एक्स्प्लोर

Mithun Controversial Speech : फिल्मी स्टाईलने प्रक्षोभक भाषण, वाढदिवसाच्या दिवशीच पोलिसांकडून मिथुन चक्रवर्ती यांची चौकशी

बंगालच्या निवडणुकांदरम्यान, प्रक्षोभक भाषण दिल्याप्रकरणी आज मिथुन चक्रवर्ती यांची कोलकाता पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.

कोलकाता : बॉलिवूड अभिनेता आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती वाढदिवसाच्याच दिवशी काहीसे अडचणीत आले आहेत. बंगालच्या निवडणुकांच्या दरम्यान, प्रक्षोभक भाषण दिल्याप्रकरणी आज मिथुन चक्रवर्ती यांची कोलकाता पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. व्हर्च्युअल पद्धतीनं ही चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात आक्षेपार्ह आणि असंवैधानिक भाषेचा वापर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. 

नेमका आरोप काय? 
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दरम्य़ान, मिथुन यांच्यावर प्रक्षोभक भाषण केल्याचे आरोप लावत मानिकतल्ला पोलीस स्थानकात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. ज्यामध्ये चक्रवर्ती यांनी 7 मार्च रोजी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत ‘‘मारबो एकहने लाश पोरबे शोशाने’ (तुमचा खात्मा केल्यास मृतदेह स्मशानात जातील) आणि ‘ एक छोबोले चाबी’ (सर्पदंशानंच तुम्ही छायाचित्रात कैद व्हाल) अशी वक्तव्य केली, ज्यामुळंच राज्यात निवडणुकांनंतर हिंसा उसळली असं म्हटलं गेलं. 

लष्कराच्या सामानाची ने-आण करण्यासाठी फ्रेट कॉरिडोरची चाचणी ; रेवाडीहून राजस्थानला पोहोचलं सामान

न्यायालयाकडून चक्रवर्ती यांना चौकशीत सहकार्य करण्याचे आदेश 
निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्यावर दाखल करण्यात आलेल्या या आरोपांच्या विरोधात कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये एफआयआर रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती.

पुढे उच्च न्यायालयानं चक्रवर्ती यांना त्यांचा ई-मेल राज्याकडे सुपूर्द करण्याचा आदेश दिला होता. जेणेकरुन सदर प्रकरणीच्या चौकशीसाठी ते व्हर्च्युइली सहभागी होऊ शकतील. दरम्यान, आपली बाजू मांडताना एफआयआर रद्द करण्याची मागणी करत आपण फक्त चित्रपटातील संवादच म्हटले होते अशी सारवासारव केल्याचं कळत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget