एक्स्प्लोर

Mahesh Kothare on BJP: संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारे खो-खो हसत सुटले, म्हणाले, 'मला माझं मत मांडण्याचं व्यक्तीस्वातंत्र्य आहे'

Mahesh Kothare & Sanjay Raut: महेश कोठारे यांनी भाजप आणि मोदींची प्रशंसा करत मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपचे कमळ फुलेल आणि महापौर होईल, असे म्हटले.

Mahesh Kothare on BJP: भाजप म्हणजे आपले घर आहे. मी स्वत: भाजपचा आणि पंतप्रधान मोदींचाही भक्त आहे, असे वक्तव्य करणारे मराठी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे (Mahesh Kothare) यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीकास्त्र सोडले होते. महेश कोठारे अशीच वक्तव्यं करत राहिले तर तात्या विंचू येऊन त्यांना चावेल, अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी केली होती. यावर आता महेश कोठारे यांनी भाष्य केले आहे. कोठारे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले की, हे माझं मत आहे, हे माझं प्रामाणिक आणि खरं मत आहे. मी माझं मत व्यक्त करु शकतो, मला व्यक्तीस्वातंत्र्य आहे. जे मी म्हटलं ते मनापासून म्हटलं. त्यामुळे इथे राजकारण आणण्याचा संबंधच येत नाही, असे महेश कोठारे यांनी सांगितले.

मी एक नागरिक म्हणून हे वक्तव्य केले. संजय राऊतांनी जे म्हटलं, ते त्यांचं मत होतं. त्यांचं मत त्यांनी मांडलं, माझं मत मी मांडलं, असे बोलत महेश कोठारे जोरदार हसले. संजय राऊतांनी माझ्याविषयी जी टिप्पणी केली, त्याला माझी हरकत नाही. पण मी माझं मत मांडले. मी या मतावर ठाम आहे. माझं मत निर्विवाद आहे. संजय राऊत यांचाही मी खूप आदर करतो. पण माझं मत हे माझं मत आहे, असे बोलत महेश कोठारे हे पुन्हा एकदा हसत सुटले.

Mahesh Kothare: महेश कोठारे नेमकं काय म्हणाले?

महेश कोठारे यांनी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी मागाठाणे परिसरात आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी केलेले एक वक्तव्य प्रचंड चर्चेचा विषय ठरले होते.  भाजप म्हणजे आपले घर आहे. मी स्वत: भाजपचा भक्त आहे. मी पंतप्रधान मोदींचाही भक्त आहे. आपल्याला इथून नगरसेवक निवडून आणायचा आहे. तसेच यावेळी महापौरही इथून निवडून गेलेला असेल. मुंबईत नक्कीच कमळ फुलेल. मी जेव्हा पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी आलो होतो. तेव्हा मी म्हटलं होतं की, येथील मतदार हे खासदार निवडून देत नाहीत तर केंद्रीय मंत्री म्हणून निवडून येत आहेत. आताही आपण या विभागातून फक्त नगरसेवक निवडून देणार नाही. तर भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची ठरवली तर उद्या या विभागातून मुंबईचा महापौर निवडला जाईल, असे महेश कोठारे यांनी म्हटले होते.  महेश कोठारे यांच्या वक्तव्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. 

Sanjay Raut: संजय राऊतांचं महेश कोठारे यांच्यावर टीकास्त्र

महेश कोठारे हे नक्की मराठीच आहेत ना? मला याबद्दल शंका वाटते. ते कोणत्याही पक्षाचे असू द्या. प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण तुम्ही कलाकार आहात. तुमचे सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी पाहिलेले नाहीत. तुम्ही जर असे काही बोलत राहिलात तर रात्री येऊन तो तुम्हाला चावेल आणि गळाही दाबेल, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. मात्र, महेश कोठारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांच्याशी वाद घालणे टाळले. मात्र, आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचेही कोठारे यांनी म्हटले. 

आणखी वाचा

मी मोदी भक्त, भाजप म्हणजे घरचा कार्यक्रम, मुंबईवर कमळ फुलेल; महेश कोठारेंच 'धडाकेबाज' वक्तव्य चर्चेत

महत्त्वाच्या बातम्या

Urmila Nimbalkar Trolling: 'एका बाईने मला xxx वर्कर झालीयेस का?...'; साडीत कंबर दिसल्याने मराठी अभिनेत्री ट्रोल; VIDEO शेअर करत म्हणाली...
'एका बाईने मला xxx वर्कर झालीयेस का?...'; साडीत कंबर दिसल्याने मराठी अभिनेत्री ट्रोल; VIDEO शेअर करत म्हणाली...
Salman Khan Koffee With Karan: 'कंट्रोल ब्रो'! करण जोहर सलमान खानला म्हणाला, 'तू अजूनही व्हर्जिन आहेस का?', भाईजानने दिलं सणसणीत उत्तर, म्हणाला...
'कंट्रोल ब्रो'! करण जोहर सलमान खानला म्हणाला, 'तू अजूनही व्हर्जिन आहेस का?', भाईजानने दिलं सणसणीत उत्तर, म्हणाला...
Kapuskoonda Trailer Upcoming Marathi Movie: 'कुत्रटपणापेक्षा, पोरकटपणा बरा...'; सचिन पिळगावकरांच्या 'कापूसकोंडा'चा ट्रेलर लॉन्च, 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी गोखले मुख्य भूमिकेत
'कुत्रटपणापेक्षा, पोरकटपणा बरा असतो...'; सचिन पिळगावकरांच्या 'कापूसकोंडा'चा ट्रेलर लॉन्च, 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी गोखले मुख्य भूमिकेत
Karisma Kapoor Link Up Rumors With Govinda Salman Khan: करिश्मा कपूरच्या प्रेमात आकंठ बुडालेले गोविंदा अन् सलमान खान? भाईजानच्या एक्स गर्लफ्रेंडनं सगळंच सांगितलं, काय म्हणाली?
करिश्मा कपूरच्या प्रेमात आकंठ बुडालेले गोविंदा अन् सलमान खान? भाईजानच्या एक्स गर्लफ्रेंडनं सगळंच सांगितलं, काय म्हणाली?

व्हिडीओ

Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Parishad Election: पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
Emraan Hashmi Gunmaaster G9 Stunt SUV Flips Viral Video: इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Embed widget