एक्स्प्लोर

Aamir Khan Nephew Imran Khan Joins Student Protest: आमीर खानचा पत्ता नाही, पण भाचा मात्र विद्यार्थ्यांसाठी मैदानात, मुंबईत शिवाजी पार्कच्या रॅलीमधला VIDEO समोर

Aamir Khan Nephew Imran Khan Joins Student Protest: मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमीर खानचा पत्ताच नाही. पण, त्याचा भाचा अभिनेता इमरान खान मात्र विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. 

Aamir Khan Nephew Imran Khan Joins Student Protest: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची (Student Protest) झळ सध्या संपूर्ण देशभरात पोहोचली आहे. दिल्लीमध्ये (Delhi) सुरू असलेल्या जंतर-मंतरवरच्या आंदोलनाचे (Jantar Mantar Protest) पडसाद देशातील जवळपास सर्वच शहरांत पाहायला मिळत आहे. बॉलिवूडमधील (Bollywood News) कलाकारही 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (Cockroach Janata Party) वतीनं विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठींबा दर्शवत आहेत. अलिकडेच, दंगल फेम अभिनेत्री आयेशा खान (Actress Ayesha Khan) मुंबईत (Mumbai News) शिवाजी पार्क (Shivaji Park) येथील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी तिला मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) ताब्यात घेण्यात आलेलं. काही वेळानं तिची सुटकाही करण्यात आली, पण तिनं सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ तुफान व्हायर झाला. अशातच बॉलिवूडचे दिग्गज सेलिब्रिटी विद्यार्थ्यांसाठी मैदानात उतरले असताना, बॉलिवूडचे तिन्ही खान्स मात्र मौन बाळगून होते. अशातच बुधवारी रात्री उशिरा सलमान खाननं (Salman Khan) ट्वीट करुन विद्यार्थ्यांना आपला पाठींबा दिला. पण, इथे विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या चिंतेनं अख्खा देश पेटलेला असतानाच मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमीर खानचा (Aamir Khan) पत्ताच नाही. पण, त्याचा भाचा अभिनेता इमरान खान (Imran Khan) मात्र विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. 

आमिर खानचा भाचा इमरान खान याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये इमरान खान विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होताना दिसतोय. त्याला मुंबईतील शिवाजी पार्क इथे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असताना, त्यात अचानक इमरान खान दिसला.  नेटकऱ्यांकडून इमरान खानवर कौतुकाचा वर्षाव होतोय. तर, आमीर खाननं भाच्याकडून काहीतरी शिकावं, अशा कमेंट्सही नेटकऱ्यांकडून केल्या जात आहेत. 

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला इमरान खानचा पाठिंबा (Imran Khan Supports Student Protest)

व्हिडीओमध्ये बॉलिवूड अभिनेता इमरान खान काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेला आणि खांद्याला बॅग लावलेला दिसतोय. त्याला पाहताच विद्यार्थी त्याचे व्हिडीओ काढू लागले आणि त्याच्यासोबत सेल्फी घेण्याची इच्छा व्यक्त करू लागले. इमरान आंदोलनातील विद्यार्थ्यांना सेल्फीसुद्धा देतोय.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ਨਵਜੋਤ ਸਿੰਘ Navjot Singh (@visualsofsingh)

विद्यार्थ्यांना पाठींबा देण्यासाठी, त्यांच्या भविष्यासाठी सेलिब्रिटी मैदानात (Celebrity Supports Student Protest)

नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) गेल्या 25 दिवसांपासून उपोषणावर आहेत. दरम्यान, 'कॉकरोच जनता पार्टी'चं आंदोलनही सुरू असून त्यांनी 'संसद मोर्चा'चंही आयोजन केलं होतं. शबाना आझमी आणि प्रकाश राज यांसारख्या कलाकारांनी या आंदोलनात सहभाग घेतलाय. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतही मोर्चे काढले जात आहेत. अभिनेता गुरफतेह सिंह पीरझादा आणि अभिनेत्री प्रतिभा रांटा यांनी मुंबईतील आंदोलनात सहभाग घेतला आणि त्यावेळचे फोटोही शेअर केलेत.

आयशा खानही या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेली होती. तिनं दावा केलाय की, ती शांतपणे उभी असतानाच पोलिसांनी तिला बळजबरीनं व्हॅनमध्ये बसवलं आणि पोलीस ठाण्यात नेलं. तिनं या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला, मात्र नंतर तिची सुटका करण्यात आली. उर्फी जावेदनंही सांगितलं की, ती आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेली होती, पण पोलीस तिथून सर्वांना बळजबरीनं हटवत असल्यामुळे तिला परत यावं लागलं. याशिवाय सोनाक्षी सिन्हा, हृतिक रोशन, नसीरुद्दीन शाह आणि अनुपम खेर यांसारख्या कलाकारांनीही या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Salman Khan On CJP Students Protest: 'आंदोलनाला हिंसक वळण लागणं...', सलमान खाननं विद्यार्थी आंदोलनावर मौन सोडलंच; सरकारवर दाखवला विश्वास, नेमकं काय म्हणाला?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Dil Chahta Hai: 'दिल चाहता है'ची 25 वर्ष; बॉलिवूडच्या आयकॉनिक सिनेमाला होकार देण्यासाठी 'या' कलाकारानं लावलेले 8 महिने! फरहान म्हणाला...
'दिल चाहता है'ची 25 वर्ष; बॉलिवूडच्या आयकॉनिक सिनेमाला होकार देण्यासाठी 'या' कलाकारानं लावलेले 8 महिने! फरहान म्हणाला...
Gashmeer Mahajani Rakhandaar Upcoming Movie: गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
Aata Hou De Dhangana: ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या पाचव्या पर्वात मोठा ट्विस्ट!यंदा कलाकारांची धमाल रंगणार चक्क बेटावर, नेमकं काय होणार?
‘आता होऊ दे धिंगाणा’च्या पाचव्या पर्वात मोठा ट्विस्ट!यंदा कलाकारांची धमाल रंगणार चक्क बेटावर, नेमकं काय होणार?
Advertisement

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Embed widget