एक्स्प्लोर

Aditi Dravid : पॅकअप झाल्यानंतरची 'ती' रात्र ते मुंबईत स्वत:च्या हक्काचं घरं, अदिती द्रविडने शेअर केला स्वप्नांचा प्रवास 

Aditi Dravid : अभिनेत्री अदिती द्रविड हिने नुकतच मुंबईत स्वत:चं घर घेतलं आहे. त्यानंतर तिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केलीये. 

Aditi Dravid : स्वप्नांची मायानगरी म्हणून ओळख असलेल्या मुंबईत स्वत:चं हक्काचं घरं असावं, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. बाहेरुन आलेल्या प्रत्येकाला मुंबई सहज आपलंस करते. पण या शहरामध्ये आपलं म्हणावं असं हक्कचं छप्पर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. सामन्यांपासून ते अगदी मोठ मोठ्या उद्योगपतींपर्यंत हे स्वप्न इथे आलेला प्रत्येकजण त्या स्वप्नासाठी झटत असतो. कलाकार मंडळीही त्याला अपवाद नाहीत. अनेक कलाकार मंडळी अभिनयाच्या कास धरत मुंबईची वाट पकडतात आणि या शहराला आपलंसं करुन घेतात. अनेक कलाकार मंडळींनी आतापर्यंत मुंबईत हक्काचं घर घेतलं आहे तर अजूनही अनेकजण त्यासाठी झटत आहेत. अभिनेत्री अदिती द्रविड (Aditi Dravid) हिने देखील नुकतच मुंबईत तिच्या हक्कच्या घराचं स्वप्न पूर्ण केलं. त्यासाठी तिने सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. 

अदितीने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर तिच्या नव्या घरात गृहप्रवेश केला होता. तिचे फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यावर अनेकांनी कमेंट्स करत तिचं अभिनंदन देखील केलंय. त्यातच आता तिने तिच्या घराची नेमप्लेट शेअर केली आहे. त्यावर तिने घर घेण्यापर्यंतच संपूर्ण प्रवास मांडला आहे. तिच्या या पोस्टवरही अनेकांनी कमेंट्स करत तिचं कौतुक केलं आहे. 

अदितीची पोस्ट नेमकी काय?

अदितीने म्हटलं की, '2015 ला पहिल्यांदा मुंबईत आले होते. त्यानंतर अनेक घरं बदलली. रेंट नी,रुम वर ,शेयरिंग मधे,roommates सोबत,सर्व काही! चांगले वाईट अनुभव घेत अभिनयचा प्रवास चालू होता! 2019 मध्ये एक शॉर्टफिल्म शूट करत होते. Covid चा काळ असल्याने तेव्हा रेंट च घर सोडलं होतं. एका दिवसात शूट संपणं अपेक्षित होतं म्हणून कुठेही सोय बघून ठेवली नव्हती. पॅकप होताना समजलं की अजून एक दिवस शूट वाढलं आहे! अणि कोणतीही alternative सोय करायचा आत दिग्दर्शक "PACKUP” म्हणले अणि एका क्षणात १०० लोकांनी गजबजलेला set, पूर्ण रिकामा झाला! बरीच रात्र झाली होती,काय करावं काही सुचेना! मला ऐनवेळी तिथे रेवती लिमये भेटली आणि अडचण कळताचक्षणी ती मला तिच्या घरी घेऊन गेली. पण ती पूर्ण रात्र झोप लागली नाही. विचार करत राहिले आणि स्वतःच घर घ्यायचं हे त्याच रात्री ठरवलं! त्यानंतर 4 वर्ष गेली,कष्ट आणि आई वडिलांच्या आशीर्वादानी आज Finally हे धडतयं! Still can’t believe it’s true! Thankful for everyone who stood by me in this journey!खरं म्हणतात, मुंबई सपनों का शेहेर हैं! And iam Falling in love with her all over again!' 

View this post on Instagram
 
A post shared by Aditi Vinayak Dravid (@aditi_vinayak_dravid)

अदिती द्रविड ही मालिकांमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील तिच्या ईशा नावाच्या व्यक्तीरेखेला विशेष पसंती मिळाली होती. त्यानंतर ती सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतूनही प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. पण अदितीने केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा या सिनेमात मंगळागौरीचं गाणं लिहिलं, जे बरंच गाजलं. त्या गाण्यानेही अदितीला विशेष ओळख मिळवून दिली.  

ही बातमी वाचा : 

Divya Agarwal : घटस्फोटाच्या चर्चांवर दिव्या अग्रवालने अखेर सोडलं मौन, म्हणाली, 'प्रत्येक गोष्टीचा शेवट गोडच...' 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Full : महायुतीत खलबंत ते ठाकरेंची पालिकेसाठी रणनीती; झीरो अवरमध्ये सविस्तर विश्लेषणBharat Gogawale Zero Hour : पाऊण तास खलबतं...शिंदे-फडणवीसांच्या बैठकीत काय ठरलं? गोगावले EXCLUSIVEZero Hour Ramakant Achrekar Memorial : आचरेकर सरांच्या स्मारकाचं राज - सचिन यांच्या हस्ते उद्घाटन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
Embed widget