Mahima Chaudhry : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरीचा (Mahima Chaudhry) चाहता वर्ग मोठा आहे. परदेस या चित्रपटातील अभिनयामुळे महिमाला विशेष लोकप्रियता मिळाली. पण काही वर्ष महिमा ही लाइमलाइटपासून दूर राहिली. महिमा चौधरीसोबत  'दिल क्या करे' (Dil Kya Kare) या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एक घटना घडली. या घटनेमुळे महिमाला धक्का बसला होता. 


1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दिल क्या करे' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एक घटना घडली होती. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान महिमाचा अपघात झाला. महिमाची कार एका ट्रकला धडकली होती. या अपघातामुळे महिमाचा चेहरा खराब झाला होता. एका मुलाखतीमध्ये महिमानं एका सांगितलं होतं की, तिची सर्जरी करण्यात आली. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर 67 काचेचे तुकडे रूतले होते. महिमानं सांगितलं, 'मला वाटलं त्या अपघातानंतर मी जिवंत राहणार नाही. मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला तिथे कोणीच नव्हते. मी हॉस्पिटलमध्ये गेले. त्यानंतर  बऱ्याच वेळानं तिथे माझी आई आणि अजय देवगण आले होते.'


महिमा पुढे म्हणाली, 'जेव्हा मी सर्जरी झाल्यानंतर माझा चेहरा आरशामध्ये पाहिला तेव्हा मी खूप खाबरले होते. मी त्यावेळी ही गोष्ट कोणालाही सांगितली नव्हती कारण त्यावेळी लोक मला सपोर्ट करत नव्हते. मी कोणाला सांगितलं तर लोक मला म्हणत होते की अरे हिचा चेहरा खराब झाला आहे आता हिला चित्रपटामध्ये काम कोण देणार? त्यामुळे तेव्हा मी काही दिवस अभिनय क्षेत्रापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. माझ्या कुटुंबानं त्यावेळी माझी साथ दिली. '






2006 साली महिमानं  बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले. पण 2013 मध्ये महिमानं घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. 


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha