Sunil Grover Heart Surgery : प्रसिद्ध अभिनेता-कॉमेडियन सुनील ग्रोव्हरवर (Sunil Grover) नुकतीच मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. आता सुनील ग्रोव्हरची तब्येत ठीक असून, तो बरा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. अभिनेता सुनील ग्रोव्हरवर एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र, याबाबत अधिक माहिती अद्याप आलेली नाही.


सुनील ग्रोव्हरला चाहते त्याच्या 'गुत्थी' या पात्रामुळेच ओळखतात. त्याने कपिल शर्मा शोमध्ये 'गुत्थी' हे पात्र साकारून लोकांना खूप हसवले होते. शोचा होस्ट कपिल शर्मासोबतच्या वादानंतर त्याने हा शो सोडला. पण, त्याचे 'गुत्थी' हे पात्राची आजही सर्वांच्या हृदयात कोरलेले आहे.


मनोरंजन क्षेत्रात येण्यासाठी अपार मेहनत!


यशाच्या या टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्याने खूप संघर्ष केला आहे. सुनीलला बालपणापासून अभिनयाची आवड होती आणि त्याने थिएटरमध्ये पदव्युत्तर पदवी देखील घेतली आहे. सुनील ग्रोव्हरचा अभिनय बाकीच्या विद्यार्थ्यांसमोर फिका पडेल, तो इतर विद्यार्थ्यांइतका पुढे जाणार नाही, असे त्याच्या शिक्षकांना वाटायचे. म्हणूनच त्याला कॉलेजच्या नाटकात भाग घेण्याची परवानगी देखील देण्यात आली नव्हती. हा किस्सा स्वत: सुनीलने एका मुलाखतीत सांगितला होता.


मनोरंजन क्षेत्रात येण्यापूर्वी त्याने अनेक क्षेत्रात आपले नशीब आजमावले होते. यानंतर त्याने अनेक कॉमेडी शो आणि वेब सिरीजमध्ये काम केले आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha