एक्स्प्लोर

'3 इडियट्स'च्या सिक्वेलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट? सिक्वेल कधी तयार होणार? मोठी अपडेट समोर

Actor Sharman Joshi Drops Major Hint on 3 Idiots 2: 3 इडियट्स' हा 2009 मधील सुपरहिट चित्रपट. सिक्वेलबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता. शर्मन जोशीनं दिली मोठी माहिती.

3 Idiots Sequel Update: 2009 साली प्रदर्शित झालेला '3 इडियट्स' तुफान गाजला. 3 मित्रांची मैत्री अन् करिअरचा असणारा दबाव, याभोवती हा चित्रपट फिरतो. दरम्यान, प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी. लवकरच या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा आहे. अलिकडेच अभिनेता शर्मन जोशी याने या चित्रपटाच्या सिक्वेलची आशा व्यक्त केली आहे. दरम्यान, त्याने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नसल्याचं सांगितलं. जर '3 इडियट्स'चा सिक्वेल तयार झाला तर त्यात शर्मन जोशी असणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

'3 इडियट्स'मध्ये शर्मन जोशीने राजू रस्तोगीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात आमिर खानसह आर. माधवनचीही मुख्य भूमिका होती. दरम्यान, '3 इडियट्स' या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल प्रदर्शित होणार का? असा प्रश्न प्रेक्षकवर्गाकडून उपस्थित केला जात आहे. हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना, शर्मनने चित्रपटाच्या पुढील भागावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत प्रेक्षकांना मोठी हिंट दिली आहे.

शर्मन जोशी म्हणतो, "मला आशा आहे की, '3 इडियट्स' या चित्रपटाचा सिक्वेल तयार होईल. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मला '3 इडियट्स'च्या सिक्वेलच्या कथेबद्दल स्पष्ट कल्पना नाही. मला या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत कोणतीच माहिती नाही. जर चित्रपटात पोटेंशियल असेल तर, मास्टर राजू, अभिजात सर आणि आमिर खान या चित्रपटावर काम करेल", अशी माहिती शर्मन जोशी याने मुलाखतीतून दिली. त्यामुळे शर्मन जोशी याने दिलेल्या उत्तरामुळे तो या सिक्वेलचा भाग असणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

'3 इडियट्स 2'ची स्क्रिप्ट तयार

पिंकव्हिलामधील एका वृत्तानुसार, राजकुमार हिरानी यांनी '3 इडियट्स 2'ची स्क्रिप्ट फायनल झाली आहे. हा बहुप्रतिक्षित चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये आमिर खान, करीना कपूर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी या मुख्य कलाकारांना पुन्हा एकत्र आणण्याची अपेक्षा आहे. राजकुमार हिरानी गेल्या अनेक वर्षांपासून या चित्रपटाच्या सिक्वेलचा विचार करत होते. मात्र, दादासाहेब फाळके बायोपिकला स्थगिती दिल्यानंतरच या चित्रपटाबाबत पुढील तयारी केली जाईल.

महत्त्वाच्य इतर बातम्या:

शरीरावर धारदार शस्त्राने वार; प्रसिद्ध अभिनेत्रीची क्रूर हत्या, बॉयफ्रेंडवर पोलिसांचा संशय

अनिल कपूर अन् रणबीरचं नातं काय? केवळ पडद्यावरच नाहीत, तर प्रत्यक्ष आयुष्यातही आहे 'लाडला'

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Death News: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, 75व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं घेतला अखेरचा श्वास
Nana Patekar Death News: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, 75व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं घेतला अखेरचा श्वास
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांनी व्यक्त केली होती भीती, आज तेच घडलं; नेमकं काय म्हणाले होते?, VIDEO
नाना पाटेकरांनी व्यक्त केली होती भीती, आज तेच घडलं; नेमकं काय म्हणाले होते?, VIDEO
Nana Patekar: 'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
Nana Patekar Death Tukaram Mundhe: 'आमचं 8 दिवसांपूर्वीच बोलणं झालं होतं, मला म्हणाले...'; नाना पाटेकरांच्या आठवणीत तुकाराम मुंढे गहिवरले, नेमकं काय म्हणाले?
'आमचं 8 दिवसांपूर्वीच बोलणं झालं होतं, मला म्हणाले...'; नाना पाटेकरांच्या आठवणीत तुकाराम मुंढे गहिवरले, नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
Nana Patekar: 'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
Amol Palekar on Nana Patekar Passed Away : माझ्यासारख्याचे जाणे पटू शकतं, पण नाना पाटेकरचे जाणे...., अमोल पालेकर हळहळले, गहिवरले!
माझ्यासारख्याचे जाणे पटू शकतं, पण नाना पाटेकरचे जाणे...., अमोल पालेकर हळहळले, गहिवरले!
Nana Patekar Passed Away: विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Embed widget