एक्स्प्लोर

विक्रम गोखले यांनी दिला दातृत्वाचा धडा; एक एकर चित्रपट महामंडळाला, तर एक सिंटा या संस्थेला

विक्रम गोखले यांची पुण्याजवळच्या नाणे इथे काही जमीन आहे. त्यातली दोन एकर जागा त्यांनी दोन संस्थांना दिली आहे. पैकी एक एकर जागा सिंटा अर्थात सिनेमा आणि टीव्ही कलाकारांच्या संघटनेला तर एक एकर जागा अखिल भारतीय चित्रपट महामंडळाला देण्याचं जाहीर केलं आहे.

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं समाज भान आपण सगळेच जाणतो. समाजातल्या विविध घटकांना वेळोवेळी विक्रम गोखले यांनी मदत केली आहे. त्यांचे वडील चंद्रकांत गोखले यांच्याकडून त्यांनी हा मदतीचा वसा घेतला आहे. आता सध्या कोरोनाने वेढलेल्या परिस्थितीतही गोखले यांनी दातृत्वाचा धडा घालून दिला आहे. त्यांनी पुण्याजवळच्या नाणे गावातली आपली दोन एकर जागा दोन वेगवेगळ्या संस्थांना दान करत असल्याचं जाहीर केलं आहे.

विक्रम गोखले यांची पुण्याजवळच्या नाणे इथे काही जमीन आहे. त्यातली दोन एकर जागा त्यांनी दोन संस्थांना दिली आहे. पैकी एक एकर जागा सिंटा अर्थात सिनेमा आणि टीव्ही कलाकारांच्या संघटनेला तर एक एकर जागा अखिल भारतीय चित्रपट महामंडळाला देण्याचं जाहीर केलं आहे. या जागेवर ज्येष्ठ व निराधार कलाकारांसाठी वृद्धाश्रम काढण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला आहे. एबीपी माझाशी बोलताना विक्रम गोखले म्हणाले, 'कोरोनाच्या काळात सगळेच घटक मदत करत आहेत. ही चांगली बाब आहे. पण ती मदत तात्पुरती आहे. कायमस्वरूपी मदत व्हायला हवी. या कोरोनामुळे अनेकांचा आधार गेला आहे. अनेकांना दोन वेळचं अन्न मिळत नाही. कित्येक लोक एकटे आहेत. त्यांच्यासाठी या जागेवर आश्रम बांधावा असा प्रस्ताव मी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यासमोर ठेवला आहे. त्यांनाही तो प्रकल्प आवडला आहे. याबद्दल माझ्याकडे सर्व प्लॅन तयार असून त्याबद्दल निर्णय घेतले जातील.'

केवळ चित्रपट महामंडळच नव्हे, तर सिंटा म्हणजे सिने अॅण्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशन यांच्या संघटनेलाही त्यांनी एक एकर जागा दिली आहे. सिंटाचे गोखले हे अध्यक्ष आहेत. याबद्दलही ते म्हणाले, 'मी दोन एकर जागा द्यायची ठरवली होतीच. एक एकर तिकडे दिली तर एक एकर सिंटाला दिली. इथेही कलाकार आहेत. नाणे गावातली रस्त्याजवळची जागा मी त्या दोन्ही संस्थांना दिली आहे. म्हणजे माझा तसा मानस आहे.'

त्यातील अर्धा एकर नाट्यपरिषदेलाही?

चित्रपट महामंडळाला दिलेल्या एक एकरापैकी अर्धा एकर जागा मराठी नाट्यपरिषदेला द्यावी का याबद्दलही विचार सुरू आहे अशी माहीती गोखले यांनी दिली. अर्थात त्याबद्दल गोखले यांचं अद्याप परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्याशी बोलणं झालं नाहीय. सिनेमाप्रमाणे नाट्यसृष्टीतही असे ज्येष्ठ कलाकार आहेत. त्यांच्यासाठीही काही करावं या हेतूने परिषदेबाबत विचार पुढे आला असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

Sonu Sood EXCLUSIVE कोरोनाच्या संकटात परप्रांतीय मजुरांसाठी धावून आलेला 'दबंग'सोनू सूद एबीपी माझावर!

महत्त्वाच्या बातम्या

Comedians Harsh Gujral and Madhur Virli: कॉमेडीच्या नावाखाली अश्लील टिप्पणी करणं महागात! समय रैनानंतर हर्ष गुजराल अन् मधुर विरलीच्या अडचणीत वाढ, सायबर सेलचे समन्स
कॉमेडीच्या नावाखाली अश्लील टिप्पणी करणं महागात! समय रैनानंतर हर्ष गुजराल अन् मधुर विरलीच्या अडचणीत वाढ, सायबर सेलचे समन्स
चार स्त्रिया, साडेतीन शक्तिपीठं आणि स्वामींचा दिव्य संकेत; स्त्रीशक्तीच्या जागराची अद्भुत कहाणी उलगडणार, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये काय घडणार?
चार स्त्रिया, साडेतीन शक्तिपीठं आणि स्वामींचा दिव्य संकेत; स्त्रीशक्तीच्या जागराची अद्भुत कहाणी उलगडणार, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये काय घडणार?
Nana Patekar Condolence Meet Varsha Usgaonkar: 'स्वतःला मोठ्ठी हिरोईन समजतेस का?', नाना पाटेकरांनी वर्षा उसगावकरांना सुनावलेलं, नेमकं काय घडलेलं?
'स्वतःला मोठ्ठी हिरोईन समजतेस का?', नाना पाटेकरांनी वर्षा उसगावकरांना सुनावलेलं, नेमकं काय घडलेलं?
Sonali Kulkarni: 'चेहरा आरशात बघ, सावळ्या मुली कॅमेऱ्यासमोर चांगल्या दिसत नाही'; सोनाली कुलकर्णीचा ऑडिशनमधील कटू अनुभव
'चेहरा आरशात बघ, सावळ्या मुली कॅमेऱ्यासमोर चांगल्या दिसत नाही'; सोनाली कुलकर्णीचा ऑडिशनमधील कटू अनुभव

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Crime News: ठाण्यात गुन्हेगारीचा उद्रेक; प्रदीप पूर्णेकरांनंतर आता प्रसिद्ध युट्यूबरला गोळ्या घालून संपवलं, जुन्या पोस्टमध्ये लिहलेलं, माझ्या मृत्यूला..., नेमकं काय घडलं?
ठाण्यात गुन्हेगारीचा उद्रेक; प्रदीप पूर्णेकरांनंतर आता प्रसिद्ध युट्यूबरला गोळ्या घालून संपवलं, जुन्या पोस्टमध्ये लिहलेलं, माझ्या मृत्यूला..., नेमकं काय घडलं?
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
Pune FDA Action: जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
Peshawar School: शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
Sanjay Raut on Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकरांचे मारेकरी काम मागायला मिनाक्षी शिंदेंकडे जायचे, त्यांनी काय काम दिलं... संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकरांचे मारेकरी काम मागायला मिनाक्षी शिंदेंकडे जायचे, त्यांनी काय काम दिलं... संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
Mary Millben Vs Abhijeet Dipke: अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
Beed News: वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
Embed widget