एक्स्प्लोर
काँग्रेसची 'धाकड गर्ल' प्रियांका गांधींकडे पूर्व उत्तर प्रदेशचंच प्रभारीपद का?
पूर्व उत्तर प्रदेशातल्या प्रत्येक जागेवर कोण लढणार? कसं लढणार? मुद्दे काय असतील? फोकस कशावर असेल? याचे सर्वाधिकार हे प्रियंका गांधींकडे असतील. पण मुख्य प्रश्न असा की स्वतः प्रियंका गांधी लोकसभा निवडणूक लढणार का?
नवी दिल्ली : आणखी एका 'गांधी'ची आज राजकारणात एन्ट्री झाली. नेहरु, इंदिरा ते राजीव-सोनिया असा वारसा लाभलेल्या, स्वतःला सक्रीय राजकारणापासून दूर ठेवलेल्या प्रियांका गांधी-वाड्रा आज काँग्रेसच्या सरचिटणीस झाल्या. पण महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, की प्रियांका गांधींकडे पूर्व उत्तर प्रदेशचंच प्रभारीपद का सोपवण्यात आलं आहे?
काँग्रेस बॅकफूटवर खेळणार नाही, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ठासून सांगतात ते याचमुळे. प्रियांका यांची राजकारणातली एन्ट्री ही काँग्रेसला उत्तर प्रदेश आणि देशातही फ्रंटफूटवर नेणारी ठरु शकते. पूर्व उत्तर प्रदेश... म्हणजेच काँग्रेसला अपेक्षित असलेल्या सूर्योदयाची दिशा. याच दिशेची जबाबदारी मिळाली प्रियांका गांधींना.
उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या एकूण 80 जागांपैकी जवळपास 25 टक्के म्हणजे 26 जागा याच पूर्व उत्तर प्रदेशात येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाराणसी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गोरखपूर मतदारसंघ याच विभागात येतो. राहुल गांधींचा अमेठी, अयोध्या म्हणजेच आधीचा फैजाबाद मतदारसंघही याच क्षेत्रात येतो. अशा महत्वाच्या विभागाचं प्रभारी पद प्रियांका यांच्याकडे असेल. काँग्रेसची कामगिरी सुधारण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
प्रियांका गांधी-रॉबर्ट वाड्रा... राजकारणातील हायप्रोफाईल कपल
पूर्व उत्तर प्रदेशातल्या प्रत्येक जागेवर कोण लढणार? कसं लढणार? मुद्दे काय असतील? फोकस कशावर असेल? याचे सर्वाधिकार हे प्रियंका गांधींकडे असतील. पण मुख्य प्रश्न असा की स्वतः प्रियंका गांधी लोकसभा निवडणूक लढणार का? प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढणार का? प्रियांका यांना राजकारण नवं नसलं तरी थेट राजकारणात त्या पहिल्यांदाच उतरत आहेत. या आधी त्यांनी आई सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतरदारसंघात प्रचाराची धुरा सांभाळली आहे. यावेळी जर सोनिया गांधी आजारपणामुळे लढल्या नाहीत, तर रायबरेलीमधून प्रियांका गांधी लढू शकतील.प्रियंका गांधी राहुल गांधींना पर्याय नव्हे तर पूरक ठरणार?
समाजवादी पक्ष-बसप यांनी अमेठी आणि रायबरेलीच्या जागा काँग्रेससाठी सोडल्या असल्याने ही लढाई प्रियांकांना तुलनेने सोपी जाईल. प्रियांका गांधी यांच्या रुपाने काँग्रेसने मास्टरस्ट्रोक खेळला असल्याचा दावा राजकीय पंडित करत आहेत आणि तसं झालं. तर भाजपचं राजकीय गणित चुकेल का? प्रियांका गांधींच्या एन्ट्रीनं भाजपचं गणित चुकेल? 80 जागांमुळे उत्तर प्रदेश हे सर्वात मोठं आणि महत्वाचं राज्य. बुवा-भतीजा एक झाल्याने भाजपसमोर आव्हानं मोठं होतं. त्यातच आता प्रियांकाच्या एन्ट्रीने भाई-बहनही डोकेदुखी वाढवतील. प्रियांकाचा चेहरा अनेकांना इंदिरा गांधींची आठवण करुन देतो. हे आकर्षण हे केवळ उत्तर प्रदेशमध्येच नाही, तर देशभरात फायद्याचं ठरेल. राहुल गांधी आपली इमेज बदलण्यात यशस्वी होत असतानाच पाटी कोरी असलेल्या प्रियंका गांधी राजकारणात एन्ट्री घेत आहेत. त्यांच्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचं मनोबल आणखी वाढेल अशी आशा केली जात आहे. प्रियांकांच्या राजकारण प्रवेशासाठी काँग्रेसने अचूक टायमिंग साधलं आहे. या मास्टरस्ट्रोकमुळे नरेंद्र मोदींचा पुढचा मार्ग आणखी बिकट ठरु शकतो.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement