एक्स्प्लोर

बारामतीचा उमेदवार कोण?, मोदी, शाह की फडणवीस, राष्ट्रवादीचं आव्हान

48 पैकी 45 जागा जिंकू आणि त्यामध्ये बारामतीचा समावेश असेल असे सांगत आहेत. नशीब की अमित शाह यांनी 48 पैकी 50 जागा जिंकणार असे भाकीत केले नाही, अशी खिल्लीही नवाब मलिक यांनी उडवली आहे.

मुंबई : बारामतीचा उमेदवार कोण ते आधी जाहीर करा आणि मग बारामती जिंकण्याची भविष्यवाणी करा असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांना दिले आहे. पुणे येथे भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांनी बारामती सुद्धा जिंकू असे वक्तव्य केले होते. यावर नवाब मलिक यांनी टीका केली आहे. हे 48 पैकी 45 जागा जिंकू आणि त्यामध्ये बारामतीचा समावेश असेल असे सांगत आहेत. नशीब की अमित शाह यांनी 48 पैकी 50 जागा जिंकणार असे भाकीत केले नाही, अशी खिल्लीही नवाब मलिक यांनी उडवली आहे. अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांनी बारामतीचा उमेदवार कोण असणार, नरेंद्र मोदी की अमित शाह की स्वतः मुख्यमंत्री हे आधी जाहीर करावे, असे खुले आव्हान भाजपला दिले आहे. यावेळी 43 जागा जिंकू आणि 43 वी जागा बारामतीची असेल : देवेंद्र फडणवीस मागच्यावेळी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत 42 जागा जिंकल्या यावेळी 43 जागा जिंकू आणि ही 43वी जागा बारामतीची असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते पुण्यातील बुथ प्रतिनिधीच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही पूर्ण ताकदीने 48 जागांवर लढणार आहोत. शिवाय यावेळी गेल्या निवडणुकीपेक्षा एक जागा जास्त जिंकू आणि ती एक जागा बारामतीची असेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. बारामती हा पवारांचा बालेकिल्ला आहे. सध्या बारामती मतदार संघातून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीवर घाणाघाती टीका केली. देशात पुन्हा काँग्रेसची सत्ता आल्यास ही देशातील जनतेची ऐतिहासिक चूक असेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. भाजपच्या काळात लोकांच्या हितांचे निर्णय घेण्यात आले, मात्र मनमोहन सिंह यांच्या सरकारच्या काळात निर्णयचं घेतले जात नव्हते, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केला आहे. तरुणांच्या या भारत देशाला नरेंद्र मोदी यांच्यासारख्या पंतप्रधानाची गरज आहे. कारण नरेंद्र मोदी एक क्षणही वाया घालवत नाही. त्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण देशासाठी दिला आहे. मोदींनी 21 वं शतक भारत देशाच्या नावे केलं आहे, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Budh Margi 2026 : जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
Chhatrapati Sambhajinagar DCC Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
Eknath shinde: उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
Eknath Shinde Sachin Ahir Join Shivsena Shinde Group: सचिन तेंडुलकर...एकनाथ शिंदेंचा पहिलाच पंच; सचिन अहिरांसह बाजूचे, मागचे, पुढचे सगळे हसत बसले, VIDEO
सचिन तेंडुलकर...एकनाथ शिंदेंचा पहिलाच पंच; सचिन अहिरांसह बाजूचे, मागचे, पुढचे सगळे हसत बसले, VIDEO

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget