Abhishek Pathak Challenge Akshaye Khanna: 'एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखवच...'; 'दृश्यम 3'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला ओपन चॅलेंज
Abhishek Pathak Challenge Akshaye Khanna: 'दृश्यम 3'च्या निर्मात्यांनी अक्षय खन्नावर सिनेमा सोडल्याचा आरोप केला आहे. त्यांनी अभिनेत्याला कायदेशीर नोटीसही बजावल्याचं सांगितलं आहे.

Drishyam 3 Director Abhishek Pathak Challenge Akshaye Khanna: 'धुरंधर' सिनेमाच्या (Dhurandhar Movie) प्रदर्शनापासून बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) अक्षय खन्ना (Akshaye Khanna) चर्चेत आहे. खरंतर सिनेमात रणवीर सिंह (Ranveer Singh) मुख्य भूमिकेत झळकला आहे, पण तरीसुद्धा सर्वाधिक चर्चा अक्षय खन्नानं साकारलेल्या रहमान डकैतचीच होत असल्याचं पाहायला मिळतंय. सिनेमातला अक्षय खन्नाचा अभिनय, त्याचे डायलॉग्स आणि विशेषतः त्याच्या डान्स स्टेप्सचं सारेच कौतुक करत आहेत. पण, दुसरीकडे मात्र अक्षय खन्ना काहीसा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं पाहायला मिळतंय. अक्षय खन्नानं अजय देवगणच्या (Ajay Devgn) 'दृश्यम 3' (Drishyam 3) सिनेमातून माघार घेतली आहे. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. अक्षय खन्नानं 'दृश्यम 3'मधून एग्झिट घेतल्यानं अक्षय खन्ना आणि चित्रपट निर्मात्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे.
'दृश्यम 3'च्या निर्मात्यांनी अक्षय खन्नावर सिनेमा सोडल्याचा आरोप केला आहे. त्यांनी अभिनेत्याला कायदेशीर नोटीसही पाठवली आहे. 'दृश्यम'चे निर्माते आणि अक्षय खन्ना यांच्यातील हा वाद वाढत चालला आहे. आता, 'दृश्यम 3'च्या दिग्दर्शकानं अक्षय खन्नाला ओपन चॅलेंज दिलं आहे.
'दृश्यम 3'चा दिग्दर्शक नेमकं काय म्हणाला?
इ टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक पाठक म्हणाला, "नोव्हेंबरमध्ये कॉन्ट्रॅक्ट साइन केल्यानंतर हे सगळं झालं. त्याने शूटिंग सुरु होण्याच्या पाच दिवस आधी सिनेमा सोडला. लूकही लॉक झाला होता, कॉस्च्युम बनले होते, नरेशन झालं होतं आणि त्याला आवडलंही होतं. 'धुरंधर' रिलीजच्या एक दिवस आधी त्याने सिनेमा सोडला. त्याला सिनेमात विग घालायचा होता. मात्र 'दृश्यम 2' जिथे संपला तिथूनच 'दृश्यम 3' सुरु होणार आहे. त्यामुळे अक्षयला मी विग घालायला परवानगी दिली नाही. मी त्याच्याशी चर्चा केली आणि त्याला समजावलं. पण त्याने ऐकलं नाही. आपण पुढे पाहू असं मी त्याला सांगितलं पण त्याने सिनेमा सोडला."
अक्षय आणि निर्मात्यांमधील वाद कसा सुरू झाला?
अक्षय खन्नानं 'धुरंधर' सिनेमा प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधीच 'दृश्यम 3' सिनेमा सोडल्याचा खुलासा दिग्दर्शक अभिषेक पाठकनं केला. सुरुवातीला वाद तेव्हा सुरू झाला, जेव्हा अभिनेत्यानं सिनेमात विग घालण्याची अट घातली. दिग्दर्शकाचं म्हणणं आहे की, सिनेमा जिथे संपला, तिथूनच सुरू होणार असल्यामुळे, तिसऱ्या भागात अक्षयचं पात्र विग घालू शकत नाही.
अक्षय खन्नानं 'दृश्यम 3'साठी 21 कोटी रुपये मागितले?
'दृश्यम 3'चा दिग्दर्शक अभिषेक पाठक म्हणाला की, "तो या मुद्द्यावर अक्षय खन्नाशी बोलला आणि त्याला समजवण्यातही यशस्वी झाला, पण काही दिवसांनी अक्षय खन्नानं पुन्हा तिच मागणी केली. त्यानंतर मी (अभिषेक पाठक) अक्षय खन्नाला विश्वास दिला की, लवकरच यावर आपण तोडगा काढूयात... पण, तेवढ्यात अक्षय खन्नानं प्रोजेक्टमधून एग्झिट घेतली... " दरम्यान, दिग्दर्शकानं अक्षयला चित्रपटासाठी 21 कोटी रुपये देण्यात आल्याच्या अफवा देखील फेटाळून लावल्या आणि असा दावा केला की, अक्षय स्वतः अशा अफवा पसरवत आहेत.
'दृश्यम 3'चा दिग्दर्शक अभिषेक पाठक पुढे बोलताना म्हणाला की, "मला वाटतं अक्षयच्या आजूबाजूच्या लोकांनीच त्याच्या डोक्यात तो सुपरस्टार होईल असं भरवायला सुरुवात केली. मला वाटतं आता त्यानं स्वत:साठी नक्की काय चांगलं आहे, याचा विचार करावा. मी त्याला शुभेच्छा देतो. मला वाटतं त्यानं आता एक सोलो सिनेमा करण्याचा प्रयत्न करावा. जेव्हा त्याच्याकडे काहीच उत्तर नसतं, तेव्हा त्याला काय बोलायचं कळत नाही. हा अगदीच मूर्खपणा आहे, कारण आम्ही एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखतो. मी त्याच्याशी बोलणं थांबवलं कारण एका पॉइंटला त्याच्याशी बोलून उपयोग नाही असं मला वाटलं. तो वेगळ्याच ग्रहावर आहे..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :























