'ओह माय गॉड 3' मध्ये झळकणार 90sची अभिनेत्री; साकारणार देवीची भूमिका, अक्षय कुमारचा पत्ता कट?
Akshay Kumar and Rani Mukerji to Share Screen: ओह माय गॉड 3मध्ये राणी मुखर्जी देवीच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण.

Akshay Kumar and Rani Mukerjee: अक्षय कुमार (Akshay Kumar) अभिनीत 'ओह माय गॉड' या चित्रपटाचे आधीच दोन भाग प्रदर्शित झाले आहेत. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. आता तिसर्या भागाची चर्चा आहे. लवकरच चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. या चित्रपटात अभिनेत्री राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. या चित्रपटात राणी मुखर्जी देवीची भूमिका साकारणार आहे. अक्षय कुमार आणि राणी मुखर्जी पहिल्यांदाच या चित्रपटातून स्क्रीन शेअर करणार असल्याची माहिती आहे. मात्र, फिल्ममेकर्सने अद्याप याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.
ईटाइम्सच्या रिपोर्ट्सनुसार, 'ओह माय गॉड 3' या चित्रपटात अभिनेत्री राणी मुखर्जी ही प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याची माहिती आहे. या चित्रपटात राणी मुखर्जी देवीच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षय कुमार पहिल्या दोन भागांमध्ये होता. पण 'ओह माय गॉड 3' या चित्रपटात अक्षय कुमार छोट्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'ओह माय गॉड 3' हा चित्रपट पूर्णपणे वेगळा असणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारचा कॅमिओ रोल असणार असल्याची माहिती आहे.
अक्षय कुमारचा कॅमिओ रोल
View this post on Instagram
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "ओह माय गॉड 3 या चित्रपटात एक देवी असेल. या देवीमुळे पूर्ण चित्रपटाची कथा बदलेल. या चित्रपटात अक्षय कुमारचा रोल लहान आणि कमी वेळाचा असेल. त्याचं एक किंवा दोन दिवसांमध्ये शूटिंग पूर्ण होईल". दरम्यान, या चित्रपटाचे चित्रीकरण 2026मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या या चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. या चित्रपटाच्या तिसऱ्या सिक्वेलमध्ये एक नवीन निर्माता असणार आहे. तर, आमिर राय हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करतील.
28 सप्टेंबर 2012 रोजी प्रदर्शित झालेला ओह माय गॉड हा चित्रपट 20 कोटी रूपयांच्या बजेटमध्ये तयार झाला होता. या चित्रपटाने 81.47 कोटी रूपयांची कमाई केली होती. तर, वर्ल्डवाइड या चित्रपटाने 149.90 कोटी रूपयांची कमाई केली होती. तर, 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या ओह माय गॉड 2 या चित्रपटाने 151.16 कोटी रूपयांची बॉक्स ऑफिसची कमाई केली. तर, वर्ल्डवाइड या चित्रपटाने 221.75 कोटी रूपये कमावले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आता या चित्रपटाचा तिसरा पार्ट प्रदर्शित होणार आहे.
























