एक्स्प्लोर

Marathi Natak: अतुल परचुरेंच्या निधनानंतर तेच नाटक रंगभूमीवर, 20 वर्षांनी पुन्हा तीच धम्माल, 'ए.. भाऊ डोकं नको खाऊ'चा शुभारंभ; कुठे अन् कधी पाहाल?

Ae Bhau Doka Nako Khau After 20 Years: 20 वर्षांनंतर 'ए.. भाऊ डोकं नको खाऊ!' पुन्हा रंगभूमीवर.

Ae Bhau Dokan Nako Khau: काही नाटकं (Theatre) केवळ मनोरंजन (Entertainment) करत नाहीत तर, काही अजरामरही होतात. तब्बल 20 वर्षांपूर्वी रंगभूमीवर गाजलेलं 'ए.. भाऊ डोकं नको खाऊ!' (Ae Bhau Doka Nako Khau) हे नाटक पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रॉयल थिएटर आणि निर्माते मिहिर गवळी यांच्या या नव्या प्रयोगाचे दिग्दर्शक संतोष पवार  असून, त्यांनी या नाटकातून या प्रवासातील काही अत्यंत हळवे पैलू उलगडले आहेत.

'ए.. भाऊ डोकं नको खाऊ!' या नाटकानिमित्त अतुल परचुरेच्या आठवणी ताज्या झाल्या (Classic Marathi Play Ae Bhau Dokan Nako Khau!)

'ए.. भाऊ डोकं नको खाऊ!' हे नाटक पुन्हा सुरू होत आहे. या प्रसिद्ध नाटकात विनोदाची अप्रतिम जाण असलेले अतुल परचुरे यांची महत्त्वाची भूमिका होती. आज कलाकार अतुल परचुरे आपल्यात नाहीत.  त्यांची जागा घेण्यासाठी संतोष पवारांनी अशा एका व्यक्तीची निवड केली आहे, जो अतुलचा केवळ सहकलाकार नव्हता, तर त्याचा शाळकरी मित्रही होता, तो कलाकार म्हणजे विनय येडेकर.

संतोष पवार भावूक होत म्हणतात, "आम्हाला या भूमिकेसाठी असा कलाकार हवा होता, ज्याची स्वतःची एक स्वतंत्र शैली असेल. जो या पात्राला पूर्णपणे न्याय देईल. विनय आणि अतुल हे जिवलग मित्र होते. त्यामुळे या नाटकाचा वारसा पुढे नेण्यासाठी विनयशिवाय दुसरा चांगला पर्याय असूच शकत नव्हता", असं संतोष म्हणाले. "जरी दोघांच्या कामाच्या पद्धती वेगळ्या असल्या, तरी या मंचावर विनय जेव्हा वावरतो, तेव्हा त्या अभिनयात कुठेतरी अतुलच्या मैत्रीची सावली नक्कीच जाणवते", असंही संतोष पवार म्हणाले.

'बिटवीन द लाईन्स' दडलेली संहितेची जादू (Ae Bhau Dokan Nako Khau! Reopens Curtains with New Cast)

नाटकाच्या संहितेबद्दल बोलताना संतोष पवार म्हणतात, "गंमत म्हणजे, 20 वर्षांपूर्वी जेव्हा हे नाटक पहिल्यांदा माझ्यासमोर वाचलं गेलं होतं, तेव्हा ते मला फारसं आवडलं नाही. पण एक वर्षानंतर जेव्हा तीच संहिता पुन्हा माझ्या हातात आलीये, तेव्हा मी विनंती केली की मला वाचायला द्या, आणि जेव्हा मी स्वतः वाचलं तेव्हा कळलं हे एक परिपूर्ण नाटक आहे. एकाहून एक  कॅरेक्टर्स, धमाल प्रसंग, आणि खरंच डोक्याला गुदगुल्या करणारी कथा आहे. प्रेक्षकांना एका नाटकातून जे जे हवं असतं ते ते सर्व या नाटकात आहे, हे जाणवलंय. त्याप्रमाणे नाटक केलं आणि नाटकाने इतिहास घडवला. आज 20 वर्षांनंतर नव्या संचात, पुन्हा  हे नाटक नव्याने करताना एक वेगळंच समाधान मिळत आहे."

प्रेक्षकांचा विश्वास: एक प्रामाणिक प्रवास

दिग्दर्शक म्हणून संतोष पवार नेहमीच आपल्या मतांशी ठाम राहिले आहेत, यासाठी त्यांच्यावर टीकाही झाली, पण रंगभूमीवरचा त्यांचा प्रामाणिकपणा कधी ढळला नाही. "मी कधीही केवळ 'करायचं' म्हणून नाटक करत नाही. रसिक मायबाप प्रेक्षक जेव्हा तिकीट काढून येतात, तेव्हा त्यांचा माझ्यावर एक विश्वास असतो. तो विश्वास जपण्यासाठी मी प्रत्येक प्रयोगात माझं 100 टक्के देतो. आज मी जे काम करतोय, त्यावरच माझ्या पुढच्या नाटकाचं भविष्य अवलंबून असतं, याची मला जाणीव आहे. हे नाटक म्हणजे केवळ विनोद नाही, तर आमच्या मैत्रीची आणि रंगभूमीवरील निष्ठेची ही एक छोटीशी भेट आहे."

तगडा नटसंच आणि प्रयोगांचे वेळापत्रक

विनय येडेकर यांच्या सोबत संतोष पवार यांची अभिनयाची खडक धमाल खडाजंगी रंगणार आहे. त्यात  आनंदा कारेकर, सानिका शिंदे, सोनाली मगर, आदित्य गटे आणि संकेत बिवलकर हे कलाकार आपल्या अभिनयाने रंग भरणार आहेत. संदेश बेंद्रे (नेपथ्य), शीतल तळपदे (प्रकाश योजना), आशुतोष वाघमारे (संगीत) आणि हास्या पवार (वेशभूषा) यांनी हे नाटक नव्या ढंगात सजवले आहे.

शुभारंभाचे प्रयोग कुठे अन् किती वाजता? (Ae Bhau Dokan Nako Khau Marathi play comeback)

1 मे 2026 (शुक्रवार): रात्री 8.30 वाजता - यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा.

2 मे 2026 (शनिवार): दुपारी 4.00 वाजता - मीनाताई ठाकरे नाट्यगृह, बोरिवली.'

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Bigg Boss मराठीच्या सहाव्या सिझनचा धमाका; फिनालेने मोडले सर्व रेकॉर्ड्स, शो ठरला नंबर 1

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jackie Shroff : जॅकी दादा नेहमी सोबत झाड का घेऊन फिरतात? त्यांच्या कुंडलीमध्ये काय होतं? नेव्हीमध्ये न जाता ते 'हिरो' कसे बनले? रंजक किस्सा
जॅकी दादा नेहमी सोबत झाड का घेऊन फिरतात? त्यांच्या कुंडलीमध्ये काय होतं? नेव्हीमध्ये न जाता ते 'हिरो' कसे बनले? रंजक किस्सा
OTT Horror Thriller: दिवसा पाहतानाही उडेल थरकाप! JioHotstar वरील वर्षभरापूर्वीचा हा हॉरर थ्रिलर पाहण्याचं धाडस कराल?
दिवसा पाहतानाही उडेल थरकाप! JioHotstar वरील वर्षभरापूर्वीचा हा हॉरर थ्रिलर पाहण्याचं धाडस कराल?
Medha Manjrekar : महेश मांजरेकरांच्या पत्नी मेधा मांजरेकर यांना कॅन्सर? सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टने वेधले लक्ष
महेश मांजरेकरांच्या पत्नी मेधा मांजरेकर यांना कॅन्सर? सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टने वेधले लक्ष
'धुरंधर 2'फेम गायिकेनं भर कॉन्सर्टमध्ये केली साखरपुड्याची घोषणा; स्टेजवर होणाऱ्या नवऱ्याला घेऊन आली अन् .. 
'धुरंधर 2'फेम गायिकेनं भर कॉन्सर्टमध्ये केली साखरपुड्याची घोषणा; स्टेजवर होणाऱ्या नवऱ्याला घेऊन आली अन् .. 
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget