Sarang Sathye Majha Maha Katta: 'भाडिपा'ची सुरुवात कशी झाली? भाडिपा घरा-घरात कसं पोहोचलं? सारंग म्हणाला...
एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमाला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एबीपी माझाने महाकट्ट्याचे आयोजन केले आहे. यावेळी त्यांनी आपली लव्ह स्टोरी ते भाडिपाच्या प्रवासाबद्दल अनेक किस्से माझाच्या कट्ट्यावर सांगितले आहेत.
Sarang Sathye Paula McGlyn Majha Maha Katta: पॉला आणि मी गेल्या आठ वर्षांपासून डेटिंग करत आहोत. दहा वर्षांपूर्वी मी प्रायोगिक नाटकात काम करत होतो दिग्दर्शन करत होतो. पुण्यात मी खूप नाट्य संस्थांसोबत जोडलो गेलो होतो. पुण्याची एक संस्था आहे. आसक्त पुणे म्हणून, मोहित टाकळकर, राधिका आपटे आणि मी असे अनेक कलाकार आम्ही 24 तास एकत्र नाटक करायचो, असं भाडिपाचा संस्थापक आणि अभिनेता सारंग साठे म्हणाला आहे. तर 10 वर्षांपूर्वी पॉला काय करत होती असं तिला विचारलं असता ती म्हणाली आहे की, ''दहा वर्षांपूर्वी मी सर्वात आधी भारताचा प्रवास केला. 2010 मध्ये मी भारतात आली. त्याआधी मी माझा फिल्म स्टडी कोर्स कॅनडातून पूर्ण केला. नंतर मी भारतात आली आणि पुढे जे झालं तो इतिहास आहे.''
एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमाला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एबीपी माझाने महाकट्ट्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील दहा दिग्गज मान्यवरांशी संवाद साधण्यात येणार आहे. यामध्ये अभिनेता सारंग साठे आणि पॉला मॅकग्लिन यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली लव्ह स्टोरी ते भाडिपाच्या प्रवासाबद्दल अनेक किस्से माझाच्या कट्ट्यावर सांगितले आहेत.
असं जन्माला आलं भाडिपा...
पॉलाची भेट कधी झाली आणि भाडिपाबद्दल बोलताना सारंग म्हणाला की, भाडिपाला आता जवळपास सहा वर्ष झाली आणि पॉला आणि माझ्या भेटीला 9 वर्ष झाली आहेत. पॉलाची भारतात जेव्हा दुसरी ट्रिप होती, तेव्हा तिने माझा एक चित्रपट पाहिला होता. यानंतर टोरँटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये माझा एक चित्रपट होता, पूर्वी मी अभिनेता म्हणून जास्त काम करायचो मात्र ते सिनेमा प्रदर्शित झाले नाही. त्यावेळी या फेस्टिव्हलमध्ये माझा एक सिनेमा होता आणि पॉलाचीही एक शॉर्ट फिल्म होती. त्यानंतर आम्ही अनुराग कश्यपच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये भेटलो. यानंतर वर्षभरानंतर ती भारतात आली आणि आमची तिसरी एक पार्टनर आहे, अनुषा नंदकुमार तर ती आणि मी पॉलाला पिकअप करायला गेलो. आम्ही तिघे एकत्र मिळून काम करणार होतो, हे आम्हाला माहित नव्हतं. आम्ही तिघे एकमेकांना काहीनाकाही कामावरून ओळखत होतो, मात्र आमची भेट झाली नव्हती. त्यावेळी आम्ही तिघे त्या प्रवासात भेटलो. त्यानंतर जी मैत्री झाली ती त्यानंतर दोन वर्षांनी असं वाटलं आपण एकत्र मिळून एक कंपनी सुरू केली पाहिजे. मग सहा वर्षांपूर्वी भाडिपा सुरू झालं.
असं भाडिपा घरा-घरात पोहोचलं...
भाडिपा घरा-घरात कसं पोहोचलं? असा प्रश्न सारंगला विचारण्यात आला असता, तो म्हणाला की, भाडिपा घरा-घरात पोहोचण्याचं कारण असं की, जेव्हा आम्ही टीव्ही बघायचो, सिनेमा बघायचो. तेव्हा आम्हाला असं वाटायचं आमच्या घरात हे होत नाही. म्हणजे हे थोडं वेगळं आहे. माझे आई-वडील जसे आहे, माझं भाऊ जसा आहे आणि माझं म्हणजे माझ्या एकट्याच मी बोलत नाही. अनेक लोक माझ्या आजूबाजूचे जसे बोलतात, जी भाषा वापरतात. याचं कोण प्रतिनिधित्व करत नाही, असं मला वाटत होत. त्यामुळे आपण तसं काही तरी लिहूया, कोणीतरी प्रोड्युस करेल. ही वाट आम्ही बघत बसलो होतो. त्यानंतर अर्थात तसं काही झालं नाही. मग आम्हीच पैसे टाकून दोन ते तीन जाहिराती बनवल्या. त्यानंतर आम्ही स्वतःला एक पेमेंट करून घेण्याचा एक व्हिडीओ बनवून बघितला आणि ते झाल्या-झाल्या क्लिक झालं की, आम्हीच असे नाही आहोत, ज्यांना हे बघायचं आहे. असे अनेक लोक असतील ज्यांना हे बघायचं आहे आणि ज्यांना हे करायचं देखील आहे. त्यातून ते घराघरात पात्र पोहोचली.