Aboli : स्टार प्रवाहवरील अबोली (Aboli) या मालिकेला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. या मालिकेचे कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. सोनियाच्या खुनाच्या तपासात इन्सपेक्टर अंकुश आणि अबोली एकत्र लढत आहेत. या तपासात अबोली ही महत्वाची साक्षीदार आहे. त्यामुळे सोनियाचा खुन करणाऱ्या विश्वासला अटक करण्यात आली आहे. यातून पळवाट शोधण्यासाठी आता विश्वासने एका वकिलाची मदत घेण्याचं ठरवलं आहे.
विजया राजाध्यक्ष असं या वकिलाचं नाव असून सुप्रसिद्ध अभिनेत्री रेशम टिपणीस (Resham Tipnis) ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. रेशमने बिग बॉस मराठी सिझन 1 मध्ये भाग घेतला होता. या शोमधील रेशमच्या हटके अंदाजाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
अबोली मालिकेतील या व्यक्तिरेखेविषयी सांगताना रेशम टिपणीस म्हणाली, ‘अबोली मालिकेच्या निमित्ताने मी खूप दिवसांनंतर मराठी मालिकेत काम करतेय. जेव्हा या भूमिकेसाठी मला विचारणा झाली तेव्हा हे पात्र मला खूप आवडलं त्यामुळे मी लगेच होकार दिला. विजया राजाध्यक्ष पेशाने वकिल आहे. तिला तिच्या शिक्षणाचा खूप गर्व आहे. कोणतीही केस लढवताना पैसे मिळवणं हा एकच हेतू तिच्या मनात असतो. विजयाच्या एण्ट्रीने मालिकेत नवं नाट्य घडणार आहे.’
संबंधित बातम्या
Tejas Barve and Amruta Dhongade : ‘मिसेस मुख्यमंत्री’ ची जोडी मोठ्या पडद्यावर करणार ‘दिशाभूल’
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha