Gold Price today : काल (1 फेब्रुवारी ) रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पाच्या एकाच दिवसानंतर आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. तर, चांदीच्या दरातही किंचित घट झाली आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा दर आज 0.25 टक्क्यांनी घसरला आहे. तर, चांदीच्या दरात 0.01 टक्क्यांची घसरण झाली आहे.
जाणून घ्या काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे दर :
एप्रिल डिलीव्हरीसाठी सोन्याचे दर आज 0.25 टक्क्यांनी घसरून 48,980 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर, आजच्या व्यवहारात चांदीच्या दरात 0.01 टक्क्यांची घसरली झाली आहे. आज 1 किलो चांदीचा दर 62,000 रुपये इतका आहे.
2020 वर्षाची तुलना :
MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. आजच्या काळात मॅक्स कमॉडीटी एक्सचेंजवर सोने 48,980 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे. याचाच अर्थ, सोने अजूनही सुमारे 7,220 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर :
तुम्ही या दरांनी फार सोप्या पद्धतीने घरबसल्या जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त 8955664433 या नंबरवर मिस्ड कॉल द्यायचा आहे. यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये जो मेसेज येईल त्यामधून तुम्ही सोन्या-चांदीचे आजचे दर जाणू शकता.
अशा पद्धतीने चेक करू शकता सोन्याची शुद्धता :
जर तुम्हाला सोन्याची शुद्धता चेक करायची आहे. तर यासाठी सरकारतर्फे एका अॅपची सुविधा करण्यात आली आहे. ‘BIS Care app’ या अॅपच्या माध्यमातून तुम्ही सोन्याची (Gold) शुद्धता (Purity) चेक करू शकता. इतकेच नाही, तर या अॅपच्या माध्यमातून तुम्ही संबंधित कोणतीही तक्रारदेखील नोंदवू शकता.
महत्वाच्या बातम्या :
- Share Market : बजेटच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी, Sensex 800 अंकांनी वधारला, Nifty देखील 17,300 च्या वर
- Budget 2022: GDP म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या प्रत्येकासाठी का महत्त्वाचा आहे जीडीपी
- No Change in Tax Slabs: महत्त्वाची बातमी! कर रचना 'जैसे थे', कोणताही बदल नाही; अर्थमंत्र्यांची घोषणा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha