणि श्रेया कालरा या विषयावर बोलताना दिसून आल्या. आकांक्षा म्हणाली की गौरव खन्नाच्या जागी त्याचे आई-वडील किंवा त्याचा पाळीव कुत्रा आला असता, तर तिला जास्त आनंद झाला असता.
आकांक्षाने पुढे बोलली, गौरवपेक्षा जर माझ्या परिवारामधून कोणी आलं असत.' जेव्हा श्रेयाने त्याच कारण विचारलं, तर त्याने बोल की, 'मला त्या वेळी आपल्या माणसाची गरज होती. मला त्याच्यासाठी नाही, तर माझ्या स्वतःच्या मनःशांती आणि समाधानासाठी.गौरव खन्नापेक्षा माझा कुत्रा मला भेटायला आला असता, तर मी जास्त आनंदी राहिले असते. 'तिचे हे वाक्य ऐकून श्रेया कालरा आणि शिल्पा शिंदे आपलं हसू थांबवू शकल्या नाहीत दोघी जोरजोरात हसू लागल्या.
Chamola says gaurav ki jagah mera kutta hi aa jata,
— Kitabi_kidda (@kitabi_kidda) July 23, 2026
Also says Gaurav is stranger 🙄#Gauravkhanna #Akankshachamola #lockupp2 #lockupp pic.twitter.com/hR1JlQZjrT
आकांक्षाच्या वक्तव्यामुळे नेटकरी संतापले
आकांक्षाचे हे वक्तव्य सोशल मिडियावर खुप व्हायरल होत आहे. अनेकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केलीय. सगळं चर्चेत राहण्यासाठी ती करत असल्याचं काही जण म्हणतायत.. 'लॉक अप 2' चा प्रीमियर एपिसोडमध्येच आकांक्षा चमोलाने ती आणि गौरव खन्ना घटस्फोट घेणार असल्याचा खुलासा केला होता. दोघे एक वर्षापासून वेगळे राहत आहेत. शोच्या एका एपिसोडमध्ये आकांक्षाने हे सांगितलेलं की तिला लहान मुल नको होती. तर, एक दुसर्या एपिसोडमध्ये गौरवला ती बाइसेक्शुअल असल्याचं माहीत असल्याचंही ती म्हणाली होती.






















