Prime Video Top 5 Comedy Web Series: OTT च्या जगात रोज नवनवीन चित्रपट आणि वेब सिरीज येत असतात. अनेक वेब सीरिज अशा आहेत की, ज्यांची चाहते आतुरतेनं वाट पाहत असतात. पण, सध्या ओटीटीवर कॉमेडी वेब सीरिजची विशेष चर्चा रंगते. अनेक कॉमेडी वेब सीरिज गाजल्या आहेत. अनेकजण तर या वेब सीरिज पुन्हा-पुन्हा पाहतात. अशाच ओटीटी प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडीओवरच्या काही कॉमेडी वेब सीरिज फारच गाजल्या आहेत. पाहुयात, Amezone Prime Video वरच्या बेस्ट 5 Comedy Web Series... 


माइंड द मल्होत्रास (Mind the Malhotras)



माइंड द मल्होत्रास हा कॉमेडी ड्रामा आहे. ज्यामध्ये विवाहित जोडप्याला कोणत्या प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो, हे दाखवण्यात आलं आहे. पण, संपूर्ण सीरिज एका विनोदी शैलीतून विवाहित जोडप्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या शोमध्ये सायरस साहुकर आणि मिनी माथूर मुख्य भूमिकेत दिसत आहेत.


हॉस्टेल डेज (Hostel Days)



ॲमेझॉन प्राईम व्हिडीओची हॉस्टेल डेज ही एक लोकप्रिय कॉमेडी ड्रामा सीरिज आहे, जी सौरभ खन्ना यांनी तयार केली आहे आणि अभिषेक यादव, सुप्रीत कुंदर, हरीश पेदंती, तल्हा सिद्दीकी यांनी लिहिलेली आहे. तर, या सीरिजचं दिग्दर्शन राघव सुब्बू यांनी केलंय. या कॉमेडी वेब सीरिजमध्ये आदर्श गौरव, लव विसपुत, शुभम गौर, निखिल विजय आणि अहसास चन्ना मुख्य भूमिकेत आहेत. या वेब सीरिजचे चार सीझन रिलीज झाले आहेत.


पंचायत (Panchayat)



जितेंद्र कुमार म्हणजेच, प्रेक्षकांचे लाडके सचिवजी... यांनी आपल्या भूमिकेनं गाजवलेली पंचायत केवळ सामाजिक संदेश देत नाही तर, लोकांना खळखळवून हसवते. या मालिकेचे तीन सीझन आलेत आणि तिन्ही सीझन एकदम जबरदस्त होते. प्रत्येक सीझन वेगवेगळ्या समस्येवर लक्ष केंद्रीत करतो. Amazon Prime Video ची ही वेब सिरीज The Viral Fever (TVF) नं तयार केली आहे. तर, या सीरिजची पटकथा चंदन कुमार यांची आहे आणि दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा यांनी केलं आहे. या मालिकेत जीतेंद्र कुमार व्यतिरिक्त रघुबीर यादव, नीना गुप्ता, सान्विका, चंदन रॉय, दुर्गेश कुमार, आलोक पाठक, फैसल मलिक आणि सुनीता राजवार हे प्रमुख भूमिकेत आहेत.


पुष्पावली (Pushpavalli)



पुष्पावली ही देखील एक डार्क कॉमेडी आहे. या सीरिजमध्ये पुष्पावली या मुलीची कहाणी दाखवण्यात आली आहे. एका जॉब इंटरव्ह्यू दरम्यान भेटलेल्या एका मुलासाठी पुष्पावली ऑब्सेस्ड होते. सीरिजमध्ये सुमुखी सुरेश मुख्य भूमिकेत आहे.  


कॉमिकस्तान (Comicstaan)


कॉमिकस्तान एक रियलिटी कॉमेडी शो आहे. ज्यामध्ये कॉमेडियन स्टँडअप करत असल्याचं पाहायला मिळतं. तर, यांना प्रसिद्ध कॉमेडियन जज करतात. परफॉर्म करणारे आपल्या क्लासी स्टाईलनं लोकांना खळखळवून हसवतात. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Deepika Padukone With Mahesh Babu: Singham Again नंतर दीपिका पदुकोण करणार महेश बाबूचा 1000 कोटींचा सिनेमा? राजामौली काहीतरी भन्नाट साकारण्याच्या तयारीत