मुंबई : नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी दिग्दर्शित केलेला फँड्री हा चित्रपट चांगलाच गाजला. देश-विदेशात या चित्रपटाची चर्चा झाली. या मराठी चित्रपटाने व्यवस्थेला अनेक प्रश्न विचारले. सोबतच या चित्रपटाने जब्या आणि शालू ही दोन पात्रे अजरामर केली. या चित्रपटात जब्याची भूमिका सोमनाथ अवघडे (Somnath Awghade) तर शालूचं पात्र राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) या तरुण कलाकारांनी साकारलं होतं. हे दोन्ही कलाकार एकत्र आले, की त्यांची सगळीकडे चर्चा होते. दरम्यान, आता याच जब्या आणि शालूचा एका फोटो प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोकडे पाहून जब्या आणि शालू यांनी लगीनगाठ बांधली आहे का? असं विचारलं जातंय.
वर लग्नमंडप अन् डोक्याला बाशिंग
अभिनेत्री राजेश्वरी खरातने इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सोमनाथ अवघडे आणि स्वत: राजेश्वरी दिसत आहेत. विशेष म्हणजे हे दोघेही लग्नमंडपात बसल्याचं दिसतंय. राजेश्वरी आणि सोमनाथच्या डोक्याला बाशिंग आहे. राजेश्वरीने पिवळी साडी परिधान केलेली आहे, तर सोमनाथ पांढऱ्या शुभ्र कपड्यांत दिसतोय. हा एक फोटो पाहून या दोघांचं मनोमिलन झालेलं असून ते लग्नाच्या बोहल्यावर चढले आहेत का? असं विचारलं जातंय.
सोमनाथ, राजेश्वरीला हळद लागली?
या फोटमध्ये दोघांच्याही कपाळाला बाशिंग दिसत आहे. सोबतच राजेश्वरी खरातच्या पुढे हळदीने भरलेलं एक ताट दिसतंय. या ताटामध्ये हळद आणि गुलाबाची फुलं दिसतायत. दुसऱ्या एका ताटात हळद, कुंकू, हळकुंड दिसतंय. लग्नाआधी हळदीचा जो कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमाची तयारी अशाच पद्धतीने केली जाते. त्यामुळेच राजेश्वरी खरातने पोस्ट केलेल्या फोटोमधील तामजाम पाहून या दोघांना आता हळद लागत असून ते लग्नबंधनात अडकत आहेत का? असं विचारलं जातंय.
हा फोटो राजेश्वरी, सोमनाथच्या आगामी प्रोजेक्टचा भाग?
दरम्यान, याआधीही ही जोडी अनेकवेळा एकत्र दिसलेली आहे. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यांनी आपापल्या इन्स्टाग्रामवर एकमेकांसोबतचे अनेक फोटो आणि रिल्स पोस्ट केलेले आहेत. त्यामुळेच या दोघांचा एकमेकांसोबतचा बॉण्ड पाहून त्यांनी लग्न केलंय का? अशी विचारणा त्यांच्या फॅन्सकडून केली जात आहे. खरं म्हणजे हा फोटो त्यांच्या आगामी प्रोजेक्टचा एक भाग आहे का? अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या फोटोमागचा नेमका अर्थ काय? हे आगामी काळात लवकरच स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा :
Prime Video वरच्या 'या' 5 हिंदी कॉमेडी वेब सिरीज पाहिल्यात का? नक्की पाहा, खळखळून हसवतात!
प्रसिद्ध अभिनेत्रीची पर्स आणि सोनसाखळी चोरीला, दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी सर्वच हिसकावलं