रवीना टंडनच्या 'टिप टिप बरसा'वर लेक राशा थडानीचा डान्स, व्हिडीओ व्हायरल
Actress Rasha Thadani dance : अभिनेत्री राशा थडानीचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.

Actress Rasha Thadani dance : अभिनेत्री रवीना टंडनची (Actress Raveena Tandon) मुलगी राशा थडानी (Actress Rasha Thadani) हिने नुकतेच सिनेक्षेत्रात पदार्पण केले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या राशा थडानीने तिच्या आईच्या गाण्यावर डान्स केलाय. रवीना टंडनच्या (Actress Raveena Tandon) 'टिप टिप बरसा पाणी' या गाण्यावर तिचीच लेक राशा हिने (Actress Rasha Thadani) भन्नाट डान्स केलाय. राशाच्या (Actress Rasha Thadani) हा व्हिडीओवर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. लोकांनी या व्हिडीओवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.
View this post on Instagram
राशा थडानीने केलेला डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका अवॉर्ड शोमध्ये राशाने दिलेल्या या परफॉर्मन्सने प्रेक्षकांची मने जिंकली असून, तिच्या आत्मविश्वासपूर्ण आणि आकर्षक सादरीकरणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या साऊथ अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या तुलनेतही राशाच्या डान्सने अधिक लक्ष वेधले, असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.
View this post on Instagram
राशा थडानीने 2025 मध्ये 'आझाद' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अभिषेक कपूर दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण आणि त्यांचा पुतण्या आमन देवगण यांच्यासोबत राशाने प्रमुख भूमिका साकारली. चित्रपटातील 'उई अम्मा' या गाण्यातील तिच्या डान्सने विशेष लोकप्रियता मिळवली असून, या गाण्याला यूट्यूबवर 125 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. डान्ससोबतच राशा गायनातही पारंगत आहे. तिच्या अलीकडील 'व्हॅलेरी' या अॅमी वाइनहाउसच्या गाण्याच्या सादरीकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय.
राशासाठी 2025 हे वर्ष अनेक दृष्टीने महत्त्वाचे ठरले आहे. तिच्या 20 व्या वाढदिवसाच्या पार्टीतही तिने 'उई अम्मा'वर आई रवीना टंडनसोबत डान्स करत सर्वांचे लक्ष वेधले. राशा थडानीने तिच्या अभिनय, डान्स आणि गायनाच्या कौशल्याने अल्पावधीतच चाहत्यांच्या मनात स्थान मिळवले आहे. तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता असून, ती बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करेल, अशी चर्चा रंगली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























