मुंबई : प्रसिद्ध गायक अभिजित भट्टाचार्य (Abhijeet Bhattacharya) यांचं गायन क्षेत्रात मोठं नाव आहे. बॉलिवूडमध्ये त्यांनी एक काळ गाजवलेला आहे. चित्रपटात गायन करण्यासाठी त्यांच्यापुढे रांग लागलेली असायची.  दिग्गज अभिनेता शाहरुख खानच्या अनेक चित्रपटातील गाण्यांना त्यांनी आवाज दिलेला आहे. विशेष म्हणजे यातील बरीच गीतं आजदेखील तेवढ्याच आवडीने ऐकली जातात. दरम्यान, हेच अभिजित भट्टाचार्य सध्या एका वेगल्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी महात्मा गांधी हे भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता आहेत, अशा आशयाचं विधान केलं आहे. 


अभिजित भट्टाचार्य काय म्हणाले?


अभिजित भट्टाचार्य हे यूट्यबवरील एका पॉडकस्टमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना अभिजित भट्टाचार्य यांनी महात्मा गांधी तसेच भारत आणि पाकिस्तान यावर भाष्य केलं. महात्मा गांधी यांच्यापेक्षाही पंचमदा (आर. डी. बर्मन) मोठे होते. पंचमदा हे संगितातील राष्ट्रपिता होते. महात्मा गांधी हे भारतासाठी नव्हे तर पाकिस्तानसाठी राष्ट्रपिता होते. भरत हा देश पहिल्यापासूनच होता. पाकिस्तानची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे चुकून महात्मा गांधी यांनी भारताचे राष्ट्रपिता असल्याचं सांगण्यात येतं, असं अभिजित भट्टाचार्य म्हणाले. 


10 वर्षांनंतर तुम्ही हा प्रश्न विचारणार नाहीत


त्यांच्या या विधानानंतर संपूर्ण जग महात्मा गांधी यांच्यापुढे झुकतं ते का? असं विचारण्यात आलं. त्यावर बोलताना आगामी 10 वर्षांनंतर तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारणारही नाहीत, असं उत्तर अभिजित भट्टाचार्य यांनी केलं. अभिजित भट्टाचार्य यांच्या या विधानाचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.  


दुआ लिपामुळे अभिजित भट्टाचार्य आले होते चर्चेत 


दरम्यान, अभिजित भट्टाचार्य काही दिवसांपूर्वी एका अनोख्या कारणामुळे चर्चेत आले होते. मुंबईत जगप्रसिद्ध गायक दुआ लिपा हिचा एक लाईव्ह कॉन्सर्ट झाला होता. या लाईव्ह् कॉन्सर्टदरम्यान अभिजित भट्टाचार्य यांच्या गाण्यावर दुआ लिपा चांगलीच थिरकली होती. त्यानंतर अभिजित भट्टाचार्य नव्याने चर्चेत आले होते. दुआ लिपाने सादर केलेले ते गाणे शाहरुख खानच्या चित्रपटासाठी भट्टाचार्य यांनी गायले होते.  


हेही वाचा :


प्रियांका चोप्रा आणि निक जोनास एकमेकांच्या प्रेमात कसे पडले? एका मेसेजने केली होती मोठी कमाल; वाचा भन्नाट लव्ह स्टोरी!


Allu Arjun : अल्लू अर्जुनच्या घरावर दगडफेक, JACच्या नेत्यांवर आरोप; पोलिसांची कारवाई


Akshay Kelkar : फाइनली सांगतोय मी… दहा वर्षांचा प्रवास..., अक्षय केळकरने अखेर 'त्या' खास व्यक्तीविषयी केला खुलासा