एक्स्प्लोर

एकनाथ खडसेंना उमेदवारी का डावलली?

खडसे यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावना देखील अनावर झाल्या होत्या. मात्र रोहिणी यांना तिकीट दिल्यानंतर खडसे यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली असून रोहिणी यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई : माजी मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांना त्यांच्या मुक्ताईनगर या मतदारसंघातून उमेदवारी न देता त्यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याबाबत खडसे यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावना देखील अनावर झाल्या होत्या. मात्र रोहिणी यांना तिकीट दिल्यानंतर खडसे यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली असून रोहिणी यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
खडसे यांना उमेदवारी न देण्यामागची प्रमुख कारणं  ही असू शकतात 
  1.  एकनाथ खडसेंचे उपद्रवी मूल्य पक्षसंघटना आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांसाठी डोकेदुखी ठरले होते.
  2. 'विरोधी पक्ष नेता असतांना शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवारांचं नाव मला तरी आढळलं नव्हतं' हे खडसेंनी केलेलं ताजं वक्तव्य पक्षश्रेष्ठींच्या चांगलंच जिव्हारी लागलं होतं.
  3. खडसेंना या विधानसभेत पुन्हा संधी दिली तर पुढच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याबाबतच्या चर्चा आणि बातम्या सतत येत राहणार, जी मुख्यमंत्र्यांसाठी डोकेदुखी ठरू शकेल.
  4. सभागृहात ऑन रेकॉर्ड खडसे सरकारचे वाभाडे काढत आणि पक्षाला सतत तोंडघशी पाडत होते.
  5. खडसेंनी सभागृहाबाहेर केलेली टीका किंवा पक्षविरोधी वक्तव्य एक वेळेस दुर्लक्षित करता आली असती पण सभागृहाच्या पटलावर काह विषय ऑन रेकॉर्ड आणणं सरकारसाठी जास्त अडचणीचे आणि नामुष्कीचे ठरत होते
  6. सर्वात महत्वाचं म्हणजे खडसेंना उमेदवारी डावलून पक्षातील इतर उपद्रवी नेत्यांना एक कडक मेसेज देण्याचा पक्षश्रेष्ठींचा प्रयत्न आहे.
एकनाथ खडसेंऐवजी रोहिणी यांना उमेदवारी, कोण आहेत रोहिणी खडसे? संपूर्ण महाराष्ट्राचे खडसेंच्या उमेदवारीकडे लक्ष लागले होते. परंतु आपल्याला उमेदवारी मिळणार नाही, हे खडसे यांनी काल स्पष्ट केले. दरम्यान, खडसे यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी खडसे यांना अपक्ष निवडणूक लढावी, अशी मागणी केली होती. खडसे यांनी मला उमेदवारी दिली जाणार नाही. दरम्यान पक्ष मला जो आदेश देईल, मी त्याचं पालन करेन. मी पक्षाच्या प्रत्येक आदेशाचं पालन करणारा कार्यकर्ता आहे. गेल्या 42 वर्षांपासून मी ते करतोय. अनेकदा मी पक्षाचे अनेक कटू निर्णय मान्य केले आहेत, असे म्हटले होते. गेली चाळीस वर्ष आपण पक्षाशी प्रामाणिक राहिलो. इतर पक्षातून अनेकवेळा मंत्री पदापासून वेगवेगळी प्रलोभने आपल्याला आली. मात्र आपण पक्षाची बांधिलकी कधीही सोडली नाही. हे सगळं करून झाल्यानंतर बाहेरच्यांच्या आरोपांवरून कोणतीही चूक नसताना आपल्याला तीन वर्षापासून मंत्री पदावरून दूर केलं गेलं, असे खडसे म्हणाले होते. चाळीस वर्ष आपण प्रामाणिकपणे काम करून आपल्याला का असं वागवलं गेलं, या बाबत मी माझ्या 'आकां'ना विचारणार आहे. माझा गुन्हा काय ते तरी सांगावं, असंही खडसे म्हणाले होते. वरिष्ठांना मी नक्की विचारणार की माझ्या विरोधात कुणी विष पसरवलं.  वेळ पडल्यास मी तुमच्याशी देखील संवाद साधेल, अशा शब्दात खडसे यांनी सूचक इशारा देखील दिला आहे. मला, आता तुमच्या सहकार्याची गरज आहे आणि ते तुम्ही मला द्याल हा विश्वास आहे, असे भावनिक आव्हान देखील खडसे यांनी केले होते.

महत्त्वाच्या बातम्या

अचानक मुख्यमंत्री घरी आले, माझ्यासमोर कुठलाच पर्याय उरला नाही, अखेर अनिल सोलेंचं बंड शमलं, भाजपचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार 
अचानक मुख्यमंत्री घरी आले, माझ्यासमोर कुठलाच पर्याय उरला नाही, अखेर अनिल सोलेंचं बंड शमलं, भाजपचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार 
Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Sara Tendulkar birthday: सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
Nagpur Crime : आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
Nagpur BJP: मुख्यमंत्री फडणवीसांची शिष्टाई फळाला, नागपूर भाजपातील बंड शमवण्यात यश; बंडखोर अनिल सोलेंची तलवार मान्य, व्यास यांचाही राजीनामा मागे, नेमकं काय काय घडलं?
मुख्यमंत्री फडणवीसांची शिष्टाई फळाला, नागपूर भाजपातील बंड शमवण्यात यश; बंडखोर अनिल सोलेंची तलवार मान्य, व्यास यांचाही राजीनामा मागे, नेमकं काय काय घडलं?
Shani Dev: अशी ओळखा तुमच्यावरील शनिदेवांची कृपा, 7 अद्भूत संकेत! जीवनातील 'हे' बदल कमी लोकांना माहित, ज्योतिषशास्त्र..
अशी ओळखा तुमच्यावरील शनिदेवांची कृपा, 7 अद्भूत संकेत! जीवनातील 'हे' बदल कमी लोकांना माहित, ज्योतिषशास्त्र..
Inflation Essential Commodities: 42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?
42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?
Drishyam 3 Box Office: विजय साळगावकरची 'डोकॅलिटी' पाहून डोकं चक्रावेल! 'दृश्यम 3'ने 11 व्या दिवशी किती कोटी कमावले?
विजय साळगावकरची 'डोकॅलिटी' पाहून डोकं चक्रावेल! 'दृश्यम 3'ने 11 व्या दिवशी किती कोटी कमावले?
Embed widget