एक्स्प्लोर

Aai Tuljabhavani: लाख्यासुराच्या अत्याचारांनी गाव उध्वस्त; एका आर्त हाकेने दैवी पर्वाचा होणार आरंभ! आई तुळजाभवानी मालिकेत नवा ट्विस्ट

एका बाजूला असुरी शक्तींचा कहर, तर दुसऱ्या बाजूला एका सामान्य स्त्रीची अढळ श्रद्धा या संघर्षातून उलगडणार आहे

Colors Marathi serial: कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी मालिकेत मांढरदेवी महात्म्य या नव्या दैदीप्यमान दैवी पर्वाचा आरंभ होणार आहे. अधर्माचा अंधार गडद होत असताना, भक्तीचा दिवा नव्या शक्तीला जन्म देतो याचा प्रत्यय मांढरदेवी महात्म्यच्या या भव्य अध्यायात प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. ( Aai Tuljabhavani )

सध्या Colors Marathi वाहिनीवर प्रसारित होत असलेली 'आई तुळजाभवानी ' ही मालिका कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. महाराष्ट्रातील प्रेक्षकांकडून या मालिकेला मोठा प्रतिसाद मिळत असून तिने आपल्या ठसठशीत कथानकामुळे विशेष स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेत प्रेक्षकांना नवे ट्विस्ट पहायला मिळणार आहेत. ही श्रद्धा, शक्ती आणि अवताराची अद्भुत गाथा आहे . एका बाजूला असुरी शक्तींचा कहर, तर दुसऱ्या बाजूला एका सामान्य स्त्रीची अढळ श्रद्धा या संघर्षातून उलगडणार आहे. 

तुळजाभवानीच्या अंतरंगातील शक्ती जागृत होणार

असुरी शक्तींनी वेढलेल्या, काळ्या धुरात हरवलेल्या एका गावात जिथे कुठलीही हाक देवांपर्यंत पोहोचत नाही तिथे उभी आहे ऋषीपत्नी मांडाबाई. जखमी, कष्टी, पण अजूनही न डगमगलेली… लाख्यासुराच्या अत्याचारांनी गाव उद्ध्वस्त झालंय, लोकांनी आशा सोडली आहे;

पण ती मात्र स्वतःच्या भीतीशी आणि नियतीशी लढत खंबीरपणे उभी आहे. दूरवर आई तुळजाभवानीला या संकटाची जाणीव होते, मात्र लाख्यासुराच्या असुरी तंत्रामुळे तिच्याही शक्तींना मानवी रूपात मर्यादा आल्या आहेत. एक धाडसी निर्णय घेत मांडाबाई निघते दुर्गम डोंगराच्या दिशेने जिथून तिची साद देवीपर्यंत पोहोचू शकते. हा प्रवास केवळ डोंगर चढण्याचा नाही, तर श्रद्धा, धैर्य आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचा आहे. तिच्या एका आर्त हाकेने तुळजाभवानीच्या अंतरंगातील शक्ती जागृत होते.आदिशक्तीचा अंश जागृत होतो. 

एक नवा अवतार अधर्माच्या अंतासाठी सज्ज

तुळजाभवानीच्या करकमलातून निघालेलं तेज मांडाबाईमध्ये सामावतं आणि एका सामान्य स्त्रीचं रूपांतर होतं एका प्रचंड शक्तिशाली देवी शक्तीत होते. भक्ती आणि शक्ती यांच्यातली सीमा धूसर होत असताना, एक नवा अवतार अधर्माच्या अंतासाठी सज्ज होतो.

मांढरदेवी आणि तुळजाभवानीची ही दिव्य साथ असुरी शक्तींना कशी संपवणार याचा अत्यंत रोमहर्षक पट या पर्वात उलगडणार आहे. मांडाबाईच्या अदम्य श्रद्धेची ही कथा प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहे. पाहा, ह्या आठवड्यात मांढरदेवी महात्म्य, श्रद्धा, धैर्य आणि दैवी शक्तीचा भव्य संगम. एक दिव्य चमत्कार, जिथे भक्तीच देवत्वाला आव्हान देते. तेव्हा या पर्वात काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पहा, 'आई तुळजाभवानी’, दररोज, संध्या. ६ वा. आणि दुपारी २ वा. फक्त कलर्स मराठीवर. 

महत्त्वाच्या बातम्या

Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Mahesh Kothare on Inspector Jadhav: कोठारे आडनाव असताना इन्स्पेक्टर महेश जाधव नाव का वापरलं? महेश कोठारे यांनी सांगितला रंजक किस्सा, म्हणाले...
कोठारे आडनाव असताना इन्स्पेक्टर महेश जाधव नाव का वापरलं? महेश कोठारे यांनी सांगितला रंजक किस्सा, म्हणाले...
Ashok Saraf On Sachin Pilgaonkar: 'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'
'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Embed widget