‘आई तुळजाभवानी’ मालिकेत दैवी संघर्षाचा महा अध्याय! दिवाळीत कलर्स मराठीवर उलगडणार थरारक कथा
येत्या सोमवार 20 ते शनिवार 25 ऑक्टोबर या कालावधीत, दररोज रात्री 9 वाजता प्रेक्षकांना या दैवी संघर्षाचा साक्षीदार होता येणार आहे. तेही फक्त कलर्स मराठीवर.

marathi Serial: दिवाळीचा सोहळा जसा प्रकाश, रंग आणि आनंदाने भरलेला असतो, तसाच तो आता दैवी शक्ती आणि षड्रिपूंमधील महासंघर्षाने रंगणार आहे. ‘कलर्स मराठी’ आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे ‘आई तुळजाभवानी’ मालिकेचा एक थरारक, भव्य आणि नेत्रदीपक अध्याय, ज्यात उलगडणार आहे दैवी शक्तींचा अद्भुत प्रवास. येत्या सोमवार 20 ते शनिवार 25 ऑक्टोबर या कालावधीत, दररोज रात्री 9 वाजता प्रेक्षकांना या दैवी संघर्षाचा साक्षीदार होता येणार आहे. तेही फक्त कलर्स मराठीवर.
दैवी शक्ती - अंधारातील षड्रिपूंमधील लढत
या मालिकेत पहिल्यांदाच मराठी टेलिव्हिजनवर उच्च दर्जाच्या ग्राफिक्सचा वापर करून दैवी शक्ती आणि अंधारातील षड्रिपूंमधील लढत साकारण्यात आली आहे. त्यामुळे ही मालिका आपल्या अनोख्या दृश्य अनुभवामुळे प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. याच मालिकेचा आगामी आठवडा ठरणार आहे ‘दैवी शक्ती विरुद्ध षड्रिपुंचा महासंघर्ष’.
या आठवड्यातील भागात उमा या पात्राचं भयंकर आणि थरारक रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पर्वतकड्यावर उभी असलेली षड्रिपु मत्सर रूपी उमा, तिच्या मागे दिसणारा मत्सराचा विराट आकार आणि बाजूला उभे पाच रिपू हे दृश्य मालिकेचा उत्कर्षबिंदू ठरणार आहे. काही क्षणांतच हे सहा रिपू उमामध्ये विलीन होतात आणि ती महाकाय महारिपूचे रूप धारण करते.
नव्या दैवी अध्यायाची सुरुवात होणार…
या दृश्यासमोर उभी राहते जगदंबा, आणि तिच्या मागे तेजोमय रूपात प्रकट होते आई तुळजाभवानी. विजेच्या कल्लोळात जगदंबेच्या मस्तकावर उघडलेला डोळा दैवी किरण सोडतो, जे सहा रिपूंना स्पर्श करून त्यांना जळत्या लालसर-केशरी षटकोणात परिवर्तित करतात. या क्षणानंतर सुरू होतो षड्रिपु विरुद्ध दैवी शक्तींचा महासामना, जो मराठी टेलिव्हिजनवर आजवर कधीही पाहिला गेला नाही असा दृष्टीसुखद अनुभव देणार आहे.
‘आई तुळजाभवानी’ची ही दिवाळी विशेष मालिका केवळ मनोरंजनासाठी नाही, तर ती दैवी शक्ती, श्रद्धा आणि आत्मविश्वासाचा संदेश देणारी कथा आहे. "रिपूंचं दमन होणार… नव्या दैवी अध्यायाची सुरुवात होणार…" असा या मालिकेचा टॅगलाइनच प्रेक्षकांच्या उत्सुकतेला नवा रंग देतो. तर तयार राहा, कारण या दिवाळीत प्रकाशाच्या उत्सवासोबतच अनुभवायला मिळणार आहे दैवी प्रकाशाचा महामेळावा, सोमवार 20 ते शनिवार 25 ऑक्टोबर दरम्यान, दररोज रात्री 9 वाजता फक्त कलर्स मराठीवर!























