Bhool Bhulaiyaa 2 Update : बॉलिवूडमधील हिट चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘भूल भुलैया2’चा (Bhool Bhulaiyaa 2) चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) स्टारर 'भूल भुलैया 2' ची रिलीज डेट जाहीर झाली आहे. हा चित्रपट आता 20 मे 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.


अनीस बज्मी दिग्दर्शित या चित्रपटात कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी आणि तब्बू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे लेखन फरहाद सामजी आणि आकाश कौशिक यांनी केले आहे.


T-Series आणि Cine Oneच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, मुराद खेतानी आणि कृष्ण कुमार यांनी केली आहे. याआधी या चित्रपटात विद्या बालन ‘मोंजोलिका’च्या भूमिकेत परतणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.


 







‘RRR’शी स्पर्धा टाळली!


कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर ‘भूल भुलैया 2’च्या निर्मात्यांनी चित्रपटाची नवीन रिलीज डेट आज (2 फेब्रुवारी) जाहीर केली. आता, हा चित्रपट 20 मे 2022 रोजी रिलीज होत असल्याने, 25 मार्च रोजी रिलीज होणार्‍या एसएस राजामौलींच्या ‘आरआरआर’शी होणारी टक्कर टळली आहे. अलीकडेच, ‘आरआरआर’च्या निर्मात्यांनी कोरोना निर्बंधांचा विचार करून, प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर केली होती. आता, कार्तिक आणि कियारा स्टारर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी देखील ‘आरआरआर’शी संघर्ष टाळण्यासाठी रिलीजची पुढे ढकलली आहे.


‘भूल भुलैया 2’बद्दल बोलायचे झाले तर, कार्तिक आणि कियारा व्यतिरिक्त, या चित्रपटात तब्बू देखील मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बज्मी करत आहेत. 2007मध्ये प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमार आणि विद्या बालन स्टारर ‘भूल भुलैया’ चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. हा हॉरर-कॉमेडी चित्रपट बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये कार्तिक एका हटके अवतारात दिसला होता आणि त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता निर्माण झाली होती. कार्तिक आणि कियारा यांनी मनालीतील बर्फाच्छादित टेकड्यांवर या चित्रपटाचे शूटिंग केले आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha