अभिनेत्री मिष्टी मुखर्जीचं निधन, वयाच्या 27 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
बंगाली आणि हिंदी सिनेमांमध्ये काम करणारी अभिनेत्री मिष्टी मुखर्जीचं वयाच्या 27 व्या वर्षी निधन झालं आहे. शुक्रवारी संध्याकाळी बंगळुरुमध्ये मिष्टीने अखेरचा श्वास घेतला.
मुंबई : बंगाली आणि हिंदी सिनेमांमध्ये काम करणारी अभिनेत्री मिष्टी मुखर्जीचं वयाच्या 27 व्या वर्षी निधन झालं आहे. शुक्रवारी संध्याकाळी बंगळुरुमध्ये मिष्टीने अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्री मिष्टीच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती आहे. मिष्टी मुखर्जी किडनीच्या आजाराने अभिनेत्री त्रस्त होती. किडनी फेल झाल्यामुळे तिचं निधन झालं.
2012 पासून मिष्टी मुखर्जीने तिच्या करिअरला सुरुवात केली होती. लाइफ की तो लग गयी हा तिचा पहिला सिनेमा होता. वर्ष 2013 मध्ये 'मैं कृष्णा हूं' चित्रपटातं देखील तिनं काम केलं होतं. मिष्टीला किडनीच्या समस्येनं ग्रासलं होतं. गेल्या काही महिन्यांपासून मिष्टी कोटो डाएटवर होती. मात्र शुक्रवारी मिष्टीची प्राणज्योत मालवली. मिष्टीच्या पश्चात कुटुंबात तिचे आई-वडील आणि भाऊ आहेत. यामुळे मुखर्जी कुटुंबासोबतच बॉलिवूड आणि बंगाली सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
काही सिनेमांमध्ये झळकली मात्र बिग बजेट सिनेमा तिला मिळाला नव्हता. काही सिनेमांमध्ये तिनं आयटम नंबर्स देखील केले होते. बोल्ड आणि म्युझिक अल्बममध्येही ती दिसली होती. 2014 मध्ये मिष्टी मुखर्जीवर सेक्स रॅकेट चालवल्याचाही आरोप झाला होता. त्यावेळी तिच्या नावाची बरीच चर्चा झाली होती. तिच्या घरी धाड टाकण्यात आली. त्यावेळी पोलिसांनी अनेक सीडीज आणि टेप्स सापडले होते. मिष्टी मुखर्जीच्या कुटुंबीयांवरही हे आरोप झाले होते.