Health: आजकाल फॅशन किंवा व्यसनाच्या नावाखाली अनेकजण धूम्रपान करतात, आणि त्या लोकांना कर्करोग तसेच विविध आजारांचा धोका असतो, हे आपल्याला माहित आहेच. याबाबत आरोग्य तज्ज्ञ आपल्याला वेळोवेळी सावधही करतात. मात्र अनेक लोक सिगारेट, विडी किंवा इतर कोणत्याही प्रकारचे धूम्रपान करत नाहीत, त्यांनाही फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका असल्याचं समोर आलंय. टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात धक्कादायक बाब समोर आली आहे. जाणून घ्या काय म्हटलंय या अभ्यासात?
2025 पर्यंत रुग्णांची संख्या आणखी वाढणार?
अहवालात दावा करण्यात आला आहे की 2025 पर्यंत शहरी भागात फुफ्फुसाच्या आजाराच्या रुग्णांची संख्या आणखी वाढेल. अहवालानुसार, पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतातील तरुणांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग वाढला आहे. जर आपण आकडेवारीवर नजर टाकली तर, 1990 मध्ये, हा रोग दर 100,000 मध्ये 6.62 आढळला होता, जो 2019 मध्ये वाढून 7.7 प्रति 100,000 झाला.अहवालातील कारणांबाबत स्पष्टीकरण देताना असे सांगण्यात आले की, यामागे अनेक कारणे आहेत, ज्यामध्ये वायू प्रदूषण, दुय्यम धूर आणि अनुवांशिक कारणे प्रमुख आहेत.
पीडितांपैकी 20 टक्के लोकांनी कधीही धूम्रपान केले नाही
या अहवालात प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारने अधिक प्रयत्न करण्यावर भर दिला आहे. त्याच वेळी, लोकांना त्याच्या हानिकारक प्रभावांबद्दल माहिती करून घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. अहवालानुसार, धूम्रपान न करणाऱ्यांसाठी सध्या कोणतेही स्क्रीनिंग मार्गदर्शक तत्त्वे नाहीत, ज्यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात शोधणे कठीण होते. याशिवाय, तपासणी केल्यावर असे आढळून आले की, फुफ्फुसाच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या 10% ते 20% लोकांनी कधीही धूम्रपान केले नाही.
अनुवांशिक कारणंही कारणीभूत
अहवालानुसार, विशेषत: वाहनांच्या प्रदूषणामुळे लोकांची फुफ्फुसे आजारी पडत आहेत. याशिवाय औद्योगिक प्रदूषणामुळे ही समस्या आणखी वाढते. त्याचबरोबर इतरांच्या धुम्रपानामुळे होणारे प्रदूषण आणि इतर अनुवांशिक कारणांमुळे लोकांना फुफ्फुसाचे आजार होत आहेत.
हेही वाचा>>>
Health: मेयोनिज आवडीने खाणाऱ्यांनो सावधान! 100 हून अधिक लोक आजारी, एकाचा मृत्यू, 'या' राज्याने घातली बंदी
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )