मुंबई : बॉलिवुडमधील अनिल कपूर हे नाव सर्वांनाच परिचित आहे. 80 च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपट देऊन त्यांनी समस्त भारतीय सिनेरसिकांचे चांगलेच मनोरंजन केले. त्यांनी ईश्वर, तेजाब, राम-लखन या चित्रपटांत कायम स्मरणात राहणारी पात्रं साकारली. दरम्यान, सध्या अनिल कपूर कोट्यवधी रुपयांचा मालक असला, तरी सुरुवातीच्या काळात मात्र त्याने फार काठीण काळाला तोंड दिले आहे. अनिल कपूरला अनेकवेळा अपमानालाही तोंड द्यावं लागलेलंय. एका प्रसंगाला तोंड देताना तर अनिल कपूरला चक्क रडू कोसळलं होतं. 


अनिल कपूरने सांगितली जुनी आठवण


अनिल कपूर यांचा 2022 मध्ये जुग-जुग जिओ हा चित्रपट आला होता. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनिल कपूरने 'सुपरस्टार सिंगर- 2' या रिअॅलिटी शोला हजेरी लावली होती. याच कार्यक्रमात अनिल कपूरने त्याच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला होता. त्या घटनेत अनिल कपूरला चक्क रडू कोसळलं होतं. 


अनिल कपूरला थेट रडू कोसळलं


या कार्यक्रमात अनिल कपूरने त्याच्या जुन्या आठवणी सांगितल्या होत्या. मला आजही ती आठवण आली की डोळे भरून येतात. पण माझ्या आईने नेहमीच मला प्रोत्साहित केलेलं आहे. लहाणपणी मी एक स्लिकचं शर्ट आणि हाफ पॅन्ट घालायचो. माझ्या आईनेच हे कपडे शिवले होते. हे कपडे घालून मी एका पार्टीमध्ये गेलो होतो. माझे कपडे पाहून दुसरी मुलं तिथं हसू लागले. ते माझी थट्टा करून लागले. हे सगळं पाहून मला रडू कोसळलं. पण मग मी रागातच रडत रडत त्यांना म्हणालो की मी एक दिवस खूप मोठा माणूस होईल. हिरो होईल. मीपण चांगले-चांगले कपडे परिधान करेन, अशी आठवण अनिल कपूरने सांगितले होते. 


पुढे बोलताना, "एक दिवस तो होता जेव्हा मी रडलो होतो. आज मी तोच किस्सा तुमच्यासमोर बसून सांगत आहे. पण त्या दिवशी मी फार रागात होतो आणि मी रडतही होतो," अशी आठवण अनिल कपूरने सांगितले. 


अनिल कपूरचे बॉलिवूडमधील करिअर


दरम्यान, सुरिंदर कपूर आणि पृथ्वीराज कपूर हे एकमेकांचे चुलत भाऊ होते. सुरिंदर कपूर यांना एकूण चार आपत्य झाली. अनिल कपूर, रिना कपूर, संजय कपूर आणि बोनी कपूर अशी त्यांची नावं आहेत. सुरिंदर कपूर यांना पृथ्वीराच कपूर यांच्या मुगल ए आझम या चित्रपटात काम करण्याची पहिल्यांदा संधी मिळाली. त्यानंतर मोठं झाल्यानंतर अनिल कपूर यांनी अभिनय क्षेत्रआत पाऊल ठेवले. अनिल कपूर यांच्या पहिल्या चित्रपटाचे नाव वामसा वृक्षम असे होते. हा तेलुगु भाषेतील सिनेमा होता. याआधी अनिल कपूरने सहायक अभिनेता म्हणून हमारे तुम्हारे, एक बार कहो, हम पांच, शक्ती आदी चित्रपटांत काम केले होते. अनिल कपूरने वो सात दिन या चित्रपटासह बॉलिवुडमध्ये डेब्यू केला. त्यानंतर त्याने मसाल, मेरी जंग, तेजाब, मोहब्बत, जांबाज, कर्मा, राम लखन, बेटा, मिस्टर इंडिया, जमाई राजा अशा सुपरहिट चित्रपटांत प्रमुख भूमिका केली. 


हेही वाचा :


महात्मा गांधी भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता, प्रसिद्ध गायक अभिजित भट्टाचार्य यांचे वादग्रस्त विधान!


प्रियांका चोप्रा आणि निक जोनास एकमेकांच्या प्रेमात कसे पडले? एका मेसेजने केली होती मोठी कमाल; वाचा भन्नाट लव्ह स्टोरी!