Jackie Shroff- Anil Kapoor Film Kissa: सिनेसृष्टीतील काही किस्से हे चांगलेच मनोरंजक असतात. त्या-त्या घटनांचे काही संदर्भ एवढे खास असतात की चित्रपटाची कमी आणि संबंधित घटनाचीच सगळीकडे चर्चा होत असते. सध्या अनिल कपूर आणि जॉकी श्रॉफ यांच्यातील अशाच एका प्रसंगाची सगळीकडे आठवण काढली जात आहे. जॉकी श्रॉफने अनिल कपूरला तब्बल 17 वेळा कानशिलात लगावलं होतं. हा किस्सा नेमका काय आहे? अनिल कपूरला तब्बल 17 वेळा का मार खावा लागला होता? हे जाणून घेऊ या....
परिंदा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट
हा किस्सा परिंदा या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा आहे. या चित्रपटात अनिल कपूर आणि जॉकी श्रॉफ हे दोन्ही अभिनेते होते. त्यामुळेच दोन्ही मोठे स्टार्स या चित्रपटात असल्यामुळे बॉक्स ऑफिसवर तो चांगालच चालला होता. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, जॉकी श्रॉफने अनिल कपूरच्या 17 वेळा कानशिलात लगावली होती.
'त्या' दृश्याची झाली होती सगळीकडे चर्चा
परिंदा हा चित्रपट 1990 साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट लोकांच्या चांगलाच पसंतीस पडला होता. विशेष म्हणजे त्या वर्षी या चित्रपटाला एकूण 5 फिल्मफेअऱ तर 2 नॅशनल अवॉर्ड्स मिळाले होते. मात्र या चित्रपटातील कानशिलात लगावण्याच्या दृश्याची तेव्हा सगळीकडेच चर्चा झाली होती.
...म्हणून अनिल कपूरला लगावल्या होत्या कानशिलात
जॉकी श्रॉफ आणि अनिल कपूर हे आपल्या वैयक्तिक आयुष्यात फार चांगले मित्र आहेत. विदू विनोद चोप्रा यांच्या परिंदा या चित्रपटात या दोघांनीही एकत्र काम केलेले आहे. याच चित्रपटाच्या एका दृश्यात जॉकी श्रॉफ अनिल कपूरला कानाखाली मारणार होता. पहिल्या वेळी जॉकी श्रॉफने अनिल कपूरच्या कानशिलात लगावलीही होती. सर्वांना हा शॉट आवडला होता. मात्र अनिल कपूरला या शॉटमध्ये आणखी जीव ओतायचा होता. त्याला हा सीन आणखी जिवंत करायचा होता. त्यामुळे हा शॉट रिटेक घेण्याची त्याने विनंत केली. दुसऱ्या शॉटला विदू विनोद चोप्रा यांना काहीतरी खटकलं. त्यानंतर तो सिन पुन्हा शूट केला गेला. असे करत करत हा सिन एकूण 17 वेळा शूट करण्यात आला आणि अनिल कपूरला जॉकी श्रॉफकडून तब्बल 17 वेळा कानाखली खावी लागली.
हा किस्सा खुद्द जॉकी श्रॉफनेच सांगितलेला आहे. जॉकीने परिंदा या चित्रपटात अनिल कपूरला 17 वेळा कानाखाली मारली असली तरी ते एकमेकांचे फार चांगले मित्र आहेत. अनेकवेळा ते एकमेकांसोबत दिसलेले आहेत.
हेही वाचा :