Jumbo Mega Block : तुम्ही या वीकेंडला तुमचे नियोजन आधीच करुन घ्या, याच कारण म्हणजे मध्य रेल्वेवर (Central Railway) 72 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगा ब्लॉक 04, 05 आणि 06 फेब्रुवारी रोजी असेल. मध्य रेल्वेच्या (Central Railway) ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान हा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगा ब्लॉक 04, 05 आणि 06 फेब्रुवारी रोजी असेल. या मेगा ब्लॉक दरम्यान, 350 लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर, शंभरहून अधिक लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस आणि मेल गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान 5 व्या मार्गिकेवर आणि दिवा ते ठाणे स्थानकादरम्यान अप फास्ट मार्गिकेवर आणि 6 व्या मार्गिकेवर हा जम्बो मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्या 3 दिवस रद्द करण्यात आल्या आहेत. कोकणात जाणाऱ्या तेजस, जन शताब्दी, एसी डबल डेकर, तसेच कोच्चूवेली, मंगलोर, हुबळी या एक्सप्रेस गाड्या या मेगा ब्लॉकमुळे रद्द करण्यात आल्या आहेत. याबरोबरच डेक्कन एक्सप्रेस, डेक्कन क्वीन एक्सप्रेस, जालना जन शताब्दी, कोयना एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेसह शंभर एक्सप्रेस गाड्या तीन दिवस रद्द करण्यात आल्या आहेत.
दिवा-वसई मेमु ट्रेन रद्द करण्यात आल्या असून अनेक गाड्या पनवेल स्थानकात थांबवण्यात येणार आहेत. तर सर्व फास्ट लोकल (जलद गाड्या) गाड्या स्लो (धिम्या मार्गावर) ट्रॅकवर वळवण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेवरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामांसाठी आतापर्यंत अनेक मोठे जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आले आहेत. मात्र यातील सर्वात मोठा ब्लॉक 4, 5, आणि 6 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकनंतर पाचवी आणि सहावी मार्गिका कार्यन्वित होईल, असं एमआरव्हीसीनं सांगितलं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Coronavirus Cases Today : तिसरी लाट ओसरतेय, गेल्या 24 तासांत 1 लाख 61 हजार 386 कोरोनाबाधितांची नोंद
- UP Assembly Election 2022 : निर्मला सीतारामन यांच्या 'यूपी टाईप' वक्तव्यावरून राजकारण तापलं, हा जनतेचा अपमान : प्रियंका गांधी
- Viral Song : 'बदाम... बदाम... कच्चा बदाम'वर थिरकले सेलिब्रिटी; गाणं सोशल मीडियावर व्हायरल, खरा गायक कोण?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha