Aai Kuthe Kaya Karte : ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kaya Karte) या मालिकेत आता अरुंधती घरातून बाहेर पडल्यानंतर देशमुखांच्या घरात रोज नवा ड्रामा पाहायला मिळत आहे. आता मालिकांमध्ये होळीचा माहोल दिसत आहे. देशमुखांच्या घरातही आता जल्लोषात होळीचा सण साजरा होणार आहे. दरवर्षी प्रमाणे समृद्धी बंगल्याच्या आवारात होलिका दहन होणार आहे. यासाठी आई कांचन सगळा नैवैद्य साग्रसंगीत आणि घरातच बनणार असा हुकुम देतात. दरवर्षी अरुंधती एकटीने ही सगळी तयारी करते. मात्र, यावर्षी अरुंधती घरात नसणार आहे.


या सगळ्या धामधुमीत संजना कामाला जाण्यासाठी निघते. तिला पाहून कांचन म्हणते की, आज कुठे चाललीस? घरात नैवैद्याचा घाट घातला आहे. घरातील सगळी काम कोण करणार? यावर संजना म्हणते की, अनघा आहे ना. ती नोकरी वैगरे करत नाही, तर घरातील सगळी काम करायला ती आहे. हे ऐकून अनघा देखील जशाच तसं उत्तर देते. अनघा म्हणते, हो मी कामं करणार, पण आज पासून प्रत्येकाने स्वतःची कामं स्वतः करायची आहेत.



आता कांचन देशमुख आणि अनघा दोघीही संजनाकडून घरातील सगळी काम करून घेणार आहेत. होळी असल्याने घरात पुरणपोळीचा घाट देखील असणार आहे. तयार होऊन निघालेल्या संजनाला आता थेट लाटणं-पोळपाट घेऊन पुरणपोळ्या लाटायला लागणार आहेत.  


‘समृद्धी’तून अरुंधती ‘आऊट’!


देशमुखांच्या घरातून बाहेर पडलेली अरुंधती आता आशुतोषच्या मदतीने आपलं स्वप्न पूर्ण करत आहे. आपला अपमान विसरून अरुंधती आता एका नव्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. या प्रवासाची सुरुवात तिने देशमुखांच्या घरातून वेगळं होण्यापासून केली आहे. ‘समृद्धी’ बंगला सोडून आता अरुंधती स्वतःच्या वेगळ्या घरात राहायला गेली आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha