Aai Kuthe Kay Karte : अनिरुद्ध घटस्फोट देणार म्हणताच बिथरली संजना, देशमुखांना घर परत करणार!
Aai Kuthe Kay Karte : संजनाचा कारनामा समोर येताच अनिरुद्ध देखील संतापला आहे. त्याने रागाच्या भरात घर परत कर, नाहीतर तुला घटस्फोट देईन, अशी धमकी संजनाला दिली.
![Aai Kuthe Kay Karte : अनिरुद्ध घटस्फोट देणार म्हणताच बिथरली संजना, देशमुखांना घर परत करणार! Aai Kuthe Kay Karte latest update Sanjana will return property papers to Deshmukh family Aai Kuthe Kay Karte : अनिरुद्ध घटस्फोट देणार म्हणताच बिथरली संजना, देशमुखांना घर परत करणार!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/25/25fa9b9dad40b27fec09ee7aa95f185b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aai Kuthe Kay Karte : छोट्या पडद्यावरची ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांच्या यादीत ही मालिका अग्रक्रमावर आहे. या मालिकेत दररोज येणारी नवी वळणं प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवत आहेत. ‘अरुंधती’पासून ते ‘आशुतोष’पर्यंत सगळीच पात्र प्रेक्षकांना खूप आवडत आहेत. सध्या मालिकेत हाय व्होल्टेज ड्रामा सुरु आहे. संजनाने देशमुखांना फसवून ‘समृद्धी’ बंगला आपल्या ननावर करून घेतला आहे.
अप्पांनी अरुंधतीच्या नावावर घराचा अर्धा हिस्सा केला होता. मात्र, संजनाने तिच्याकडून तो हिसकावून घेतला आहे. दुसरीकडे कामाचे कागद सांगून तिने घरच्या कागदांवर अनिरुद्धची सही घेतली आणि संपूर्ण समृद्धी बंगला तिने आपल्या नावावर करून घेतला. आता तिचा हाच खोटेपणा सगळ्यांसमोर आला आहे. संजनाने सगळ्यांची फसवणूक करून घर नावावर करून घेतल्याचं कळताच देशमुख कुटुंब संतापलं आहे.
अनिरुद्धने दिली धमकी!
संजनाचा हा कारनामा समोर येताच अनिरुद्ध देखील संतापला आहे. त्याने रागाच्या भरात, घर परत कर, नाहीतर तुला घटस्फोट देईन, अशी धमकी संजनाला दिली. संजनाने घरातील लोकांची फसवणूक केल्याचे कळताच अरुंधतीने देखील तिला चांगलेच बोल लगावले आहेत. ‘तुझ्या याच वागण्यामुळे अनिरुद्ध तुझ्यापासून दूर जात आहेत. घरातील लोक देखील तुझा तिरस्कार करत आहे. तुझ्याविरोधात पोलीस तक्रार केल्यास कुणालाही काहीही फरक पडणार नाही. तुला कुणी वाचवायलाही येणार नाही’, असं अरुंधती संजनाला म्हणते.
संजना परत करणार घर!
एकीकडे अनिरुद्धने घटस्फोटाची धमकी दिलीये, तर दुसरीकडे अरुंधतीने देखील तिला पोलीस तक्रार करण्याची धमकी दिली आहे. यामुळे संजना चांगलीच बिथरली आहे. घाबरून तिने देशमुखांचं घर परत करण्याचा निर्णय घेतला आहे. संजना घरातील सगळ्यांना बोलावून सर्वांसमोर घराचे पेपर्स पुन्हा एकदा आई-अप्पांना देणार आहे.
हेही वाचा :
- Laal Singh Chaddha : आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा'वर बंदी घालण्याची मागणी, नेमकी कारणं तरी काय?
- Ankit Tiwari : ‘...त्यांच्यामुळे माझ्या 3 वर्षांच्या मुलीला उपाशी राहावं लागलं’, पंचतारांकित हॉटेलवर संतापला गायक अंकित तिवारी
- Rocky Aur Rani Ki Prem Kahani Release Date : आलिया-रणवीरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ची रिलीज डेट जाहीर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)