Mangal Margi 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा सेनापती मंगळ ठराविक काळानंतर राशी बदलतो, ज्याचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे होतो. सध्या मंगळ कर्क राशीत प्रतिगामी स्थितीत आहे. नवीन वर्षातही तो प्रतिगामी, म्हणजे उलट्या चालीत राहील. पण तो फेब्रुवारी 2025 मध्ये मार्गी होईल, सरळ चाल चालेल. मंगळ ग्रहाच्या थेट चालीमुळे काही राशीच्या लोकांचं जीवन पालटेल. मंगळाची सरळ चाल कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार? जाणून घेऊया.
वैदिक ज्योतिषानुसार, 24 फेब्रुवारी 2025 रोजी मंगळ मिथुन राशीत मार्गी होईल आणि त्यानंतर 2 एप्रिल रोजी तो पुन्हा कर्क राशीत प्रवेश करेल.
सिंह रास (Leo)
या राशीच्या लोकांसाठी मंगळाची सरळ चाल खूप फायदेशीर ठरू शकते. या राशीच्या लोकांच्या संपत्तीत वाढ होण्याची पूर्ण शक्यता आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. यासोबतच बेरोजगारांनाही रोजगार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तुम्ही खूप दिवसांपासून ज्या प्रमोशनची वाट पाहत होता, ते प्रमोशन आता तुम्हाला मिळेल. प्रत्येक कामात आता तुम्हाला यश मिळू शकतं. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल.
धनु रास (Sagittarius)
या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. धनु राशीमध्ये मंगळ सातव्या घरात असेल. अशा स्थितीत या राशीचे लोक अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात खूप फायदा होऊ शकतो. व्यवसायात सुरू असलेले वाद आता संपुष्टात येऊ शकतात. यासोबतच कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकतं. यामुळे जीवनात सुख-शांती नांदेल. घरातील वातावरण देखील अल्हाददायक असेल.
कन्या रास (Virgo)
या राशीच्या लोकांसाठी मंगळाची सरळ चाल लाभदायक ठरू शकते. या राशीमध्ये मंगळ थेट दहाव्या घरात प्रवेश करेल. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात खूप फायदा होणार आहे. तुम्ही तुमच्या कामात खूप समर्पित असाल, ज्यामुळे तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. लव्ह लाईफ देखील चांगली जाईल. याच्या मदतीने तुम्ही तुमचं ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. प्रेम प्रकरणं लग्नापर्यंत पोहोचतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: