Share Market : रशिया-युक्रेन युद्धाचे सावट भारतीय शेअर बाजारावरून हटल्याचं दिसून येतंय. सलग पाचव्या सत्रामध्ये शेअर बाजार वधारला असून आज आज बाजार बंद होताना सेन्सेक्स 935 अंकांनी वधारला तर निफ्टीही 240 अंकानी वधारला आहे. सेन्सेक्समध्ये 1.68 टक्क्यांची वाढ होऊन तो  56,486.02 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 1.45 टक्क्यांची वाढ होऊन तो 16,871.30 वर पोहोचला आहे. 


आज 1684 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1706 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 134 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 


आज बाजार बंद होताना आयटी तसेच बँकांच्या शेअर्समध्ये दोन टक्क्यांची वाढ झाली आहे तर रिअॅलिटी क्षेत्रामध्ये दोन टक्क्यांची घसरण झाली आहे. BSE मिडकॅपच्या शेअर्समध्ये काही प्रमाणात घट झाली आहेत तर स्मॉलकॅपमध्ये 0.3 टक्क्यांची वाढ झाली आहे. 


सोमवारी शेअर बाजारात Infosys, SBI, HDFC Bank, Maruti Suzuki आणि Axis Bank या कंपन्या टॉप निफ्टी गेनर्स ठरल्या आहेत तर   IOC, ONGC, HUL, Tata Motors आणि HDFC Life या कंपन्या निफ्टीमध्ये घट झाली आहे.


या कंपन्यांचे शेअर्स वधारले



  • Infosys- 3.77 टक्के

  • HDFC Bank- 3.28 टक्के

  • SBI- 3.15 टक्के

  • Maruti Suzuki- 3.02 टक्के

  • Axis Bank- 2.78 टक्के



या कंपन्यांचे शेअर्स घसरले



  • IOC- 2.34 टक्के

  • ONGC- 2.22 टक्के

  • HUL- 1.68 टक्के

  • Tata Motors- 1.54 टक्के

  • HDFC Life- 1.22 टक्के


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha