एक्स्प्लोर

Adinath Kothare: OTT वर मराठी कंटेंटचा गेम बदलतेय आदिनाथ कोठारेची वेब सिरिज; सांगितल्या सेटवरच्या ‘त्या’ खास गोष्टी

Adinath Kothare :मराठी OTT कंटेंट कसा बदलतोय आणि प्रादेशिक कथाकथनाला कसा नवा आयाम मिळतोय, यावरही त्याने आपलं मत मांडलं.

Adinath Kothare: मराठी मनोरंजन विश्वात सध्या OTT प्लॅटफॉर्मवरच्या कंटेंटची जोरदार चर्चा रंगताना दिसतेय. विविध धाटणीच्या कथा आणि प्रयोगशील विषयांमुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधलं जात असताना, आदिनाथ कोठारे याची ‘डिटेक्टिव्ह धनंजय - रहस्यजाळ’ ही वेब सिरीज  विशेष चर्चेत आली आहे. या सिरीज मधील  आपल्या व्यक्तिरेखेपासून ते शूटिंग लोकेशनपर्यंत अनेक खास गोष्टींवर आदिनाथने मोकळेपणाने  गप्पा मारल्या. शिरगावच्या सेटिंगमुळे निर्माण झालेली गूढता, सेटवरील इम्प्रोव्हायझेशन, आणि धनंजय या व्यक्तिरेखेसोबत जुळलेलं नातं याबद्दल त्याने अनेक रंजक खुलासे केले. त्याचबरोबर मराठी OTT कंटेंट कसा बदलतोय आणि प्रादेशिक कथाकथनाला कसा नवा आयाम मिळतोय, यावरही त्याने आपलं मत मांडलं.

1. शिरगावच्या गूढ लोकेशनची जादू

या शोचं बरंचसं शूटिंग भोरजवळ करण्यात आलं असून, त्या परिसरातील निसर्ग आणि गावांचं वातावरण खूप वेगळं आणि खास असल्याचं आदिनाथने सांगितलं. तो म्हणाला ' लोकेशनने नक्कीच आम्हाला हवी होती ती वाइब दिली. शोचा बराचसा भाग भोरजवळ शूट केला आहे, आणि तिथला निसर्ग व गावांचं वातावरण खूप वेगळं आणि खास आहे. आम्ही निर्माण केलेल्या काल्पनिक शिरगावला त्या ठिकाणामुळे एक गूढता आणि रहस्यमयपणा मिळाला.' 

2. सेटवरची इम्प्रोव्हायझेशनची केमिस्ट्री

शूटिंगदरम्यान छोटूसोबतच्या सीनमध्ये बऱ्याच गोष्टी इम्प्रोव्हाइज केल्याचं आदिनाथने सांगितलं. माझ्या आणि छोटूच्या केमिस्ट्रीमधला बराचसा भाग सेटवर इम्प्रोव्हाइज केला होता, जो रंगा गोडबोले यांनी मार्गदर्शन करत विकसित केला. आम्ही एक खास मॅनरिझम तयार केलं, जिथे छोटू त्याच्या निरागसतेत काहीतरी बोलतो आणि धनंजय त्याला दुरुस्त करतो. तो त्याला त्रास देत नाही, पण कान धरून “एक फटका देईन” असं म्हणतो, आणि छोटू गोंडस पपी फेस करून होकार देतो. आम्हाला वाटलं की यामुळे त्यांच्या केमिस्ट्रीमध्ये छान रंग भरला, आणि ही कल्पना रंगा दादांची होती. आमच्याकडे एक उत्कृष्ट दिग्दर्शक होता, ज्यामुळे धनंजय आणि छोटूची केमिस्ट्री इतकी छान खुलून आली. ' असं आदित्य म्हणाला.

3. धनंजयमधल्या सूक्ष्म गोष्टींकडे लक्ष

आदित्य म्हणाला 'मला आशा आहे की प्रेक्षक सगळ्या गोष्टी लक्षात घेतील. आजकालचे प्रेक्षक खूप स्मार्ट आहेत; ते अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीही ओळखतात, त्यामुळे त्यांनी ते पाहावं आणि शोचा आनंद घ्यावा, अशी माझी अपेक्षा आहे. '

4. प्रत्येक व्यक्तिरेखेतून काहीतरी जपून ठेवतो

लहानसहान गोष्टींवर बारकाईने लक्ष देणं, शंका घेणं आणि सतर्क राहणं—हे गुण माझ्यात आधीपासून आहेत. मी काही बाबतीत थोडा OCD आहे, त्यामुळे फक्त ते गुण अधिक ठळक करावे लागले. पण ते खूप जास्त वाढवणं योग्य नाही, कारण अति शंका घेणं समस्याही बनू शकतं. धनंजय यात संतुलन ठेवतो—गरज असेल तेव्हा सतर्क आणि बारकाईने पाहणारा, आणि त्याच वेळी वास्तववादी राहणारा. हे संतुलन खूप महत्त्वाचं आहे आणि ते माझ्यासोबत राहिलं आहे. असं आदित्य कोठारेनं सांगितलं .

तो पुढे म्हणाला,'मी प्रत्येक व्यक्तिरेखेतून काहीतरी जपून ठेवतो. उदाहरणार्थ, 100 Days मधील अजय ठाकूरचं बॅज अजून माझ्याकडे आहे. नशिबवान या मालिकेतलं एंगेजमेंट रिंग आहे. पाणी मधील हनुमान केंद्रेची तुलसी माळ माझ्याकडे आहे. आणि डिटेक्टिव्ह धनंजय - रहस्यजाळ साठी, मी त्याचे चष्मे जपून ठेवले आहेत, कारण ते माझ्यासाठी खूप खास होते. '

5. OTT वर मराठी कंटेंटचा नवा काळ

मराठी ZEE5 इतकं उत्तम कंटेंट सादर करत आहे याबद्दल मी खूप आभारी आहे. देवखेळ, उमेश कामत आणि प्रिया बापट यांचं हे काय नवीन, आणि डिटेक्टिव्ह धनंजय - रहस्यजाळ यांसारख्या प्रोजेक्ट्समधून ते वेगवेगळ्या प्रकारच्या कथा मांडत आहेत. ते प्रयोगशील आहेत, स्टीरिओटाइप्स मोडत आहेत, आणि विविध फॉरमॅट्स व जॉनर्स ह्यूमर, डार्क ह्यूमर, क्राइम ड्रामा, फॅन्टसी, हॉरर यांचा शोध घेत आहेत, जे खूपच छान आहे. ZEE5 च्या प्रोग्रामिंग टीमला हेमा, कल्याणी सलाम. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी कंटेंट उत्तम हातात आहे. प्रादेशिक कंटेंटसाठी हा खूप चांगला काळ आहे, कारण प्लॅटफॉर्म्स मराठी कंटेंटमध्ये गुंतवणूक करत आहेत आणि त्याचं उत्तम प्रमोशनही करत आहेत. असं आदित्य कोठारेने सांगितलं.

 

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Tarde: नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
‘मी संसार माझा रेखिते’मध्ये नवरात्री स्पेशल महाट्विस्ट; लेकीच्या संरक्षणासाठी अनुप्रिया धारण करणार दुर्गेचं रूप
‘मी संसार माझा रेखिते’मध्ये नवरात्री स्पेशल महाट्विस्ट; लेकीच्या संरक्षणासाठी अनुप्रिया धारण करणार दुर्गेचं रूप
Bharat Jadhav Webseries: भरत जाधव नव्या अंदाजात, वेब शोमध्ये झळकणार, 'कोण यशवंत पानसरे' चर्चेत; कोर्ट रुम ड्रामा कुठे अन् कधी पाहता येणार?
भरत जाधव नव्या अंदाजात, वेब शोमध्ये झळकणार, 'कोण यशवंत पानसरे' चर्चेत; कोर्ट रुम ड्रामा कुठे अन् कधी पाहता येणार?
Naach Na Marathi Song: महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम
महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget