Actor Revealed Extra Marital Affair: लग्नानंतरही 'तिला' एक्सट्रा मॅरिटल अफेयर सुरूच ठेवायचं होतं... बड्या अभिनेत्याकडून पत्नीची पोलखोल
Actor Revealed Extra Marital Affair: अभिनेते कबीर बेदींनी एकदा किंवा दोनदा नाही तर, तब्बल चार वेळा लग्न केलं. पण याच दरम्यान, त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते त्यांच्या लग्नाबद्दल खळबळजनक खुलासा करताना दिसत आहेत.

Actor Revealed Extra Marital Affair: बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्यानं (Bollywood Actor) एका मुलाखतीत बोलताना आपल्या पत्नीची थेट पोलखोल केली आहे. कबीर बेदी हे बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आहेत आणि ते त्यांच्या चित्रपटांपेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिले आहेत. अभिनेते कबीर बेदींनी एकदा किंवा दोनदा नाही तर, तब्बल चार वेळा लग्न केलं. पण याच दरम्यान, त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते त्यांच्या लग्नाबद्दल खळबळजनक खुलासा करताना दिसत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या व्हिडीओमध्ये कबीर बेदी यांनी स्पष्टपणे सांगितलं की, त्यांना एक्सट्रा मॅरिटल अफेयर ठेवायचे असल्यामुळे त्यांनी खुलं लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. कबीर बेदी यांनी पहिलं लग्न प्रोतिमा बेदी यांच्याशी केले. खरंतर प्रोतिमा एक ओडीसी डान्सर होती आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, त्या आता या जगात नाहीत.
पण या व्हायरल व्हिडीओमध्ये कबीर बेदी म्हणाले की, "मलाही अफेअर्स हवे होते आणि तिलाही अफेअर्स हवे होते. म्हणूनच तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा आणि मीही तेच करेन जे मला करायचं आहे. आपण एकत्र राहू आणि मुलांना वाढवू. असा निर्णय आम्ही घेतला." पण ते जमले नाही आणि नंतर आम्ही वेगळे राहण्याचा आणि घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
कबीर बेदी पुढे बोलताना म्हणाले की, "मी त्याच्याप्रती असलेल्या माझ्या जबाबदाऱ्याही पार पाडल्या आणि तिला राहण्यासाठी माझं घर दिलं. मी तिला पूर्ण पाठिंबाही दिला पण आम्ही आयुष्यभर मित्र राहिलो. आम्हाला दोन मुलं होती आणि आम्हाला आमच्या मुलांनी हे समजून घ्यावं, अशी आमची इच्छा होती की आपण करू शकत नाही. सगळे एकत्र राहतात पण आम्ही त्यांचे पालक आहोत."
कबीर बेदी पुढे बोलताना म्हणाले की, "आम्ही आमच्या परीनं सर्वोत्तम प्रयत्न केले. पण आम्हाला नेहमीच पश्चात्ताप होतो आणि त्यांच्याबद्दल विचार करणं चांगलं आहे. पण त्यांच्याबद्दल वारंवार विचार करणं चांगलं नाही. भूतकाळात जगणं पूर्णपणे चुकीचं आहे."
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
