एक्स्प्लोर

Aamir Khan: थाटामाटात की खासगीत? आमिर खान गौरीसोबत कसं अन् कधी लग्न करणार? स्वत:च केला खुलासा...

Aamir khan and Gauri Spratt: आमिर खान लवकरच तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे.

Aamir and gauri Spratt: परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir khan) सध्या आपल्या तिसऱ्या लग्नामुळे प्रचंड चर्चेत आहे. अभिनेता तिसऱ्यांदा लग्न (Entertainment) करणार असल्याचं बोललं जात आहे. 61 वर्षीय अभिनेता गौरी स्प्रॅटसोबत 5 जुलै रोजी लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे.  अभिनेत्यानं सांगितलं की, तो आलिशान नसून, रजिस्टर्ड पद्धतीने लग्न करणार आहे.  या लग्नात कुटुंब आणि जवळचे नातेवाईक मित्र परिवार (Gauri Spratt) उपस्थित असणार आहे. सध्या ही माहिती समोर येताच,  चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. दरम्यान, आमिर खान खरंच  लग्न करणार का? आमिर खान आपल्या तिसऱ्या लग्नाबाबत नेमकं काय म्हणाला?  पाहूयात.

आमिर खान मोठ्या थाटामाटात नसून, अगदी साध्या पद्धतीने तिसरे लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आमिर खानने अलिकडेच 'डेकन क्रॉनिकल'ला मुलाखत दिली होती.  या मुलाखतीत त्यानं आपल्या तिसऱ्या लग्नाबाबत खुलासा केला. अभिनेता म्हणाला, 'हा एक सिंपल आणि साधा विवाहसोहळा असेल. घरीच रजिस्टर्ड पद्धतीने लग्न होईल. या लग्नात दोन्ही परिवार आणि जवळचे मित्र परिवार उपस्थित असतील.  आम्हाला हे लग्न खूप साधं ठेवायचं आहे', असं आमिर खान म्हणाला.

5 जुलै रोजी गौरी स्प्रॅटसोबत विवाहबंधनात अडकणार (Aamir Khan will Tie knot with Gauri Spratt)

आमिरनं असंही स्पष्ट केलं की, त्याला हे नातं पुढच्या टप्प्यावर  घेऊन जायचं आहे.  अभिनेत्याने नुकतंच अमेरिकेतून आपल्या तिसऱ्या लग्नाच्या बातम्यांवर दुजोरा दिला आहे. आमिरने मुलाखतीत असंही सांगितलं की, अभिनेता सध्या अमेरिकेत असून, तो 5 जुलै रोजी गौरी स्प्रॅटसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.  दरम्यान, दोघांच्या लग्नाला सध्या 2 आठवडे उरले आहेत. या दोन आठवड्यांत आमिर आणि गौरी नेमकं काय लग्नाची तयारी करतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.  

25 वर्षांपासून एकमेकांशी ओळख (Aamir Khan With Gauri Spratt)

मिडिया रिपोर्ट्सनुसार, तिसऱ्या लग्न सोहळ्यानंतर अभिनेता पुन्हा  आपल्या सिनेइंडस्ट्रीतील  प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी कामावर परतणार आहे.  राजकुमार यांच्या '3 इडियट्स'च्या तिसऱ्या पार्टसाठी काम करणार आहे,  अशी माहिती समोर आली आहे.   मिळालेल्या माहितीनुसार,  आमिर खानने  आपल्या 60 व्या वाढदिवशी म्हणजेच 2025 साली गौरी स्प्रॅटला मीडिया समोर आणले.  मीडिया समोर त्यांनी रिलेशनशिपबाबत कबूल केलं.  दरम्यान, गौरी आणि आमिर हे एकमेकांना  25 वर्षांपासून ओळखत असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गौरी घटस्फोटित असून, तिला एक मुलगा देखील आहे.  

महत्त्वाच्या इतर बातम्या:

प्रसूतीकळातही सादरीकरण, पाय थांबले नाही; 'ईठा' सिनेमाचा टीझर पाहून लेक भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाल्या...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
Mahima Makwana on Struggle: 5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget